त्रिविध ताप
श्रीसमर्थानी तिस-या दशकात मानवी जीवनाची मूळ समस्या सांगितली ,'सुखासाठी धडपड करत असताना सुध्दा मानवाला सुख जवाएवढे दू :ख पर्वता एव्हडे भोगावे लागते। माणसाच्या आयुष्याचे ध्येय सुख मिळ्वणे असते . जीवन तो सुखाभोवती केंद्रित करतो ,आणि परिणामी त्याला दु:ख भोगावे लागते . गर्भावस्थेत जीवाला अतिशय दु:ख भोगावे लागते .तेव्हा जीव परमेश्वराला विनवतो ,'देवा सोडविसी येथून । तरी मी स्वहीत करीन। गर्भवास चुकवीन। पुन्हा न ये येथे । । ' देवा मला लवकर येथून काढ. मी स्वहीत करून घेईनसे म्हणतो गर्भी म्हणे सोहं सोहं । बाहेर पड़ता म्हणे कोहं। गर्भा मध्ये असताना जो जीव मी तो आहे ,परमेश्वराचा अंश आहे असे म्हणतो ,तोच जीव बाहेर आल्यावर मी कोण आहे असे म्हणतो . तेथून पुन्हा दु :खाला सुरुवात होते . म्हातारपणी पुन्हा त्याला पस्तावा होतो । पुढे वृध्दीस तत्वता । गर्भी पस्तावा होता । तोची आला मागुता । अंतकाळी। । गर्भावस्थेत असताना जो जीवाला पश्चात्ताप होतो तोच पश्चात्ताप वृद्धपणी देहाची विकलांग अवस्था झाल्यावर होतो .त्या जीवाला पुन्हा जन्ममरण चक्रातून जावे लागते .जन्मात भोगावी लागणारी दु :ख तीन कारणांनी होतात .दु :खांना समर्थांनी 'ताप ' असे नाव दिले आहे .हे ताप तीन प्रकारचे .१ अध्यात्मिक २ आधिभूतिक ३ आधिदैविक .श्रोते विचारतात , अध्यात्मिक तो कोण । कैसी त्याची ओळखण। आदिभूतिकाचे लक्षण। जाणिजे कैसे । । ३ -६ -१०। । आदिदैविक तो कैसा । कवण तयाची दशा । हे ही विशद कळे ऐसा । विस्तार कीजे । । ३ - ६ -११ । । अध्यात्मिक ताप कसा ओळखायचा ,आदिभूतिकाचे लक्षण कोणते ,आधिदैविक तापाने काय होते हे कृपा करून विस्ताराने सांगा .
कितीही वर्णन केले तरी न संपणारा दु :खसागर माणसाला पूर्वी केलेले पाप भडकल्याने भोगावा लागतो
अध्यात्मिक ताप
देहेंद्रिय प्राणेन सुखंदु :खं च प्राप्यते । इमम अध्यात्त्मिकं तापं जायते दु :ख देहिनां । देह इंद्रिय आणि प्राण । यांचेनि योगे आपण । सुख दु :खे सिणे जाण । या नाव अध्यात्मिक । । ३ -६ -१३ देह इंद्रिय आणि प्राण यांच्या योगाने माणूस सुख दु :ख भोगतो ,त्यामुळे त्रस्त होतो ,त्याला अध्यात्मिक ताप म्हणतात । समास ३-६ मध्ये ४० ओव्यात अध्यात्मिक तापाचे वर्णन समर्थांनी केले आहे त्यावरून त्यांचे निरिक्षण किती सूक्ष्म होते ,त्यांची स्मृती किती विलक्षण होती याचे प्रत्यंतर येते । देहामध्ये जे रोग उत्त्पन्न होतात व त्या रोगांमुळे जे दु :ख भोगावे लागते तो अध्यात्मिक ताप असतो .जवळ जवळ २०० रोग समर्थांनी येथे सांगितले आहेत .जसे कान ठणकणे,डोळे दुखणे, जन्मांध असणे ,नपुंसक असणे ,डोळ्यात फूल पड़ने ,कुबड़ अखूड पाय ,पांगळेपणा पुढे आलेले दात .समासाच्या शेवटी समर्थ म्हणतात , ऐसा अध्यात्मिक ताप । पूर्व पापाचा संताप । सांगताना सरेना अमूप । दु :ख सागर । । ३ - ६ -५५। ।कितीही वर्णन केले तरी न संपणारा दु :खसागर माणसाला पूर्वी केलेले पाप भडकल्याने भोगावा लागतो
आदिभूतिक ताप
सर्व भूतेन सांयोगात सुखं दु :खं च जायते । द्वितीय ताप संताप सत्यं चैवाधि भौतिक :।
सर्व भूतांचेनि संयोगे। सुख दु:ख उपजो लागे ताप होता मन भंगे । या नाव आदिभूतिक । । ३ -७ - २ । ।
सर्व भूतांच्या संयोगाने जे दु :ख उत्त्पन्न होते ,त्यांचा ताप होऊन मन दु :खी होते ,बेचैन होते त्याला आदिभौतिक म्हणतात .देहाच्या बाहेरील परिस्थितीने निर्माण होणारी दु :खे म्हणजे आदिभौतिक .बाहेरील परिस्थितीत अचेतन
व सचेतन असा भेद आहे ,अचेतन म्हणजे पंचमहाभूते [पृथ्वी ,आप ,तेज ,वायु ,आकाश ] ,सचेतन म्हणजे जीव जंतू ,जनावरे ,इतर माणसे .यांच्या मुळे होणारी दु :खे .माणसाला माणसापासून होणारे दु :ख सर्वात दु :खकारक
असते .
ठेचा लागणे , काटे मोड्णे ,हत्यारांचे घाव लागणे ,धस लागणे, लाकडाचा बारीक काट्यासारखा तुकडा शरीरात
शिरणे खाजकुहिरी अंगास लागणे, गांधील माशी चावणे,दरोडा पड़ने ,मुलगा मूर्ख असणे ,मुलगी विधवा होणे,
मनासारखा संसार नसणे,अशुभ भविष्य सांगितल्यावर धक्का बसणे,बाळपणी आई मरणे ,तरुणपणी बायको
मरणे ,म्हातारपणी तरुण मुलगा मरणे । ही सर्व म्हणजे दु :खाचे डोंगर आहेत असे समर्थ म्हणतात ।
मानवी जीवनातील आणखीन एक समस्या आहे त्याला करावे तसे भरावे लागते .जसे कर्म तसे फळ भोगावे
लागते .काही वेळा लगेच ,काही वेळा काही कालानंतर ,तर कधी पुढील जन्माताही ।
शुभाशुभ कर्माने जना । देहांती यमयातना । स्वर्ग नर्क भोग नाना । या नाव आदिदैविकं। । २ - ८ - २ । ।
माणसाला चांगल्या वाईट कर्मांनी मरणानंतर यमयातना ,स्वर्ग नर्क असे भोग भोगावे लागतात .त्याना आधिदैविक ताप म्हणतात .मनुष्य जे जे कर्म करतो ,ते वाया जात नाही ,त्याचे फळ मिळतेच.या जन्मात मिळाले
नाही तर मृत्यूनंतर च्या अवस्थेत मिळते .त्या अवस्थेत या जगात केलेल्या कर्माचा जाब द्यावा लागतो .त्यालाच
यमयातना म्हणतात .
देव यमदेवतेला प्रेरणा देवून त्या द्वारे जीवाला हे भोग भोगायला लावतो ,त्यांनाच आधिदैविक म्हणतात . यमयातना म्हणजे कोणते क्लेश असतात हे सांगताना समर्थ सांगताना -अक्षोभ नावाच्या नरकात अगणित किडे
वळवळत असतात .पापी माणसाला यम् हातपाय बांधून त्यात टाकतो. काही पापी जीवांना यम कुंभपाकात टाकतो. कुंभपाक म्हणजे लहान तोंडाचे पण आत मोठी जागा असलेले मडक्याच्या आकाराचे कुंड .त्या कुंडात
अत्यंत दुर्गंधी व उकाडा असतो .तेथे जीव रडतो ,मोठ्याने गळा काढतो .गहिवरतो.केलेल्या कर्मांचा पश्चाताप
करतो .

आधिदैविक ताप
शुभाशुभ कर्मणा देहांते यमयातना । स्वर्गनर्कादि भोक्तव्यंमिदं चैवाधिदैविकं ।शुभाशुभ कर्माने जना । देहांती यमयातना । स्वर्ग नर्क भोग नाना । या नाव आदिदैविकं। । २ - ८ - २ । ।
माणसाला चांगल्या वाईट कर्मांनी मरणानंतर यमयातना ,स्वर्ग नर्क असे भोग भोगावे लागतात .त्याना आधिदैविक ताप म्हणतात .मनुष्य जे जे कर्म करतो ,ते वाया जात नाही ,त्याचे फळ मिळतेच.या जन्मात मिळाले
नाही तर मृत्यूनंतर च्या अवस्थेत मिळते .त्या अवस्थेत या जगात केलेल्या कर्माचा जाब द्यावा लागतो .त्यालाच
यमयातना म्हणतात .
देव यमदेवतेला प्रेरणा देवून त्या द्वारे जीवाला हे भोग भोगायला लावतो ,त्यांनाच आधिदैविक म्हणतात . यमयातना म्हणजे कोणते क्लेश असतात हे सांगताना समर्थ सांगताना -अक्षोभ नावाच्या नरकात अगणित किडे
वळवळत असतात .पापी माणसाला यम् हातपाय बांधून त्यात टाकतो. काही पापी जीवांना यम कुंभपाकात टाकतो. कुंभपाक म्हणजे लहान तोंडाचे पण आत मोठी जागा असलेले मडक्याच्या आकाराचे कुंड .त्या कुंडात
अत्यंत दुर्गंधी व उकाडा असतो .तेथे जीव रडतो ,मोठ्याने गळा काढतो .गहिवरतो.केलेल्या कर्मांचा पश्चाताप
करतो .
No comments:
Post a Comment