Monday, November 30, 2009

कल्पनेचे स्वरुप

कल्पनेचे स्वरुप कसे असते ?
द्वैत पाहता ब्रह्म नसे ब्रह्म पाहता द्वैत नासे द्वैताद्वैत भासे कल्पनेसी - -१७
द्वैताचे जोपर्यंत भान असते तोपर्यंत ब्रह्माचा अनुभव येत नाही .ब्रह्माचा अनुभव आला की द्वैत शिल्लक उरत
नाही .द्वैत अद्वैत दोन्ही कल्पनाच !
कल्पनेचे दोन प्रकार आहेत :चांगली वाईट .
चांगली कल्पना :ईश्वरावर श्रध्दा ,निर्भयता ,चांगुलपणा ,यशाची खात्री
वाईट कल्पना : चिंता ,काळजी ,भय ,हीनपणाची भावना ,पुढे काय होईल ही काळजी .
मनाच्या श्लोकात समर्थ म्हणतात :
स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या
स्फुरे ब्रह्म रे जाण माया सुविद्या १७२
जी कल्पना विषया संबंधी स्फूरण देते तिला अविद्या म्हणतात .जी कल्पना ब्रह्माचे स्फूरण देते तिला सुविद्या म्हणतात .मूळ कल्पना दोन स्वरूपात असली तरी विवेकाने तीच कल्पना स्वस्वरूपात तदाकार होण्यासाठी मदत करते .कल्पनेचे सामर्थ्य खूप मोठे आहे .कल्पना मायेचे निवारण करते ब्रह्माला थारा देऊन ब्रह्माशी तदाकारता साधून देते .कल्पनाच संशय निर्माण करते , संशय नाहीसा करते .
कल्पनाच प्रपंचाचे बंधन निर्माण करते .कल्पनाच प्रपंचाचे बंधन तोडून देह्बुध्दी कडून आत्मबुध्दी कडे
नेते ,समाधान देते .ब्रह्मस्वरूपाशी अनुसंधान कल्पनाच लावते .कल्पनेने द्वैत निर्माण होते म्हणजे मी निर्माण करते .त्यातूनच मी मुक्त आहे किंवा मी बध्द आहे या कल्पना उगम पावतात .
कल्पना अंतरी सबळनस्ते दावी ब्रह्मगोलक्षणा येका ते निर्मलस्वरुप कल्पी । । - -२१ । ।
कल्पना शबल [अशुध्द ] असेल तर देह्बुध्दी ने खरे नसलेले दृश्य दृष्टीस पडते .त्याउलट कल्पना निर्मल केली तर स्वस्वरूप अनुभवास येते .
कल्पना जन्माचे मूळकल्पना भक्तीचे फळकल्पना तेचि केवळमोक्षदाती । । - -२४ । । क्षणाक्षणा वृत्ती बदलवणारी कल्पना असते .एका क्षणाला आपल्याला ती समाधान मिळवून देते तर दस-या क्षणी ती दु: देते .दु : देते कारण आपल्या वासनेची पूर्तता होत नाही .वासना जन्माचे मूळ आहे म्हणजे पर्यायाने कल्पना जन्माचे मूळ आहे .ती कल्पनाच नाहीशी केली म्हणजे कल्पनेचा निरास केला तर ब्रह्म प्राप्ती होते .
श्रवण मनन निदिध्यास यासारख्या साधन मार्गाने गेल्यास आत्मसाक्षत्कार होउन समाधान
होते .आत्मसाक्षत्काराने शुध्द ब्रह्मस्वरूपाचा अनुभव येतो .बुध्दी स्थिर होते .शबल कल्पना नष्ट होते .द्वैताचे
भान चिंतन नष्ट होते .शुध्द अशुध्द कल्पनेची व्याख्या समर्थ करतात :
अद्वैत कल्पी ते शुध्दद्वैत कल्पी ते अशुध्द । । - -३४ । ।
शुध्द कल्पनेचा अर्थअद्वैताचा निश्चितार्थआणि सबळ वेर्थद्वैत कल्पी । । - -३६ । । ज्या कल्पनेने अद्वैतात रमता येते ती शुध्द कल्पना जी कल्पना द्वैतात रमते ती अशुध्द कल्पना .एकच एक ब्रह्म सत्य आहे असा निश्चय होतो तेव्हा ती शुध्द कल्पना .शुध्द कल्पनेने अशुध्द कल्पना नष्ट करता येते .
शुध्द कल्पना ज्याची कल्पना करते ते आपले स्वस्वरूप ! शुध्द कल्पनेने स्वस्वरूपाशी अनुसंधान लागते .ती शुध्द कल्पनेची खूण आहे .


No comments: