Tuesday, August 11, 2009

मुमुक्षु


मुमुक्षु
जेव्हा रेशमाचा किडा कोषातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो कोषातून सुटतो ,कमलावरील भुंगा कमल पाकळ्या झुगारतो व त्यातून बाहेर पडतो ,तसे आकस्मात आलेल्या आपत्ती मुळे मनुष्य खडबडून जागा होतो ,ह्या संसारात काही राम नाही असे त्याला वाटू लागते , आपण पूर्वी केलेल्या चुकांची ,कुकर्मांची आठवण होउन त्याला पश्चात्ताप होतो .पश्चात्ताप होउन पूर्वी घडलेल्या चुका पुन्हा करायच्या नाहीत असा अनुताप होतो .तेव्हा त्याला संसारातून सुटण्याची तळमळ लागते .आपल्याला ईश्वर प्राप्तीसाठी प्रयत्न करावे असे मनापासून वाटते तेव्हा तो मुमुक्षु पणात जातो .आत्तापर्यंत घालवलेल्या जीवनाबद्दल अनुताप व त्याच बरोबर आत्मज्ञानाची तळमळ ही मुमुक्षु पणाची दोन अंगे आहेत .अनुतापाने पूर्वीच्या जीवन पध्दतीत अमुलाग्र बदल होतो .त्यामुळे मुमुक्षुपण म्हणजे दूसरा जन्म समजला जातो .समर्थ म्हणतात :
संसार दु:खे दुखावलात्रिविध तापे पोळलानिरूपणे प्रस्तावलाअंतर्यामी । । - - । ।
जाला प्रपंची उदासमने घेतला विषय त्रासम्हणे आता पुरे सोससंसारीचा । । - - । ।
प्रपंचात जे श्रम घेतले ती हमाली झाली ,आता जीवनाचे सार्थक करू अशी पश्चात्तापाची भावना निर्माण होते .सार्थक करू असे म्हणताना सत्संगती करावीशी वाटते .आपले स्वत :चे दोष ,आपण केलेल्या चुका दिसू लागतात ,त्यातून तो स्वत :ची निंदा करू लागतो .
म्हणे मी अवगुणांची राशीम्हणे मी व्यर्थ आलो जन्मासीम्हणे मी भार झालो भूमीसी
या नाव मुमुक्षु । । - -३६ । ।
कोणत्याही साधनांनी मनाचे समाधान झाले नाही की काया ,वाचा मनोभावे संतांना शरण जातो .
देहाभिमान ,कुलाभिमान द्रव्याभिमान संतचरणी वाहतो .लौकिक थोरपणाची त्याला लाज वाटायला
लागते ,परमार्थासाठी झीज सोसायाची त्याची तयारी असते .संताचा त्याला आपलेपणा त्याला वाटू
लागतो .थोडक्यात मुमुक्षु म्हणजे
स्वार्थ सांडून प्रपंचाचाहव्यास धरिला परमार्थाचाअंकित होइन सज्जनाचाम्हणे तो मुमुक्षु । ।
- -४३ । ।

No comments: