Wednesday, December 2, 2009

आता राहावे कोणे रिती ?

समर्थांनी अद्वैत ब्रह्माचे निरूपण केल्यावर श्रोता म्हणतो :
अद्वैत ब्रह्म निरोपिले जे कल्पने रहित संचले
क्षणायेक तदाकार केले मज या निरूपणे - -
ब्रह्मचि होऊन जावे कां ते संसारीच असावे दोनीकडे भरंगालावे किती म्हणोनी - -१०
निरूपणी ज्ञान प्रबले उठों जाता ते मावले मागुता काम क्रोध खवले ब्रह्मरूपासी - -११
ब्रह्मसुख नेले संसारे संसार गेला ज्ञानद्वारे दोनी अपुरी पुरे येकही नाही - -१५
आता श्रोता करी विनती आता रहावे कोणे रिती
म्हणे
अखंड माझी मति ब्रह्माकार नाही - -१६
श्रोता म्हणतो ,''महाराज ,आपण अद्वैत ब्रह्नाचे निरूपण केले .क्षणाभर मन तदाकारही झाले .त्या क्षणापुरते मन तदाकार होते पण दुस-या क्षणाला ते संसारात गुंतते .कारण निरूपणाला बसले की ज्ञानाचा वर्षाव होतो पण निरूपणातून उठले की ते ज्ञान नाहीसे होते .मग काम ,क्रोध वाढतात ,संसाराने ब्रह्म सुख नाहिसे होते .संसार ज्ञानाने नाहीसा होतो .संसार आणि ब्रह्मज्ञान दोन्ही अर्धवट राहतात .मग महाराज आता राहावे कसे ते कृपा करून सांगा :
ऐसा श्रोता करी विनंतीआता राहावे कोणे रिती
म्हणे अखंड माझी मतीब्रह्माकार नाही । । - -१६ । ।
श्रोता शंका विचारतो :अद्वैत ब्रह्माचे निरुपण ऐकून मी ब्रह्माशी तदाकार झालो .ब्रह्माशी तदाकार होउन रहावे असे वाटते ,श्रवणाने ब्रह्माकार झालेले मन पुन्हा देहबुध्दी च्या वृत्तीवर येते .हे सारखे येणे जाणे चालू असते .त्या वर जाण्याच्या खाली घसरण्याच्या अनेक फे-या चालू झाल्या .ही अवस्था म्हणजे किड्याच्या पायाला दोरी बांधून त्याला खाली वर फिरवावा अशी अवस्था असते जो ब्रह्मस्वरूप होतो तो देह्बुध्दी मध्ये कसा येतो ?एक तर ब्रह्मस्वरूपी रहावे किंवा संसारी असावे .निरुपण ऐकताना ब्रह्मस्वरूपाचा झालेला मी तेथून उठल्यावर त्याच मी च्या ठिकाणी काम क्रोध धुमाकूळ घालतात .मग हे कसले ब्रह्मरूप होणे असे वाटते .ज्ञान नाहिसे झाल्यावर ब्रह्म हातचे जाते ,परमार्थाच्या नावाखाली संसार हां हातचा जातो .अशावेळी ब्रह्मज्ञान साध्य करावे की संसार करावा याचा निश्चय होत नाही ,तर मी आता काय करावे ?त्यासाठी समर्थ म्हणतात :
अचिंत्य तेचि चिंतावेअव्यक्तास आठवावेनिर्गूणास वोळखावेकोणे परी । । - - । ।
जे दृष्टीसचि पड़ेजे मनास हि नातुडेतया कैसे पहाणे पड़ेनिर्गुणासी। । - -१० । ।
असंगाचा संग धरणेनिरावलंबी वास करणेनिशब्दासी अनुवादणेकोणे परी । । - -११ । ।
जे अचिंत्य आहे त्याचे चिंतन कसे करावे ,जे अव्यक्त आहे त्याचे स्मरण कसे करावे ,जे निर्गुण आहे ते कसे समजावे ?जे दृष्टीला पडत नाही ,मनाला सापडत नाही अशा निर्गुण ब्रह्माला कसे पहावे ,ते कशाला चिकटले नाही त्याची संगती कशी धरावी असे प्रश्न श्रोता विचारतो .अचिंत्याचे चिंतन करताना ,निर्विकल्प ब्रह्माची कल्पना करू लागल्याचे ,अद्वैत ब्रह्माचे ध्यान करू लागल्यास द्वैत निर्माण होते जसे ध्याता ध्येय !
ध्यान करणे सोडले ,चिंतन करणे सोडले तर मोठे संशय निर्माण होतात .मग काय करावे असा प्रश्न श्रोता
विचारतो .समर्थ उत्तर देतात :
म्हणोनी विवेक धरावाज्ञाने प्रपंच सारावाअहंभाव वोसरावापरी तो वोसरावा । । - -१७ । ।
या सर्व गोष्टी हो नयेत म्हणून आत्मानात्म विवेक करावा .त्यातून जे ज्ञान उत्पन्न होते त्यातून दृश्य प्रपंच बाजूला सारावा .परब्रह्म कसे आहे ते सांगताना समर्थ म्हणतात :
ते आठविता विसरिजेका ते विसरोनि आठविजेजाणोनिया नेणिजेपरब्रह्म ते । । - -१९ । ।
परब्रह्म स्मरण करण्यासाठी स्वत :ला विसरावे लागते .स्वत :चा विसर पडला तरच त्याचे स्मरण
करता येते .देह्बुध्दीच्या अनुभवातील जाणने ,आठवणे ,विसरणे या सर्व वृत्ती नाहिशा होतात .मन मनपणे उरत नाही .मी पणे ब्रह्माची भेट घेतली तर भेट होत नाही .भेट घेत असताना मी भेट घेतो हे भान नसते कारण द्वैतात राहून ब्रह्म पाहता येत नाही .तर निवृत्त होउन अद्वैताने ब्रह्माची भेटी होते .मग मी पणाचा त्याग कसा करावा असा श्रोता प्रश्न करतो ,त्याला समर्थ उत्तर देतात :
मीपण जाणोनी त्यागावेब्रह्म होउन अनुभवावेसमाधान ते पावावेनिसंग पणे । । - -५२ । ।
आणिक येक समाधानमी पणेविण साधनकरू जाणे तोचि धन्यसमाधानी । । - -५३ । ।

No comments: