Monday, February 23, 2009

आत्मनिवेदन भक्ती


आत्मनिवेदन भक्ती
ऐक निवेदनाचे लक्षण देवासि वहावे आपण करावे तत्वविवरण म्हणिजे कळे - -
नववी भक्ती आत्मनिवेदन आहे .नि + विद = समर्पण करणे,ताब्यात किंवा हातात देणे कोणाकडे सोपवणे.आत्मनिवेदन म्हणजे स्वत :ला भगवंताला समर्पण करणे ,देवासि वहावे आपण असे समर्थ म्हणतात त्यात तीन गोष्टी येतात . आपल्याला आपण वाहून घेतो म्हणजे अत्यंत प्रेमाने आदराने देवाला शरणागत होतो . एखादी वस्तू आपण दुस-याला देतो तेव्हा तिच्यावरील ममत्व ,माझेपणाचा हक्क ,आसक्ती ,प्रीती सोडतो . त्या वस्तूला देऊन टाकल्यावर त्या वस्तूला आपण विसरतो. तिचे पुढे काय झाले हां विचार करत नाही .तसेच आपण देवाला वाहिल्यावर आपल्या देहावर ,आपल्या वस्तूंवर ,आपल्या घरादारावर कोणतेही ममत्व ठेवता ,सर्वस्वी भगवंतावर सोडून देणे
तत्वविवरण म्हणजे मी कोण ,कशाचा बनलो आहे ,हा शोध घेणे .माणूस म्हणजे देह +मन +आत्मा .आत्मा हा खरा मी असतो .आपण देह आणि मन यांच्या संयोगाला मी म्हणतो .देह मन दोन्ही पंचभूतांचे [पृथ्वी ,आप,
तेज,वायू आकाश ]यापासून बनलेले असते .मग ही पं महाभूते म्हणजे मी आहे का याचा शोध घेतला तर असे
लक्षात येते की या तत्वात जाणीव नाही .म्हणून ही पंचमहाभूते म्हणजे मी नाही. म्हणजे देह मन म्हणजे मी नाही .सारी तत्व म्हणजे मी नही असा निश्चय होतो तेव्हा तत्त्व निरसनही होत
स्थूल देह सूक्ष्म देह यांचा निरास झाल्यावर कारण महाकारण देहाचा निरास व्हायला हवा .कारण देह म्हणजे अज्ञान अवस्था ,तर महाकारण देह म्हणजे ज्ञानाची अवस्था .ज्ञान अज्ञान या दोन्ही अवस्था असल्याने ते देह म्हणजे मी नाही. असा तत्त्व झाडा होतो तेव्हा आत्मनिवेदन होते .म्हणजे आत्मा म्हणजे मी हे प्रत्ययाला येते. देहबुध्दीच्या आश्रयाने जो मी वावरत असतो तो तत्त्व विचारापुढे टिकत नाही.आत्मनिवेदनासाठी विचार हे एकमेव साधन आहे .
आत्मनिवेदन करण्यासाठी या समासात समर्थ आपल्याला विचार करायला शिकवतात .
येक मुख्य परमेश्वरूदुसरी प्रकृती जगदाकारूतीसरा आपण कैंचा चोरूआणिला मध्ये । । - -११ । ।
मुख्य मूलतत्वे दोनच परमेश्वर विश्वाचा आकार घेउन दिसणारी प्रकृती .मग या दोघात मी हा तिसरा चोर कोठून येतो ?तो मी मुळात नसतो पण खोता देहाहंकार चिकटलेला असतो .पिंड ब्रम्हां दोन्ही पंभूतांचा विस्तार आहे त्यामुळे दोन्ही नाशिवंत आहेत .त्यामुळे विश्वाच्या आरंभी जसा आत्मा होता तसाच विश्वाच्या शेवटी रहातो, मग हा मी कोठून आला असे समर्थ विचारतात .मी कोणी नाही असे मानणे म्हणजे आत्मनिवेदन .
आत्मा म्हणिजे तो अद्वैत जेथे नाही द्वैताद्वैत तेथे मीपणाचा हेत उरेल कैसा
आत्मा एकच एक आहे.तेथे दुसरा कोणी नाही ,त्यात द्वैत नाही ,त्यामुळे मी म्हणजे दुसरा कोणी नाही ,वेगळा असू शकत नाही .हा मी पणा काढून टाकणे म्हणजे आत्मनिवेदन !
आत्मनिवेदन तीन प्रकारचे .जड़ चंचळ निश्चळ
मी ,माझे सगळे ,माझ्या मालकीच्या सर्व वस्तू ,माझे मन ,माझी काया,माझी वाचा ,माझा प्रपंच हे सर्व देवाच्या मालकी चे आहे ही भावना ठेऊन जगणे याला जड़ आत्मनिवेदन म्हणतात .
प्रत्येक प्राणीमात्रात विश्वात्माचा अंश आहे .प्रत्येक सजीवात त्याचा अंतरात्मा त्याचा कर्ता असतो .देहाहंकार मी कर्ता नाही अशी धारणा निर्माण करणे म्हणजे चंच आत्मनिवेदन
चंच नाशवंत आहे ,पण परमात्मा निश्चळ आहे .त्या निश्चळ परमात्म्याशी तदाकार होणे म्हणजे निश्चळ आत्मनिवेदन

। । श्रीराम जयराम जय जय राम । ।
। । श्रीराम जयराम जय जय राम । ।



कोणतीही शस्त्रक्रिया झाल्यास आर्निका हायपेरिकम एम् या मात्रेत घेतल्यास दुखण लवकर थांबते



। । श्रीराम जयराम जय जय राम । ।
। । श्रीराम जयराम जय जय राम । ।



Sunday, February 22, 2009

सख्यभक्ती

सख्य भक्ती
प्रा.के .वि .बेलसरे म्हणतात ,'भगवंताची अनुरक्ती +देह्सुखाची विरक्ती +प्राणिमात्रांबद्दल करुणावृत्ती =सख्यभक्ती
भक्ताच्या प्रेमाने पवित्र झालेला आपलेपणा भगवंताचा मंगलमय मित्रपणा यांचा मधुर संगम सख्यभक्तीत दिसतो. यात भगवंताची इच्छा तोच धर्म मानला जातो .तेच शास्त्र ,तेच कर्तव्य तोच व्यवहार होतो .भगवंताच्या अखंड सानिध्यात राहणारा भक्त सखा सर्व जीवांचा मित्र होतो .लोभ ,मोह ,योग ,त्याग ,संग्रह ,सुख ,दुःख : हे काहीच त्याच्या त्या अवस्थेत तो अनुभवत नाही जगाचे मंगल करीत तो जीवन जगतो .
समर्थ सख्य भक्तीची व्याख्या करतात :
देवासी परम सख्य करावेप्रेम प्रीतीने बांधावेआठवे भक्तीचे जाणावेलक्षण ऐसे । । - - । ।
देवाशी सख्य केव्हा घडते ?
देवास जयाची अत्यंत प्रीतिआपण वर्तावे येणे रितीयेणे करिता भगवंतीसख्य घडावे नेमस्त । ।
भगवंताला जे आवडते ते आपण करावे ,त्याप्रमाणे आपण वागावे ,म्हणजे भगवंताशी सख्य घडते
भगवंताला काय आवडते ?
भक्ती भाव भजननिरूपण आणि कथाकीर्तनप्रेमळ भक्तांचे गायनआवडे देवा - - । ।
भगवंताला भक्ती आवडते .भक्ती म्हणजे काय ते आपण आधी पाहिले आहे .परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल नि:शंक असणे हा भाव ! ईश्वर आहे ही जाणीव ठेवून ,ही भावना जागृत ठेवून वागणे हा भावार्थ ! भाव असला की ईश्वराच्या अस्तित्वाची खूण पटलेली असते .भावार्थ असला की आचार विचार उच्चार यात ईश्वराच्या अस्तित्वाचे प्रतिबिंब दिसते
जैसा भाव जयापासीतैसा भाव तयासीजाणे भाव अंतरसाक्षीप्राणीमात्रांचा। । ज्याप्रमाणे भाव महत्वाचा आहे त्याप्रमाणे देवाच्या सख्यत्वासाठी काहीही करायची तयारी हवी.
देवाच्या सख्यत्वासाठीपडाव्या जिवलगांच्या तुटीसर्व अर्पावे सेवटीप्राण तोही वेचावा । । - - । ।
आपुले अवघेचि जावेपरी देवासि सख्य रहावेऐसी प्रीति जीवेभावेभगवंती लागावी । । - - । ।
देव म्हणिजे आपुला प्राणप्राणासि करावे निर्वाणपरम प्रीतिचे लक्षणते हे ऐसे असे । । - -१० । ।
जेव्हा भक्त भगवंताशी अनन्य होतो ,त्याच्या बद्दल भक्तांच्या मनात प्रेम दाटून येते ,देवाशी सख्य जोडले तर देवाला भक्ताची काळजी वाटते .लाक्षागृहातून पांवांना भगवंतानी सुरक्षित बाहेर काढले
त्यासाठी काय करावे ते समर्थ सांगतात :
सखा मानावा भगवंतमाता पिता गणगोतविद्या लक्ष्मी धन वित्तसकळ परमात्मा । । - -१८ । ।
सख्यत्व होते तेव्हा काय होते ?
देव भक्तांचा कैवारीदेव पतितांसी तारीदेव होय साहाकारीअनाथांचा । । - -२६। ।
देव कृपेचा सागरुदेव करूणेचा जळधरूदेवासि भक्तांचा विसरूपडणार नाही । । - -२८ । ।
म्हणोनि सख्य देवासि करावेहितगुज तयासि सांगावेआठवे भक्तीचे जाणावेलक्षण ऐसे । । - -३१ । ।
सख्य भक्ती झाली की भगवंतालाच भक्ताशिवाय करमत नाही .कबीर म्हणतो :
मनवा तो मरही गयोदुर्बल भयो शरीरपीछे फिरत प्रभूरामकहत कबीर कबीर

Thursday, February 19, 2009

दास्य भक्ती

दास्य भक्ती
दास्य भजन ते दास्य जाणेपडिले कार्य तितुके करावेसदा सन्निधचि असावेदेवद्वारी । । - - । ।
दास्य भक्ती म्हणजे देवाजवळ सतत राहून पडेल ते काम करावे ,काम प्रेमपूर्वक मन :पूर्वक करावे .
दास्यभक्तीच्या नावातच भक्ताने परमेश्वराचा दास व्हावयाचे आहे .या भक्तीत संपूर्ण शरणागती अपेक्षित आहे .दास्य भक्तीत अग्रगण्य मारूती आहे .मारूतीने श्रीरामाचे जे दास्य केले त्याला कोठेही तोड़ नाही .अहंकाराचे संपूर्ण विसर्जन करून रोमारोमात श्रीरामांची मूर्ती धारण करणारा हनुमंत अजोड आहे .
श्रीसमर्थ स्वत:ला रामदास म्हणवतात .कबीर म्हणतात -मै गुलाम मैं गुलाम ,मैं गुलाम तेरातू साहिब है मेरा
तुकाराम महाराज म्हणतात :तरीच जन्मास यावेदास विठ्ठलाचे व्हावे
दास्यभक्तीत दासाने केलेले कर्म हे भगवंत किंवा सद्गुरु घडवून आणतात असा भाव असतो .समर्थ म्हणतात :
भक्तांचेनि साभिमानेकृपा केली दाशरथीनेसमर्थ कृपेची वचनेतो हा दासबोध । । २० -१० -३० । ।
दाशरथी श्रीरामांनी आपल्यावर उदंड कृपा केली आहे .आणि ह्या भक्ताच्या स्वाभिमानाचे रक्षण करण्यासाठी श्रीरामांनी [येथे समर्थ हा शब्द्द श्रीरामांसाठी वापरला आहे .]जी वचने माझ्याकडून बोलावली तोच दासबोध आहे .
दास्य भक्तीत भगवंताच्या /सद्गुरूच्या सतत सहवासात राहून देवाचे वैभव वाढवावे ,कोणत्याही प्रकारची न्यूनता पडणार नाही याची काळजी घ्यायला समर्थ सांगतात .त्यासाठी देवळांची दुरुस्ती करणे,सोपे ,धर्मशाळा बांधावे ,
देवाच्या वैभवासाठी हत्ती ,रथ ,सिंहासने ,पालख्या ,निशाणे या वस्तूंचा सांभाळून ठेवणे असे सांगतात .देवांच्या मौल्यवान वस्तू नीट ठेवण्यासाठी जागा ठेवाव्या असे सांगतात .या सर्व सूचना समर्थांनी ते २४ ओव्यांमध्ये केले आहे समर्थ २५ व्या ओवीत म्हणतात :
सकळांचे करावे पारपत्यआलयाचे करावे आतित्यऐसी जाणावी सत्यसातवी भक्ती । । देवा कड़े येणा-या सगळ्यांचा आदरसत्कार करावा ,त्यांचा पाहूणचार करावा त्यांना हवे नको पहावे .
वचने बोलावी करूणेचीनाना प्रकारे स्तुतीचीअंतरे निवती सकलांचीऐसे वदावे । । - -२७ । ।
देव कार्यासाठी सर्वस्व अर्पण करणे याला एकनाथ महाराज दास्य भक्ती म्हणतात
मी देवासाठी आहे अशा भावनेने काम करून देवाकडे येणा-या सर्वांची सेवा करण्यास तत्पर व्हावे ,आपल्या वाट्याला आलेले काम तत्परतेने करायला सांगतात .
दास्यभक्ती अहंकारातून नाही तर निरपेक्ष आनंदातून घडावी असे सर्व संत सांगतात
भक्ते धरावा अभिमाननापेक्षावा मानसन्मान करावे दांभिक भजनअभिलाष जाण धरावा । ।
दास्यपर अभंगात श्रीसमर्थ म्हणतात :
रामदास्य आणि हे वाया जाइलहे घडे कदाकाळी
कदाकाळी रामदास उपेक्षिनारामुपासना ऐसी आहे
ऐसी आहे सार राघोबाची भक्तीविभक्तीची शक्ती तेथे नाही
जेथे नाही काही वाऊगे मायिकराम उपासक दास म्हणे
सेवा केल्याशिवाय खाणे पिणे रुचणे ,सेवा झाली नाही तर चित्त व्याकुळ होणे,ही परिसीमा आहे .