मी पणाचे स्वरुप कसे असते ?
मीपण शस्त्रे तुटेना । मीपण फोडिता फुटेना । मीपण सोडिता सुटेना । काही केल्या । । ७ -७ -४५ । ।
मीपण शस्त्राने तुटत नाही .फोडले तरी फुटत नाही .सोडले तर सुटत नाही .देह्बुध्दीने मीपणा येतो .तो
ख-याचे खोटे व खोटयाचे खरे करतो .अनेक संदेह निर्माण करतो .तो प्रपंच ही करू देत नाही व परमार्थ ही चालू देत नाही .खूप प्रयत्नांनी तो नाहीसा होत नाही .
मी पणाचे परिणाम ही भयंकर असतात .समर्थ म्हणतात :
मी पणे वस्तू नाकले। मीपणे भक्ती मावले। मीपणे भक्ती गले। वैराग्याची । । ७ -७ -४६ । ।
मीपणे प्रपंच न घडे। मी पणे परमार्थ बुडे। मीपणे सकळहि उडे। येशकीर्ति प्रताप । । ७ -७ -४७ । ।
मीपणे मीत्री तुटे। मीपणे प्रीती आटे। मीपणे लगटे । अभिमान अंगी । । ७ -७ -४८ । ।
मीपणे विकल्प उठे । मीपणे कलह सुटे। मीपणे संमोह फुटे। ऐक्यतेचा । । ७ -७ -४९ । ।
मीपण कोणासिच न साहे । ते भगवंती कैसेनि साहे ।
म्हणौनि मीपण सांडूनि राहे । तोचि समाधानी । । ७ -७-५० । ।
मीपणाने परमात्म वस्तू कळत नाही ,भक्ती नाहिशी होते ,ब्रह्मवस्तूचा साक्षात्कार होत नाही .भक्तीत भगवंताच्या इच्छेत आपली इच्छा असते पण मीपणात आपली इच्छा भिन्न असते .मीपणाने भक्ती नाहिशी होते .वैराग्याचा नाश होतो .मीपणाने वासना निर्माण होते ,जीव दृष्याला चिकटतो .चिकटला की बांधला जातो .बंधनाने स्वातंत्र्य गमावले की जीवाला जडत्व येते ,त्याचे बळ कमी होते .मीपणाने अभिमान गर्व ताठा येतो .परमार्थ बुडतो .जीव दृश्याकडे खेचला जातो .यश कीर्ति प्रताप नाश पावतात .मित्रातील स्नेह बुडतो .आपापसातील प्रेम कमी
होते .भांडणे निर्माण होतात .समूहातील ऐक्यता नाहिशी होते .म्हणून मीपणा तोडून जो वागतो
तो समाधानी होतो .म्हणून शिष्य विचारतात :
मीपण कैसे त्यागावे । ब्रह्म कैसे अनुभवावे । समाधान कैसे पावावे । नि :संग पणे । । ७ -७ -५२ । ।
मीपणाचा जाणून त्याग करावा .त्यासाठी विवेकाची गरज आहे .काय सत्य काय असत्य ,कोणते सार कोणते असार ह्या सर्वांचा विवेक करूनच मीपणाचा त्याग करता येतो .ब्रह्मानुभव येण्यासाठी समरसता येण्याची गरज असते व समाधाना साठी निर्वासनातेची गरज असते .
निर्विकल्पासी कल्पित जावे । परी कल्पिते आपण न व्हावे ।
मीपणासी त्यागावे । येणे रिती । । ७ -७ -५६ । ।
निर्विकल्पाची कल्पना करावी पण मी कल्पना करतो ही देह्बुध्दीची भावना नसावी .म्हणजे मीपणाचा त्याग करता येतो असे समर्थ म्हणतात .जोपर्यंत माणूस अज्ञानी असतो तोपर्यंत स्मृती ,लक्ष ,विचार ,भावना ,कल्पना मीपणात केंद्रित असतात .त्याने केवळ ब्रह्मस्वरूपच जाणता येत नाही तर ब्रह्माचे विपरीत ज्ञान होते .
जेव्हा जीव ब्रह्मकेंद्रित होतो तेव्हा मन विशाल होऊ लागते ,'मी विचार करतो ' ही द्वैताची अवस्था जाऊन मी 'स्वरूपात 'विलीन होतो .म्हणजे कल्पना शून्य होते .यासाठी आपण ब्रह्मस्वरूप आहोत या भावनेतून बाजूला न होता साधना केली तर अलिप्तपणा येतो .'करून अकर्ता व भोगून अभोक्ता ' अशी अलिप्त पणाची युक्ती
प्राप्त होते .जोपर्यंत मीपणा असतो तोपर्यंत साधना करणे व सोडणे या क्रियांना अर्थ असतो .पण देहातीत झाल्यावर साधन करणे व सोडणे ही उरत नाही .