
शंका समाधान
दासबोधात शिष्यांनी विचारलेल्या शंकांचे श्री समर्थांनी केलेले समाधान
प्रश्न १: श्रोते पुसती कोण ग्रंथ । काय बोलिले जी येथ।
श्रवण केलियाने प्राप्त । काय आहे ?। । १ -१ -१। ।
शिवथर घ ळीतल्या रम्य परिसरात समर्थ बसले आहेत .समोर शिष्य ,पंचक्रोशीतले लोक बसले आहेत .कल्याण स्वामी लेखनासाठी तयार आहेत.उत्सुकतेने समर्थांकडे पाहत आहेत .एक जण विचारतो ,''स्वामी आपण जो ग्रंथ सांगणार आहात त्या ग्रंथाचे नांव काय ? त्यात काय सांगितले आहे ? त्या ग्रंथाच्या श्र व णाने काय प्राप्त होणार आहे ?''
समर्थ उत्तर देतात '', ग्रंथा नाम दासबोध। गुरु शिष्यांचा संवाद।
येथ बोलिला विशद। भक्ती मार्ग। । १ -१ -२ । ।
या ग्रंथाचे नाव दासबोध आहे .दासबोध मध्ये समर्थ स्वत:ला दास म्हणवून घेत आहेत .त्यांना झालेला बोध म्हणून दासबोध ! श्री समर्थ स्वत :ला रामाचा दास म्हणवून घेतात । त्यांना श्रीरामांनी जो आत्मबोध केला ,तोच बोध त्यांनी मुमुक्षूना ग्रंथारूपाने सांगितला .दासबोध या उत्तरातून च श्री समर्थ ग्रंथाचा अनुबंध चतुष्टय सांगायला सुरुवात करतात .
मुख्य ग्रंथात ज्याच्यामुळे प्रवेश होतो त्याला अनुबंध चतुष्टय म्हणतात .अनुबंध चार आहेत .
१ .विषय :श्रीमद दासबोधात पहिल्या ओवीत 'आहे 'असा शब्द आहे .आहे शब्द अस्तित्व दर्शक आहे .अस्तित्व दाखवल आहे नित्य शाश्वत ब्रह्माच !
2 . संबंध : प्रयोजन व् विषय यांचा कार्यकारण भाव ,जीव शिवाचे ऐक्य ,गुरुशिश्यांचा संवाद ।
३.प्रयोजन : फलश्रुती म्हणजे केलेला बोध ।
४.अधिकारी : दास [ सद्गुरूचे दास म्हणजे शिष्य ] दास म्हणजे भगवंताचे भक्त ।
श्री समर्थ भक्तीने भगवंताचे दर्शन घेऊ शकले .त्यांचे जीवन आनंदाने भरून गेले .आपल्याला लाभलेला आनंद इतरांना लाभावा म्हणून दासबोधाची रचना झाली
7 comments:
color of the text should be changed.It is not easily readable
Mala Chaturdash Bramh ya vishayi mahiti havi ahe ti milel ka?
kapil,
thank u for comment.
mi chaturdhasha brahma vishayi nakkich mahiti milel.
blog vachat raha. lavakarcha dein mahiti
Revati ,
tumachya suchanecha mi nakkich vichar karin,
thank u.
suvarna lele
suvarnaji aapla ha prayas khoop changla aahey mi pan gajanan maharaj,sai baba ,swami samarth yanchey photo va mahiti sankalit karnya sathi 1 blog tayar karit aahey aapan mala madat karal kay
dhanyavad
harish
Namaste kaku.tumcha ha upkram khup changala ahe.sakalchya mukatpith madhun aplya blog vishyi mahiti milali.mala ethe ek suchavavse vatatke,baryach website var samarthache dasbodh,karunashtake,shree manache shlok available ahet.pan ya vatirikat samarthani khup likhan kele ahe.te milat nahi.te kothe milele.te jar tumchya blog var available zale tar khup chhan hoil.lavkar mala kalava.tumchya ya upakramala khup khup shubechaa.
प्रभु श्रीराम व हनुमान ही दैवते लोकांपुढे आणण्यामागे समर्थांचा कोणता ह्रदयाचे उत्तर मीळु शकेल का
Post a Comment