Friday, January 22, 2010

अभ्यास करावा कवण ?

अभ्यास करावा कवणऐसा श्रोता करी प्रश्नपरमार्थाचे साधनबोलिले पाहिजे । । - -७३ । ।
परब्रह्माची प्राप्ती करून घेण्यासाठी अभ्यास कसा करावा असा प्रश्न श्रोता विचारतो .या प्रश्नाचे उत्तर समर्थांनी पुढील समासात म्हणजे दशक समास मध्ये दिले आहे .समर्थ म्हणतात :
ऐका परमार्थाचे साधनजेणे होय समाधानते तू जाण गा श्रवणनिश्चयेसी । । - - । ।
समर्थांनी परमार्थाचे सर्वात पाहिले साधन श्रवण सांगितले आहे .श्रवण हा शब्द समर्थ व्यापक पणे
वापरतात .श्रावणात मनन निदिध्यास अंतर्भूत आहे .ज्ञान ,भक्ती ,योग ,शक्तीमार्ग यात मनाची एकाग्रता होऊन ध्यानावस्था साधावी लागते .त्यासाठी मनाची एकाग्रता सहज प्राप्त होत नाही .ती श्रवणाने प्राप्त होते .
श्रवणाने मनावर ध्येयाचे संस्कार होतात .मननाने श्रवणा झालेला संस्कार खोलवर रुजून मनात खूप काळ घोळवता येतो .
श्रवणाने परमार्थास आवश्यक असणा-या पाच गोष्टी - संशय दूर होणे दृश्याची आसक्ती कमी होणे
भगवंत हवा असे वाटणे प्रतिभा जागी होणे मनाची एकाग्रता होणे ,या पाचही गोष्टी अनायासे साधतात .
श्रवण का करायचे ?
श्रवणाने भक्ती निर्माण होते ,विरक्ती उत्पन्न होते दृश्याची आसक्ती सुटते ,चित्त शुध्दी घडते ,बुध्दी स्थिर
होते ,अभिमानाची उपाधी नाहीशी होते .श्रवणाने निश्चय घडतो ,ममता -माझेपणा नाहीसा होतो ,अंतरी समाधानाची प्राप्ती होते ,शंका -कुशंका नाहिशा होतात ,संशय नाहीसा होतो ,अंतरंगातील दोष नाहीसे होतात ,मन आवरता येते ,समाधान पावते ,,समाधान पावते ,देह्बुध्दीचे बंधन नाश पावते ,मीपण नाहीसे होते ,अनेक संकटे नाश पावतात , कार्य सिध्दीस जाते .श्रवणाने समाधी साध्य होते ,संपूर्ण समाधानाच्या प्रप्तीची पूर्वतयारी होते .
सतसंगतीत श्रवण केले तर आत्मानात्मविवेक समजायला लागतो ,मन तदाकार होते ,ज्ञान वाढते , बुध्दीचा उत्कर्ष होतो , इंद्रियातून सुख घेण्याची ओढ कमी होते ,ब्रह्मविचार समजायला लागतो ,ज्ञानशक्ती वाढते , मन सूक्ष्म होऊ लागते ,आत्मविचाराचे आकलन होते आत्मदर्शन होते .श्रवणाने प्रपंचात परमार्थात जीवन
चालते .श्रवण केल्याशिवाय काय करावे कसे करावे हे कळत नाही .
श्रवण केले नाही तर काय होईल ?
सूर्य उगवला नाही तर सर्वत्र अंधार पसरतो ,तसे श्रवण घडले नाही तर मानवी जीवनात अज्ञानाचा अंधार
पसरतो .नवविधा भक्ती ,मुक्ती सहजस्थिती श्रवणाशिवाय कळत नाही .अध्ययन ,अध्यापन ,यजन याजन ,
दान ,प्रतिग्रह या सहा कर्मांचे आचरण कसे करायचे ते श्रवणाशिवाय कळत नाही .
श्रवणाने देह्बुध्दी मरते .
आपण जे श्रवण करतो त्याच्या अर्थाकडे क्ष देणे म्हणजे मनन

No comments: