Monday, January 31, 2011

लोकसंग्रह करणा-याची चातुर्य लक्षणे

लोकसंग्रह करणा-याची चातुर्य लक्षणे

जो लोकसंग्रह करतो ,तो अनेक लोकांच्या संपर्कात येतो ।तेव्हा तो कसे चातुर्य दाखवतो त्यावर त्याचे लहानपण थोरपण ठरते . समर्थ म्हणतात ;

बहुतांचे बोलीं लागले | ते प्राणी अनुमानी बुडाले | मुख्य निश्चये चुकले | प्रत्ययाचा ||१५-६-१०||

उदंदांचे उदंड ऐकावे |परी ते प्रत्यये पहावे |खरे खोटे निवडावे | अंतर्यामीं ||१५-६-११||

जेव्हा एखादा लोकसग्रह करू इच्छितो ,तेव्हा त्याला पुष्कळ लोकांचे ऐकावे लागते .अनेकांची अनेक मते ऐकून त्याचा गोधळ उडतो ,,तो अनुमान काढतो ,.समर्थांचा प्रत्यक्ष प्रत्यायावर विश्वास आहे .म्हणून ते सांगतात की प्रत्यक्ष अनुभवाने एखाद्या गोष्टीचा खरे खोटेपणा ठरवता येतो .

त्याला सगळ्यांचे सगळे ऐकावे लागते .कोणालाही तो नाही म्हणू शकत नाही .पण एखादी गोष्ट करताना त्या गोष्टी मुळे काय चागले वा काय वाईट होईल हे प्रत्यक्ष प्रत्ययाने समजावून घ्यावे असे समर्थ म्हणतात .जरी एखादा माणूस हेकट असला ,कमअक्कल असला तरी प्रसंग पाहून त्याचे म्हणणे त्याला ऐकावे लागते .

अंतरी पीळ पेच वळसा | तोचि वाढवी बहुवसा | तरी मग शहाणा कैसा | निववू नेणे ||१५-६-१४ ||

माणसाने पीळ पेच वाकडेपणा ठेवला तर तो वाढत जातो .अशा माणसाला शहाणा तरी कसे म्हणावे ? कारण वाकडेपणा धरून लोकांचे अंत:करण त्याला निवविता येत नाही .म्हणून लोकांत वाद वाढवणारा मूर्ख असतो .जो वेड्यांनाही शहाणे करतो तो प्रशंसनीय असतो .

अत्यंत महत्वाची गोष्ट [दुस-याला वश करून घेण्यासाठी ]समर्थ सांगतात :

दुस-याचे चालणी चालावे | दुस-याचे बोलणी बोलावे | दुस-याचे मनोगते जावे |मिळोनिया ||१५-६-१७||

दुस-याच्या मनासारखे वागून त्याचे मन वश करून घेण्यास समर्थ सांगतात .मग त्याची हळू हळू उकल करायला सांगतात .म्हणजे त्याचे प्रश्न ,त्याचे अंतरंग हळू हळू समजून घ्यायला सांगतात .दुसरा वागेल तसे वागावे ,तो बोलेल तसे बोलावे ,की मग दुस-याचा मनोगतात समरस होउन जाता येते .त्यासाठी तो दुस-याचे हित पहातो ,त्याच्या हिताविरूध्द तो काही करत नाही .त्याला शिकवता शिकवता त्याचे अंतरंग सुधारतो .त्यासाठी दुस-याचे मन वश करून घेतो त्याच्या मनातील गुंतागुंत उकलतो. त्याला परमार्थ मार्गाला लावतो

उगीच करिती बडबड | परी करून दाखवणे हे अवघड |.परस्थळ साधणे जड |अवघड आहे ||१५-६-२१||

वायफळ बडबड करणे सहज जमते ,पण प्रत्यक्ष कृती करणे अवघड असते .म्हणून लोकसंग्रही पुरुषाने वायफळ बडबड नं करता प्रत्यक्ष कृती करावी .त्यासाठी प्रसंग पाहून बोलावे ,पण जाणतेपणा आपल्याकडे घेउ नये .मी खूप ज्ञानी आहे ,अशी भावना लोकांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये .

लोकसग्रह करणे फार कठीण गोष्ट आहे .कारण अनेक प्रकाराचे लोक भेटतात ,कोणी मार्गात संकटे निर्माण करतात .कोणी अपशब्द बोलतात .अपशब्द बोलले तर ते गिळावे लागतात .सर्वत्र संचार करताना शहरे ,गावे हिडावी लागतात .माणसे सूक्ष्म पणे पारखावी लागतात .त्यांच्यातील घेण्यासारखे गुण घ्यायचे असतात .सावधपणा ठेउन सगळी कडील बातमी घ्यावी असे समर्थ सांगतात .

नाना जिनस पाठांतरे | निवली सकळांची अंतरे | लेहोन देर्ता परोपकारे | सामी सांडावी ||१५-६-२७ ||

ज्याचे पुष्कळ विषयांचे ज्ञान पाठ असते ,ते दुस-याला सागितले ,तर दुस-याला समाधान होते ,समोरच्या माणसाला जे हवे ते दिले तर माणसाला श्रेष्ठत्व येते .अनेक लोक अशा माणसाच्या भजनी लागतो .तोच माणूस लोक संग्रह करू शकतो

Tuesday, January 11, 2011

विश्व रचना -प्रकृती पुरुष यांचा खेळ

विश्वरचना : प्रकृती व पुरुष यांचा खेळ

मूळमाया हे विश्वरचनेचे मूळ आहे .प्रकृती व पुरुष ही मूळमयेची दोन अंगे आहेत .प्रकृती पंचभूतात्मक आहे तर तिच्यातील जाणीव पुरुष आहे .सृष्टीमधील विविधता त्रिगुणांची बनलेली असते .जसा प्रत्येक चराचराच्या ठिकाणी अंतरात्मा असतो ,तसा या विश्वाला सांभाळ करणारा अंतरात्मा असतो त्याला विश्वात्मा म्हणतात .तो या विश्वाचा नियंता असतो .समर्थ म्हणतात :

दोघां ऐसा तीन चालती | अगुणी अष्टधा प्रकृति | अधोर्ध सांडूनी वर्तती | ईंद्रफणी ऐसी || १५-५-१ ||

पणतोंडे भक्षितो पणजा | मूल बापास मारी वोजा | चुका-या गेला राजा | चौघा जणांचा || १५-५-२ ||

विश्वरचना म्हणजे जणू प्रकृती व पुरुष यांचा खेळच ! अशी कल्पना केली .समर्थ म्हणतात ;दोघां ऐसे तीन चालती शक्तीमय प्रकृती व जाणीवमय पुरुष यांच्या मार्गदर्शना खाली सत्व ,रज ,व तम हे तीन गुण चालतात .तीन गुण व पंचमहाभूते मिळून अष्टधा प्रकृती बनते . ती सूक्ष्म रूपात निर्गुण परब्रह्म रूपात असते .पण परब्रह्म निश्चळ असल्याने ते काही करत नाही .दृश्य विश्व जड असल्याने काही कळत नाही .म्हणून सूक्ष्म व चंचळ अष्टधा प्रकृती सर्व विश्व खेळ खेळते .

विश्वाच्या उभारणी साठी कारणीभूत असलेल्या दोन अंगांपैकी पुरुष म्हणजे मूळपुरुष आहे . अंतरात्मा त्याचा मुलगा आहे .सत्वगुण किंवा विष्णू ,नातू रजोगुण किंवा ब्रह्मदेव ,पणतू तमोगुण किंवा महेश .मूळपुरुष अंतरात्मा पणजोबा जो ज्ञानमय असतो .सत्वगुण म्हणजे स्वस्वरूपासाठी असलेली त्याची आवड .रजोगुण किंवा ब्रह्मदेव म्हणजे विषयासंबधी आसक्ती ! या विषयासक्ती मुळे माणूस भगवंताला विसरतो .कारण तो अज्ञानात अडकतो ,सत्वगुण विसरतो ,तमोगुण म्हणजे अज्ञान .तमोगुण अंतरात्म्याला म्हणजे पणजोबाला झाकतो .मुलगा बापाला मारतो ,म्हणजे रजोगुण सत्वागुणाला बाजूला सारतो .अंतरात्म्याचा म्हणजे स्वस्वरूपाचा लोप होतो आणि परब्रह्माची प्राप्ती होते .

शाश्वत ब्रह्म कसे ओळ्खावे?

शाश्वत ब्रह्म कसे ओळखावे ?

शाश्वत परब्रह्म ओळखण्यासाठी मायेने निर्माण झालेल्या या दृश्य विश्वाचे निरसन करावे लागते .त्यासाठी समर्थ विश्वाची उभारणी सांगतात .त्या आधी जे जे या दृश्य विश्वात निर्माण होते ते ते पृथ्वीमध्ये सामावते असे सांगून मग पंचभूतांचे निरसन सांगितले .

पृथ्वीपासून जाली झाडे | झाडापासून होती लाकडे | लांकडे भस्मोन पुढे | पृथ्वीच होये | |१५-४-१ | |

दृश्य जगच मुळात जडद्रव्यापासून निर्माण झाले .या जगात असलेले सर्व जीव शरीरात राहतात .शरीर पंचमहाभूतांपासून निर्माण झाले , जडद्रव्यापासून बनते .त्यामुळे पृथ्वी विश्वाला आधार असते .

पृथ्वीवर झाडे निर्माण होतात .झाडांपासून लाकडे निर्माण होतात .लाकडे जाळून त्याची राख होते .राख म्हणजे माती ,म्हणजेच पृथ्वी ! झाडावर येणारी पाने ,फुले ,फळे वाळतात ,कुजतात शेवटी त्यांची राख होते .म्हणजेच माती होते .

निरनिराळी धान्ये तयार होतात .त्यापासून अन्न तयार होते .माणसे अन्न खातात .त्याची विष्ठा होते .विष्ठा वाळून भुगा झाला की माती बनते .पशु पक्षी अन्न खातात .त्याची विष्ठा होते .ति वाळून भुगा झाला की माती होते .पृथ्वीत मिसळते .सर्व सजीव मरतात .त्यांना जाळतात ,पुरतात ,त्यांची माती होते .ते मातीत मिसळतात .जे जे निर्माण होते ते काही काळ टिकते ,अखेर नाश पावते .ही गोष्ट झाली सजीवांची .तसेच निर्जीव धातूं बद्दल समर्थ सांगतात :

मातीचे होते सुवर्ण | आणि मृत्तिकेचे होती पाषाण | माहां अग्निसंगे भस्मोन | पृथ्वीच होये | |१५-४-१२ ||

मातीचे सोने बनते .मातीचाच पाषाण होतो .अग्नीने पाषाणाची राख होते .शेवटी मातीच होते .सोन्यापासून जर तयार होते .,ति कुजते ,तिला वितळवून रस होतो .पुन्हा मातीच होते .पृथ्वी पासून तयार झालेले पदार्थ उत्पन्न होतात व पृथ्वीत मिसळतात .तसे विश्व मूळमायेतून प्रगट होते व तिच्यातच मिसळते .

पंचभूतांचे हे विश्व मूळमायेत कसे विलीन होते ते समर्थ सांगतात :

आप आळोनि पृथ्वी जाली | पून्हा आपीच विराली | अग्नी योगे भस्म जाली |म्हणोनिया || १५-४-१९ ||

आप जाले तेजापासून | पुढे तेजे घेतले सोखून |ते तेज जाले वायोचेनी |पुढे वायो झडपी ||१५-४-२० ||

वायो गगनी निर्माण जाला |पुढे गगनीच विराला |ऐसे खांजणीभांजणीला बरे पहा || १५-४-२१ ||

पाणी आटून पृथ्वी झाली .अग्नीने पृथ्वीला जाळले ,भस्म केले की पृथ्वी पाण्यात विरते .पाणी तेजापासून निर्माण होते .पाण्याला तेज शोषून घेते .तेज वायू पासून निर्माण होते .वायू तेजाला विझवते .वायू आकाशापासून निर्माण होतो ,तो आकाशात लीन होतो .असा पंचभूतांचा नाश होतो .

भूत म्हणिजे निर्माण जाले | पून्हा मागुते निमाले | पुढे शाश्वत उरले | परब्रह्म ते || १५-४-२३ ||

जे जे निर्माण झाले ते ते सर्व भूत .पंचमहाभूते ही निर्माण झाली आहेत ,म्हणजे त्यांचा नाश आहेच .मग जे उरते ते परब्रह्म ! म्हणजेच मायेने निर्माण झालेल्या या दृश्य विश्वाचा निरास झाला की प्रत्यक्ष अनुभव येतो निर्गुण ,निराकार परब्रह्माचा !

अवतारी कोण ?

अवतारी कोण ?

विश्वाचा पसारा पंचमहाभूतांचा आहे ।ज्याप्रमाणे दोरा शेवटपर्यत असतोच तसा पंचभूतांच्या या दृश्य विश्वात अंतर्यामी पणे वास करतो .

मुळापासून सैरावैरा | अवघा पंचीकर्ण पसारा | त्यात साक्षत्वाचा दोरा | तोही तत्वरूप | | १५-३-१ | |

पंचभूतानी निर्माण केलेल्या दृश्य विश्वाच्या मुळापर्यंत गेले तर आपल्याला जावे लागते .त्यावरून लक्षात येते की या पसा-यात साक्षीभावाने राहतो तो अंतरात्मा ! जसा एखादा राजा सिंहासनावर बसलेला असतो ,त्याचे सैन्य दोन्ही बाजूला दाटून उभे असते ,तसे या जगात आढळणारी तत्वे फौजेसारखी आहेत .त्या तत्वांचा साक्षी असणारा अंतरात्मा राजासारखा असतो .

देहमात्र अस्तिमांशाचे | तैसेची जाणावे नृपतिचे |मुळापासून सृष्टीचे | तत्वरूप | | १५-३-३ | |

रायाचे सत्तेने चालते | परंतू अवघी पंचभूते | मुळी अधिक जाणीवेचे | अधिष्ठान आहे | |१५-३-४ | |

सैनिक जसा हाडांमासांचा असतो तसा राजाही असतो ,तसे पंचभूतात्मक जगत व त्याचा साक्षी तत्वरूपच असतात .राज्याच्या सत्तेने सैन्य चालते ,राजा व त्याचे लोक पंचभूतात्मक असले तरी राज्याच्या ठिकाणी सत्ता अधिक असते .पण अंतरात्मा जाणीवेच्या अधिश्ठानाने श्रेष्ठ ठरतो . म्हणून तो दृष्टा साक्षी असतो ,पं ते केवळ दृश्य विश्व असे पर्यंत .

विवेके बहु पैसावले | म्हनौन अवतारी बोलिले | मनु चक्रवर्ती जाले | येणेची न्याये | |१५-३-५ | |

मी देह नाही ,मी आत्मा आहे ,हा विवेक ज्यांच्या कडे मोठ्या प्रमाणात असतो ,त्यांना अवतारी पुरुष म्हणतात .

आपण सर्वसाधारण पणे वयावर मोठेपण ठरवतो .जो वयाने मोठा तो मोठा असे म्हणतो .पण प्रत्यक्षात ज्याच्यात बुद्धीची आत्मानात्म विवेकाची मोठी वाढ झालेली असते तो थोर ! कारण त्याच्यात सर्वज्ञानसंपन्न ,सर्वगुणसंपन्न ,सर्वसामर्थ्यसंपन्न अशा अंतरात्म्याला जागा करण्यासाठी ,त्याच्यात गुणांची ,बुद्धीची ,आत्मानात्मविवेकाची वाढ झाली असते .अंतरात्मा जागा होतो ,तेव्हा त्याच्यातील जाणीव विशाल होते ,तेव्हा त्याला अवतारी पुरुष म्हणतात .अशी विशाल जाणीव असलेली माणसेच खरी थोर व भाग्यशाली असतात .कारण त्यांनी आपल्या जन्माचे सार्थक केलेले असते .


Saturday, January 8, 2011

श्री समर्थांच्या निस्प्रुहाचा लोकसंग्रह

श्री समर्थांच्या निस्पृहाचा लोकसंग्रह

वाईट सामाजिक परिस्थितीत एखादा आगळा वेगळा असतो तो एक क्षणही वाया जाउ देत नाहीत .तो चतुर ,बुध्दिमान ,तारतम्य असणारा असतो .तो वाईट परिस्थिती मध्ये मार्ग काढतो ,कौशल्याने लोकसंग्रह करतो .त्यासाठी त्याच्या अंगी गुण असावे लागतात .ते कोणते ते समर्थ सांगतात :

नाना जिनस उदंड पाठ | वदो लागला धडधडात | अव्हाटची केली वाट | सामर्थ्यबळें | |१५-२ -१५ | |

प्रबोधशक्तींची अनंत द्वारे | जाणे सकालांची अंतरे | निरुपणे तदनंतरे | चटक लागे | |१५-२-१६ | |

मते मतांतरे सगट | प्रत्यये बोलून करी सपाट | दंडक सांडून नीट | वेधी जना | |१५-२-१७ | |

नेमके भेद्के वचने |अखंड पाहे प्रसंग माने | उदास वृत्तीच्या गुमाने | उठोन जातो | |१५-२ १८ | |

श्री समर्थांच्या निस्पृहाला अनेक विषयाचे ज्ञान पाठ असते .त्यामुळे तो सांगू लागतो .

लोकांना योग्य मार्गावर आणण्याचे अनेक उपाय तो जाणतो . लोकांचे अंत:कारण तो जाणत असल्याने ,लोकांना निरुपण ऐकण्याची गोडी कशी वाटेल ते तो जाणतो .त्याचे ज्ञान केवळ शब्दज्ञान नसून ते अनुभवजन्य असते त्यामुळे सगळी मते व मतांतरे तो खोडून काढतो लोकांना तो योग्य मार्गदर्शन करतो .त्याची निरुपणे ऐकून लोकांचे संशय नाहीसे होतात .प्रसंगानुसार तो वागतो .

तो कसा वागतो ?

प्रत्यये बोलोन उठोन गेला | चटक लागली लोकांना | नाना मार्ग सांडून त्याला | शरण येती | | १५-३-१९ | |

परी तो कोठे आडळेना | कोणे स्थळी सांपडेना | वेष पाहता हीन दीना | सारिखा दिसे | |१५-२-२० | |

उदंड करी गुप्तरूपे | भिका-यासारिखा स्वरूपे | तेथे यश कीर्ती प्रतापे | सीमा सांडिली | | १५-२-२१ | |

खनाळा मध्ये जाउन राहे | तेथे कोणीच न पाहे | सर्वत्रांची चिंता वाहे | सर्वकाळ | | १५-२-२३ | |

तो स्वानुभवाचे बोल बोलत असल्याने लोकांच्या मनाला जाउन भिडते .त्यामुळे त्याचे बोलणे ऐकण्याची लोकांना चटक लागते .मग लोक त्याला शरण जातात .त्याचे विशेष असे असते की तो कोठेही सापडत नाही .त्याचा वेषही हिनादिना सारखा असतो .तो कोणत्याही कार्यात पुढाकार घेत नाही .तो लोकांकडून काम करवून घेतो .दिसायला तो जरी भिका-या सारखा दिसत असला ,तरी त्याचे यश ,कीर्ती ,प्रताप सर्वत्र पसरतो .जेथे कोणी पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी तो राहतो .एकांतात तो सतत लोकांच्या हिताची काळजी वाहतो .लोकांना त्याच्या शिवाय चैन पडत नाही .ते त्याला शोधत येतात .मोठा लोकसंग्रह तो करतो .मोठी संघटना तो निर्माण करतो .स्वत : गुप्त रहातो .पण त्याची लोकांवर सत्ता चालते .त्याचे अनुयायांचे समूह ठिकठिकाणी असतात .लोक त्या समूहांकडे आकर्षिले जातात .त्यामुळे परमार्थ बुद्धी दूरवर पसरते .उपासनेचा गजर ऐकू येतो .लोकांना त्याच्या ज्ञानाचा प्रत्यय येतो .

भारतीय समाजाची स्थिती

समर्थ कालीन भारतीय समाजाची स्थिती कशी होती ?

श्रोते प्रश्न विचारतात ,महाराज ,आपण देशभर पर्यटन केलेत ,तेव्हा समाज स्थिती कशी आहे ते कृपा करून आम्हाला सांगा .समर्थ सांगतात :

जितुक्या मूर्ती तितुक्या प्रकृती | सारिख्या नस्ती आदी अंती | नेमची नाही पाहावे किती | काये म्हणोनि | | १५-२-२ | |

म-हाष्ट देश थोडा उरला | राजकारणे लोक रुधिला | अवकाश नाही जेवायला | उदंड कामे | | १५-२-३ | |

कित्येक युध्दप्रसंगी गुंतले | तेणे गुणे उन्मत्त जाले | रात्र दिवस करू लागले |युद्धचर्चा | |१५-२-५ | |

उदिम्यास व्यासंग लागला | अवकाश नाहीसा जाला | अवघा पोटधंदाच लागला | निरंतर | |१५-२-६ | |

व्यक्ती तितुक्या प्रकृती असतात .प्रत्येक जण वेगळा असतो .त्यामुळे माणसांच्या वेगवेगळ्या तऱ्हा असतात .पुष्कळ लोक बाटले ,पोर्तुगीज राज्यात नाहीसे झाले ,जाती ,धर्म ,भाषा ,प्रांत यामुळे एकमेकांना दुरावले .सगळा समाज सुस्त ,कोणतेही चैतन्य नसलेला गलितगात्र होता .फक्त महाराष्ट्रात थोडे चैतन्य आहे .तेथे राजकारणाला वाव आहे .पण तेथे माणसांना जेवायला फुरसद नाही .युध्दात वेगवेगळ्या कामात गुंतलेली असतात . त्यांच्या बोलण्याचा विषय असतो फक्त युध्द !

षडदर्शने नाना मते | पाषांडे वाढली बहुते | पृथ्वी मध्ये जेथ तेथे | उपदेसती | | १५-२-७ | |

स्मार्थी अथवा वैष्णवी | उरली सुरली नेली आघवी | ऐसी पाहता गथागोवी | उदंड जाली | |१५-२-८ | |

कित्येक कामनेचे भक्त | ठाईं ठाईं जाले आसक्त | युक्त अथवा अयुक्त | पहातो कोण | |१५-२-९ | |

या गल्बल्या मध्ये गल्बला | कोणीं कोणीं वाढवला | देखो सकेनासा जाला | वैदिक लोक | | १५-२-१० | |

त्याही मध्ये हरिकीर्तन | तेथे वोढले कित्येक जन | प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान |कोण पाही | |१५-२-११ | |

या कारणे ज्ञान दुर्लभ | पुण्येघडे अलभ्य लाभ | विचारवंता सुल्लभ | सर्व काही | | १५-२-१२ | |

बुद्धीच्या क्षेत्रात षड्दर्शने ,इतर अनेक मते ,समाजघातक मतांची वाढ झाली .उरलेल्या लोकांना स्मार्त आणि वैष्णव लोकांनी आपल्या मध्ये ओढून नेले .सकाम भक्त आसक्त असतात .ते योग्य अयोग्याचा विचार करत नाहीत .काही लोक हरिकीर्तनाकडे ओढली जातात ,प्रत्यक्ष अनुभवाचे ब्रह्मज्ञान कोणाकडे नसते . खरे ज्ञान दुर्लभ झाले .

Wednesday, January 5, 2011

चातुर्य लक्षणे -लोकसंग्रह करणा-या साठी


चातुर्य लक्षणे -लोकसंग्रह करणा -या साठी
समर्थांचा महंत ज्याने लोकसंग्रह करून देश ,देव ,धर्म याविषयी जागृती करायची आहे त्याच्या अंगी चातुर्याचीकोणती लक्षणे हवीत असा प्रश्न श्रोते विचारतात तेव्हा समर्थ उत्तर देतात :
अस्ति मासांची शरीरेत्यांत राहिजे जीवेश्वरेनाना विकारी विकारेप्रवीण होइजे । । १५-- | |
जीव जीवात घालावाआत्मा आत्म्यात मिसाळावाराहं राहो शोध घ्यावापरांतराचा । । १५-- | |
तैसेची हे मनास मनविवेके जावे मिळोनढिलेपणे अनुमानहोत आहे । । १५-- | |
या अस्थिमांसाने भरलेल्या शरीरात ईश्वर जीव रूपाने वास करतो .जसजसे शरीरात बदल होतात ,तसतसेजीवही आपल्यात बदल घडवून आणतो .प्रत्येकाच्या शरीरात असणारा जीवात्मा जाणीव मय असतो .त्याजाणीवेच्या सहाय्याने दस-याच्या अंत :करणात काय चालले आहे ते शोधता येते .आपल्या बोलण्यावागण्यानेदुस-याला काय वाटले असेल याची कल्पना करता येते .जसे ढिले ठेवलेले जानवे दिसायला चांगले दिसत नाहीत्याचे पदर गुंततात ,त्याउलट नीट ठेवलेले जानवे चांगले दिसते .तसे आपण विवेकाने दुस-याच्या भावना जाणूशकतो ,दुस -याच्या मनाचा ठाव घेता येतो
जो जगदांतरी मिळालातो जगदांतरचि जालाअरत्री परत्री तयालाकाय उणे । । १५--१४ | |
एकदा का माणूस दुस-याच्या मनाचा ठाव घ्यायला शिकला ,की तो जगाच्या अंतरंगाशी एकरूप होतो ,सर्व लोकांचेअंत :करण तोच होतो .जसे समर्थ बालपणापासून विश्वाची चिंता करत होते .मग अशा माणसाला जग किंमतदेते ,मान देते .मग त्यांना वशीकरणासारख्या क्षुद्र गोष्टींचा आधार घ्यावा लागत नाही
लोकसंग्रह करताना भोवताली जमा होणारी माणसे कशी असावीत ,ते समर्थ सांगतात :
आचार विचारेविणजे जे करणे तो तो सीणधूर्त आणि विचक्षणतेची शोधावे । । १५--२४ | |
जे लोक जे खरे नाही ते खरे मानतात ,त्याचा अभिमान धरतात ,जे खरे आहे ते सोडून देतात ,ते मूर्ख असतातआचार विचार सांभाळता जे लोक काम करतात ,ते वाया जाते .म्हणून लोकसंग्रह करणा-यांनी सरसकटकोणालाही आपल्या हाताखाली घेऊ नये.चतुर बुध्दीमान माणसे शोधून काढावी
याकारणे मुख्य मुख्यतयांसी करावे सख्ययेणे करिता असंख्यबाजारी मिळती । । १५--२६ | |
लोक संग्रह करण्यासाठी समाजातील प्रतिष्ठित माणसांशी स्नेह जोडावा ,त्यांच्या बरोबर सख्य जोडले तर त्यांनामानणारे असंख्य लोक आपल्याला वश होतात
समर्थाचे राखता मनतेथे येती उदंड जनजन आणि सज्जनआर्जव करिती । । १५--२९ | |
वोळखीने वोळखी साधावीबुध्दीने बुध्दी बोधावीनीती न्याये वाट रोधावीपाषांडाची । । १५--३० | |
समाजातल्या प्रतिष्ठित माणसांना आपलेसे केले की सामान्य माणसे मेंढरासारखी मागे येतात म्हणून समर्थसांगतात की ओळखीने ओळख वाढवावी ,साधेपणाने रहात आपल्या बुध्दीने आपल्या शिकवणूकीतून लोकांची बुध्दी प्रगल्भ करावी .लोकां मध्ये आपलेपणा निर्माण करावा
वेष असावा बावळापरी अंतरी नाना कळासगट लोकांचा जिव्हाळामोडूं नये । । १५--३१ | |
निस्पृह आणि नित्य नूतनप्रत्ययाचे ब्रह्मज्ञानप्रगट जाणता सज्जनदुल्लभ जगी । । १५--३२ | |
नाना जिनस पाठांतरेनिवती सकळांची अंतरेचंचळपणे तदनंतरे सकळां ठायी । । १५--३३ | |
बाहेरून वेष बावळा असला तरी अन्तर्यामी अनेक कलांनी संपन्न असावे .लोकांचे अंत :करण सांभाळण्याचीहातोटी असावी .अत्यंत निस्पृह नेहमी ताजे असणारे आत्मज्ञान त्याच्या जवळ ओतप्रोत भरलेले असावे .अनेकलोकांना आकर्षून घेण्याची कला त्याच्या जवळ असावी .त्याने सतत फिरत असावे .एका ठिकाणी थांबू नयेथांबल्याने भेटी गाठी होत नाहीत .लोकसंग्रह थांबतो .
, . .