भक्ती मार्ग
दशक १ समास १ च्या २ -या ओवीत समर्थ म्हणतात , ''येथे बोलिला विशद। भक्तिमार्ग । । ''
भक्तिमार्ग समजावून घेताना भक्ती म्हणजे काय ? भक्ती का करायची ?या प्रश्नांची उत्तरे मिळवायची आहेत .
प्रथम भक्ती म्हणजे काय ते पाहू .भक्ती हा शब्द व्याकरणाने तीन प्रकारे सिध्द होतो .१ भजनं भक्ती २ .भागो भक्ती ३ .भंजनं भक्ती .आणखीन एक प्रकारे शब्द सिध्द होतो .भज सेवायां
१.भजनं भक्ती :भजन म्हणजे रस घेणे ,रसास्वादन करणे ,भगवंताचा महिमा जाणून त्याच्या लीला ऐकाव्या ,त्याचे गूण लक्षात आणावेत ,त्याचे रूप मनात साठवावे .कीर्तन ,प्रवचानाद्वारे भगवंताचे गूण ,त्याच्या लीला ,त्याचा पराक्रम लोकांपर्यंत पोचवायाचा.
श्री समर्थांनी वेण्णाबाईंना कीर्तन करण्याचा अधिकार दिला .वेण्णा बाईंचे पाठांतर ,विद्वत्ता ,वेदांताची बैठक ,समाजचिंतन ह्या गूणांमुळे त्यांची कीर्तने भक्ती देव ,देशप्रेम यांनी युक्त असत .उभ्याने सभेत कीर्तन करण्याची परवानगी फक्त वेण्णाबाईंना होती .
उध्दव स्वामी भावतन्मयतेने कीर्तन करीत .त्यांचे कीर्तन प्रासादिक असे .चाफळ च्या राम मदिरात उध्दव स्वामी कीर्तन करत असताना मारूती रायांची निश्चल मूर्ती नाचू लागली ,डोलू लागली .इतकेच काय मरूतीराय हातात झांजा घेऊन उभ्याने साथ करू लागले .
भागो भक्ती : भाग म्हणजे अंश ,अवयव ,वाटा .ईश्वराची भक्ती करायची म्हणजे मी ईश्वराचा अंश आहे ,ईश्वराचा भाग आहे असे मानणे .जीव खर तर ईश्वराचा अंश आहे .पण अविद्येने ,मायेने त्याला स्वस्वरूपाचे विस्मरण झाले आहे .मी देहाचा ,जीवलगांचा ,पैशाचा असे म्हणू लागला .मी ईश्वराचा अंश असे म्हणणे म्हणजे भागो भक्ती .भगवान श्रीकृष्ण जेव्हा परमधामाला गेले तेव्हा अर्जुनाला खूप वाईट वाटल .त्याने स्वत:ला सावरल.त्याने विचार केला -कृष्ण माझ्या मनाचे मन आहे ,माझ्या नेत्रांचे तेज आहे ,कृष्ण माझ्या इंद्रियांची ताकद आहे ,कानांची श्रवण करण्याची शक्ती श्रीकृष्णाचा अधिनिवेश आहे .म्हणजे मी कृष्णाचा अंश आहे .
भंजन : भंजन म्हणजे फोड़णे ,मोड़णे ,नाश करणे .फोडायचे मोडायाचे ,नाश करायचा अविद्येचा ,अहंतेचा ,वासनांचा ,भगवंताची भक्ती करून .चांगदेवांनी १४०० वर्षे योग साधना केली तरी त्यांची अहंता गेली नव्हती .मुक्ताई सद्गुरू भेटल्यावर चांगदेवांचा अंहकार गळून पडला .
सेवया : आश्रय घेणे , भार टाकणे. आपला स्वामी मानून त्याचा आश्रय घेणे .आपल्या वाटेला आलेले काम भगवंताची सेवा म्हणून करणे .भगवंताचा दास होऊन राहणे .अशी भक्ती श्री समर्थांनी श्रीरामांची केली .हनुमंतानी श्रीरामांची केली .
भक्तीच्या अनेक व्याख्या केल्या आहेत.
आपले विहित कर्म कोणत्याही फलाची अपेक्षा न ठेवता भगवंताला आवडेल असे करणे म्हणजे भक्ती .
चैतन्याकड़े वृती फिरवणे या नावे भक्ती । या नरदेहात सर्व सजीवांमध्ये जे चैतन्य असते ,ते परब्रह्माचा अंश आहे असे जाणून कोणालाही न दुखवता ,आपले विहीत कर्म करणे म्हणजे भक्ती .सेवा करत असताना ,भगवंताला स्वीकारून कर्मफलाची अपेक्षा न ठेवणे म्हणजे भक्ती !
भक्ती मध्ये प्रेम आहे ,योग आहे ,कर्म आहे .गोपिकांच्या भगवान श्रीकृष्णांवरच्या प्रेमाची तुलनाच होऊ शकत नाही .मीराबाईंचे भगवान् श्रीकृष्णांवरील अमर्याद प्रेमामुळे ,त्यांना दिलेला विषाचा प्याला त्यांनी पिऊन टाकला.चोखमेळा सावता माळी या संतानी मिळवलेले भक्तीतून जन्माला आले होते .
भक्तीत योग आहे .भक्त ख-या प्रेमाने भगवंताचे चिंतन करतो तेव्हा आपोआप ध्यान व धारणा साधतो .