Monday, March 29, 2010

मोक्ष लाभे किती दिवसी ?

नेहमी असा प्रश्न पडतो की लोक साधना करतात ,त्यांना सत्समागम घडतो तरीही त्यांना ब्रह्म दर्शन घडत नाही असे का ?म्हणून श्रोता प्रश्न विचारतो :
श्रोता विनवी वक्तयासी सत्संगाची महिमा कैसी मोक्ष लाभे कितां दिवसी हे मज निरोपावे - -
धारिता साधूची संगती कितां दिवसां होते मुक्ती हा निश्चय कृपामूर्ती मज दिनास करावा - -
श्रोता वक्त्याला विनंती करतो की आपण सत्संगाचा महिमा सांगता ,जर सत्संग लाभला तर किती दिवसात मोक्ष प्राप्त होतो ते सांगावे .सत्पुरुषाची संगत धरल्यावर किती दिवसात ब्रह्मदर्शन घडून मुक्ती लाभते ते सांगावे .
वक्ता उत्तर देतो :
मुक्ती लाभे त्क्षणी विश्वासता निरूपणी दुश्चितपणी हानी होतसे - -
सत्पुरुष जो उपदेश करतो त्यावर संपूर्ण विश्वास ठेवावा की ताबडतोब आत्मज्ञानाने मुक्ती लाभते .दुश्चित्तपणे मात्र हानी होते .यावर श्रोता म्हणतो :
सुचितपणे दुश्चित्त मन होते अकस्मात त्यास करावे निवांत कोणेपरी - -
मन सूचित असते पण एकाएकी दुश्चित्त होते .मग मन अशांत होते ते एकाग्र चित्त कसे व्हावे ते कृपा
करून सांगावे .त्यावेळेस समर्थ सांगतात :
मनाच्या तोडून वोढी श्रवणी बैसावे आवडी सावधपणे घडीने घडी काळ सार्थक करावा - -
आपले मन निरनिराळया वस्तूंकड़े ,विषयांकड़े ओढले जाते .ते प्रथम थांबवावे .आवडीने श्रवण करायला
बसावे .वेळ वाया जाऊ देता त्याबद्दल सावध असावे .वेळ सार्थकी लावावा .आपण जो ग्रन्थ श्रवण करतो त्यातील अर्थ प्रमेय सिद्धांत शोधून काढावे आपल्या बुध्दीत साठवावे असे समर्थ सांगतात .
मोक्ष केव्हा मिळेल ते सांगताना समर्थ म्हणतात :
लोहो परिसेसी लागला थेंबुटा सागरी मिळाला गंगे सरीते संगम झाला त्क्षणी - -४३
सावध साक्षपी आणि क्ष त्यास तत्काळचि मोक्ष इतरांस ते अलक्ष क्षिले नवचे - -४४
येथे शिष्य प्रज्ञा केवळ प्रज्ञावंता नलगे वेळ अनन्यास तत्काळ मोक्ष लाभे - -४५
प्रज्ञावंत आणि अनन्य तयास नलगे येक क्षण। अनन्य भावार्थे विण प्रज्ञा खोटी - -४६
प्रज्ञेविण अर्थ कळे विश्वासेविण वस्तू कळे प्रज्ञाविश्वासे गळे देहाभिमान --४७
देहाभिमानाचे अंती सहजचि वस्तूप्राप्ती सत्संगे सद्गती विलंबचि नाही --४८
सावध साक्षेपी विशेष प्रज्ञावंत आणि विश्वास तयास साधनी सायास करणेंचि नलगे - -४९
इतर भाविक साबडे तयांसहि साधने मोक्ष जोड़े साधुसंगे तत्काळ उडे विवेकदृष्टी - -५०
लोखंड परिसाला लागले की त्क्षणी सोने बनते ,थेंब सागरात पडला की त्क्षणी सागर बनतो .नदी गंगेला मिळाली की त्क्षणी गंगा बनते .त्याप्रमाणे जो अत्यंत सावध ,कष्टाळू ,त्पर आहे त्यास सत्समागमामध्ये ताबडतोब मोक्ष प्राप्त होतो .ज्याच्या अंगी हे गुण नाहीत त्यांना मोक्ष लाभत नाही .
परमार्थाच्या अनुभवासाठी ,ब्रह्मानुभावासाठी त्याची बुध्दी तयार व्हावी लागते ,सू क्ष्म व्हावी लागते ,तरच त्क्षणी मोक्ष मिळतो .ज्याची बुध्दी अत्यंत सूक्ष्म आहे अनन्य श्रध्दा आहे त्याला स्वरूपसाक्षात्काराला वेळ
लागत नाही .पण अनन्य श्रध्देशिवाय सूक्ष्म बुध्दीचा उपयोग होत नाही .
सूक्ष्म बुध्दी नसेल तर सद्गुरु जे सांगतात ते कळत नाही अनन्यता नसेल तर आत्मवस्तू आकलन
होत नाही. प्रज्ञा अनन्यता दोन्ही असेल तर देहाभिमान ,देह्बुध्दी गळून पडते .मी देह आहे या भावनेचा नाश झाला की आत्मवस्तू सहज लाभते .
जे श्रध्दावंत भोळे असतात अशांना साधनाने मोक्ष मिळतो .सत्समागम झाला की विवेकशक्ती निर्माण होते सदवस्तूचे दर्शन घडते .सत्पुरुष आत्मशक्ती निर्माण करणारे चालते बोलते यंत्र असते .जो जीव सत्पुरुषाच्या संगतीत येतो ,त्याच्यात आत्मशक्ती सारखी ओततो .जो प्रज्ञावं ,श्रध्दावंत असतो त्याला संतांकडून संक्रमित झालेली आत्मशक्ती पचते,आत्मदर्शन होते ,प्रतिभा जागी होते .
ज्ञान झाले ,आत्मदर्शन झाले तरी साधना सोडू नये असे समर्थ सांगतात .समर्थ म्हणतात :
परी ते साधन मोडू नयेनिरूपणाचा उपायेनिरुपणे लागे सोयेसर्वत्रांसी । । - -५१ । ।

Saturday, March 27, 2010

मूलमायेत पंचमहाभूते कशी निर्माण होतात ?

मूळमाया गुणापरती तिथे भूते कैची होती ऐसी आशंका हे श्रोती घेतली मागां - -६६
मूळमायेत त्रिगुणांना स्थान नाही , मग तेथे पंचभूतांचा उगम कसा होतो ?अशी शंका श्रोत्यांनी घेतली .त्याचे उत्तर समर्थ . . मध्ये देतात :
ब्रह्मी मूळमाया जाली तिच्या पोटी माया आली मग ते गुणा प्रसवली म्हणौनि गुणक्षोभिणी - -
पुढे तिजपासाव कोण सत्वरजतमोगुणतमोगुणा पासून निर्माणजाली पंचभूते । । - - । ।
ऐसी भूते उद्भवलीपुढे तत्वे विस्तारिलीएवं तमोगुणापासून जालीपंचमहाभूते । । - । ।
परब्रह्मा मध्ये मूळमाया झाली ,तिच्या पोटी माया जन्माला आली ,मायेने त्रिगुण [सत्व ,रज ,तम ] जन्माला
घातले .तिला गुणक्षोभिणी म्हणतात .तमोगुणापासून पंचमहाभूते निर्माण झाली .
पंचमहाभूते कोणती ती कशी ओळखावी?
पृथ्वी ,आप ,तेज वायु ,आकाश ही पंचमहाभूते आहेत .
वोळखी नाही अंतरीते वोळखावी कोणेपरीम्हणोनी भूतांची चतुरीनावेक परिसावी । । - - । ।
जे जे जड़ आणि कठीणते ते पृथ्वीचे लक्षणमृद आणि वोलेपणतितुके आप । । - -१० । ।
जे जे उष्ण आणि सतेजते ते जाणावे पैं तेजआता वायोही सहजनिरोपिजेल । । - -११ । ।
चैतन्य आणि चंचळतो हा वायोचि केवळमुख्य आकाश निश्चळआकाश जाणावे । । - -१२ । ।
महाभूते कशी ओळखावी ते समर्थ सांगतात :
जे जे जड कठीण आहे ते पृथ्वीचे क्षण आहे .जे मऊ ओलेपण आहे ते जलाचे ल्क्षणआहे जे जे गरम प्रकाश युक्त आहे ते तेजाचे क्षण आहे .जिवंतपण आणि हालचाल हे वायूचे क्षण आहे पोकळपणा ,अवकाश
स्तब्ध पणा हे आकाशाचे क्षण आहे .
पंचमहाभूते एकमेकात कशी मिसळलेली असतात ?
पंचमहाभूतांपैकी प्रत्येक भूतात इतर चार भूते मिसळलेली असतात .आकाशात इतर भूते कशी मिसळलेली असतात ते पाहू .
आकाश म्हणजे अवकाश सून्यसून्य म्हणिजे ते अज्ञान
अज्ञान म्हणिजे जड़त्व जाणतेचि पृथ्वी । । - -१६ । ।
आकाश स्वये आहे मृदतेचि आप स्वतसिध्दआता तेज तेंही विशदकरून दाऊँ । । - -१७ । ।
अज्ञाने भासला भासतोचि तेजाचा प्रकाशआता वायो सावकाशसाकल्य सांगो । । - -१८ । ।
वायु आकाशा नाही भेदआकाशा इतुका असे स्तब्धतथापी आकाशी जो निरोधतोचि वायो । । - -१९ । ।
आकाश म्हणजे अवकाश ,पोकळी ,शून्यमय .शून्य म्हणजे अज्ञान .अज्ञान म्हणजे जड़त्व .जड़त्व तेच
पृथ्वी .आकाश स्वत : मऊ आहे .मऊपणा हे आकाशातले पाणी .अज्ञानाने जो भास होतो तो तेजाचा
प्रकाश असतो .वायू आकाशा इतका स्तब्ध असतो .आकाशात जो प्रतिकार ,सूक्ष्म अटकाव असतो
तो वायू असतो .
आता वायूत इतर भूते कशी मिसळतात ते पाहू .
हळू फूल तरी जडहळू वारा तरी निबिड़वायो लागता कडाडमोडती झाडे । । - -२२ । ।
मृदपण तेचि आपभास तेजाचे स्वरुपवायो तेथे चंचळरूपसहजची आहे । । - -२६ । ।
सकळांस मिळेन आकाशसहजचि आहे अवकाशपंचभूतांचे क्षणवायोमध्ये निरोपिले । । -- २७ । ।
फूल हलके असेल तरी त्याला वजन असते .तसा वारा हलका असला तरी त्यास घनपणा असतो ,कठीण पणा असतो .येथे श्रोते क्षे घेतात ,की सध्या नुसत्या पंचभूतांचे वर्णन चालू आहे दृश्य पदार्थांचे निर्माण झाले नाही तर अशा निराकार अवस्थेत झाडे असणार नाहीत .समर्थ सांगतात निराकार अवस्थेत झाडे नव्हती पण शक्ती होतीच .शक्तीत कठीणपणा असतोच तो पृथ्वी चा गुण .वायू मधील मऊपणा हा पाण्याचा गुण .वायूतील भास हा तेजाचा गुण .चंचळपणा हा वायूचा गुण .सर्वांना सामावून घेणे हा आकाशाचा गुण .वायू मध्ये कठीणपणा ,मऊपणा ,भास ,चंचळपणा हे गुण सामावलेले आहेत .म्हणून वायूत आकाश आहे .
तेजात इतर भूते कशी सामावली आहेत ते पाहू .
आता तेजाचे क्षणभासलेपण ते कठीणतेजी ऐसी वोळखणपृथ्वीयेची । । - -२८ । ।
भासला भास वाटे मृदतेजी आप तेचि प्रसिध्दतेजीं तेज स्वतसिध्दसांगाणेचि लगे - -२९ । ।
तेजी वायो तो चंचळतेजी आकाश निश्चळतेजी पंचभूते सकळनिरोपिली । । - -३० । ।
तेजाने भास होतो ,प्रत्यक्ष काही तरी दिसते .इंद्रीयांना गोचर होते .काहीतरी कठीण पणा त्यात असतो म्हणून दिसते .कठीण पणा हा पृथ्वीचा अंश .भास अनुभवाला येतो तो मऊ असतो .ईंद्रियांना प्रत्ययास येतो .तो मृदूपणा म्हणजे पाण्याचा अंश .तेजात तेज असतेच .तेजात आढळणारी चंचलता हा वायूचा अंश .त्यात आढळणारी स्तब्धता हा आकाशाचा अंश .
आता आपात सगळी भूते कशी सामावली ते पाहू .
आता आपाचे लक्षण । आप तेचि मृदपणमृदपण ते कठीणतेचि पृथ्वी । । - -३१ । ।
आपी आप सहजचि असेतेज मृदपण भासेवायो स्तब्धपणे भासेमृदत्वाअंगी । । - -३२ । ।
आकाश सांगणे लगेते व्यापकची स्वभावेआपी पंचभूतांची नावेसूक्ष्म निरोपिली । । -- ३३ । ।
पाण्याचे ल्क्षण मृदुपणा .पाणी मऊ असेल तरी त्यात थोड़ा तरी कठीण पणा असतोच ..तोच पृथ्वीचा
अंश .तेजामुळे पाण्यातील मृदुपणा अनुभवास येतो .मऊपणातील स्तब्धता हा वायूचा गुण समजावा .सर्वाना व्यापून टाकणे हा आकाशाचा गुण .तो पाण्यात असतोच .
आता पृथ्वीत सर्व भूते कशी सामावली आहेत ते पाहू .
आता पृथ्वीचे क्षणकठीण पृथ्वी आपणकठिणत्वी मृदपणतेचि आप । । - -३४ । ।
कठिणत्वी जो भासतोचि तेजाचा प्रकाशकठिणत्वी निरोधांशतोचि वायो । । - -३५ । ।
आकाश सकळास व्यापकहा तो प्रगटचि विवेकआकाशींच कांही येकभास भासे । । -- ३६ । ।
कठीणपणा हा पृथ्वीचा गुण .कठीणपणात जो मऊपणा आढळतो तो आपाचा गुण .कठीणपणाचा जो प्रत्यय येतो तो तेजाचा अंश .कठीणपणात जो प्रतिकार आढळतो तो वायूचा अंश .आकाश सगळयांना व्यापून असते .
पंचभूते तत्वे कशी झाली ?
मूळमायेत असणारी सूक्ष्म पंचभूते त्रिगुणांमुळे स्पष्ट दशेला येतात .मग त्यांना दृश्य स्वरुप प्राप्त झाल्यावर तत्वे निर्माण होतात .