Friday, August 28, 2009


सिध्द
सिध्द :साधकाची पुढची अवस्था !समर्थ म्हणतात :साधू वस्तू होउनि ठेला । साधू म्हणजे सिध्द ब्रह्मरूप
होतो .त्यामुळे त्याचे संशय नाहीसे होतात .मी देह आहे ही देह्बुध्दी उरत नाही .मी ब्रह्म आहे या निश्चया पासून तो ढळत नाही .याकारणे नि :संदेह श्रोतीसाधू वोळखावा। । -१० -३२ । ।
साधकामधील संदेह वृत्ती नाहीशी होते ,सिध्द नि :संदेह असतो .
संशयरहित ज्ञानतेचि साधूचे लक्षण। । -१० -१३ । ।
अत्यंत संशयरहित आत्मज्ञान हेच सिध्द्पण अंगी बाणण्याचे लक्षण आहे .
म्हणोनि संदेहरहित ज्ञान । निश्चयाचे समाधान । तेचि सिध्दाचे लक्षण । निश्चयेसी । । ५ -१० - २७ । ।
संदेह म्हणजे संशय .यात अज्ञान असते .कारण वस्तूच्या स्वरूपाबद्दल खात्री नसते .सिध्दाला कोणतीही शंका नसते .देहबुध्दीत शंका असते .सिध्दाला शंका नसल्याने देह्बुध्दी विरलेली असते .सिध्द देहातीत असल्याने त्याची लक्षणे वाणीने सांगता येणारी नसतात .
जे लक्षवेना चक्षूसी । त्याची लक्षणे सांगावी कैसी । निर्मळ वस्तू सिध्द त्यासी । लक्षणे कैसी । । ५ -१०- ४३ । ।
सिध्द ब्रह्मस्वरूप झालेला असतो त्यामुळे त्याची लक्षणे वर्णन करता येत नाहीत .
अचळ झाली अंतरस्थितीतेथे चळणास कैची गतीस्वरूपी लागता वृतीस्वरूपची जाली । । - -१४ । । सिध्दाच्या मनाची वृती निश्चल होते .त्याच्यावर कोणत्याही बाह्य घटकांचा ,सुख दू :खाचा परिणाम होत
नाही .त्यामुळे त्याचे समाधान अचल राहते .सुख आणि दू :ख तो समान मानतो .अंतर्यामी तो स्थिर असतो .त्याची अंतरीच निवृती झालेली असते .कारण त्याचे मन सतत भगवंताच्या चरणी लागलेले असते .त्याचे हवे नको पण संपलेले असते .देहाची अवस्था कशीही असली तरी त्याचे मन आत्मस्वरूपाला चिकटलेली असते .
वृत्ती निर्गुण स्वरूपाच्या ठिकाणी राहणे ही परमार्थ साधनेची पराकाष्ठा आहे .त्रिगुणातीत परमात्म स्वरूपात राहणे ही साधनेच्या अभ्यासाची पराकाष्ठा आहे .हे केवळ संतसंगतीत राहून व श्रवण मननाने घडते .त्यामुळे साधू निष्काम असतात .त्याच्या जवळ स्वस्वरूपाचा अक्षय ठेवा असल्याने त्याला षड्रिपू त्रास देत नाहीत .सर्वत्र माझेच स्वरुप आहे असा प्रत्यय त्याला येत असल्याने कोणावर रागवायचे असा प्रश्न असतो त्यामुळे तो क्रोध रहित असतो .साधू स्वस्वरूपाच्या आनंदात तल्लीन असतो .दुस-यावर आरेरावी करायला त्याला वेळ नसतो .स्वस्वरूप निर्विकार असल्यामुळे साधूच्या अंगी विकार नसतात .साधू स्वरुप स्वयंभ । तेथे कैसा असेल दंभ । साधू
स्वत : स्वस्वरूप असल्यामुळे त्याच्यात द्वैत नसते .त्यामुळे दंभ कोणाला दाखवणार ?त्यामुळे तो दंभ रहित असतो .साधू कसा ओळखावा त्यासाठी समर्थ म्हणतात :
आशा धारिता परमार्थाचीदुराशा तुटली स्वार्थाचीम्हणोनि नैराशता साधूचीवोळखण। ।
-- ४६ । ।
मृदपणे जैसे गगनतैसे साधूचे लक्षणयाकारणे साधूवचनकठीण नाही । । - -४७ । ।
स्वरूपाचा संयोगीस्वरूपाची जाला योगीयाकारणे वीतरागीनिरंतर । । - -४८ । ।
स्थिती बाणता स्वरूपाचिचिंता सोडिली देहाचीयाकारणे होणाराचिचिंता नसे । । - -४९ । ।
साधू स्वरूपीच राहेतेथे संगची साहेम्हणोन साधू तो पाहेमानापमान । । - -५१ । ।

No comments: