Friday, January 22, 2010

श्रवण कसे करावे ?

श्रवण कसे करावे ?
आता श्रवण कैसे करावे कोण्या पंथास पहावे पुढील समासी आघवे सांगिजेल - -५०
श्रोते प्रश्न विचारतात ,श्रवण कसे करावे ?समर्थ दशक समास मध्ये उत्तर देतात :
आता श्रवण कैसे करावे तेहि सांगिजेल अवघे श्रोता सावधान द्यावे येकचित्ते - -
श्रवण कसे करावे हे नीट सांगतो .श्रोत्यांनी एकाग्र मनाने क्षपूर्वक ऐकावे :
येक वक्तृत्व श्रवणी पडे तेणे जाले समाधान मोडे केला निश्चय विघडे अकस्मात - -
ते वक्तृत्व त्यागावे जे माईक स्वभावे जेथे निश्चयाच्या नावे सुन्याकार - -
ज्या प्रवचनाने समाधान नाहीसे होते ,मनाने केलेला निश्चय मोडतो ,ते भ्रमात्मक ,हानिकारक वक्तृत्व
सोडून द्यावे ,कारण त्यात निश्चयाचा अभाव असतो .
मग श्रवण कोणते करावे ?
जेथे संशय तुटती होये आशंका निवृत्ती अद्वैत ग्रंथ परमार्थी श्रवण करावे - -
ज्या ग्रंथाने संशय नाहीसे होतात ,शंका निरसन होतात ,ते परमार्थ ग्रंथ श्रवण करावे .मोक्ष ज्यांना मिळवायाचा आहे त्यांच्या मनात अद्वैत ग्रंथाबद्दल प्रेम निर्माण होते ,त्याने अद्वैत ग्रंथातील आत्मानात्म विवेकाचा अभ्यास करायला हवा .
ज्याला ज्याची आवड असते त्याच्या समोर तेच ठेवल्यास आनंदाची प्राप्ती होते .
तैसा जो आत्मज्ञानी नर तयासी नावडे इतर तेथे पाहिजे सारासार विचारणा ते - -१२
आत्मज्ञानी माणसाला आत्मानात्म विचारानी भरलेले ग्रंथ आवडतात .इतर दुसरे काही चालत नाही .हे स्पष्ट करण्यासाठी समर्थांनी उदाहरणे दिली आहेत .
योगियांपुढे राहाण परीक्षवंतापुढे पाषाण पंडीतांपुढे डफगाण शोभा पवे - -१९
योग्या समोर भुताटकीचे प्रयोग केले ,विद्वानांसमोर तमाशातले गाणे म्हटले ,रत्नपारखी जवाहि-या समोर रत्ना ऐवजी दगड ठेवला तर शोभत नाही .
ब्रह्मचर्या पुढे नाचणी रासक्रीडा निरुपणी राजहंसापुढे पाणी ठेविले जैसे - -२१
ब्रह्मचा-या समोर नाचणारी कलावंतीण उभी केली ,निर्गुण निर्विकार ब्रह्मस्वरूपाच्या निरुपणात शृंगारप्रधान
रासक्रीडा सांगण्यास आरंभ केला ,राजहंसा समोर नुसते पाणी ठेवणे शोभत नाही .
तैसे पारमार्थिक जन तयास नस्ता आत्मज्ञान ग्रंथ वाचता समाधान होणार नाही - -२५
त्याप्रमाणे ज्यांना खरी परमार्थाची आवड आहे ,अशा साधक वृत्ती च्या माणसांना आत्मज्ञान पसंत पडते .ते ज्या ग्रंथात नसते त्यांना तो ग्रंथ वाचून समाधान होत नाही .म्हणून अद्वैत ग्रंथाचे श्रवण करावे .
अद्वैत ग्रंथ कोणाला म्हणतात ?
जेणे परमार्थ वाढे आंगी अनुताप चढे भक्ती साधन आवडे त्या नाव ग्रंथ - -३०
जो ऐकताच गर्व ले कां ते भ्रांतीच मावले नातरी येकसरे वोलेमन भगवंती । । - -३१ । ।
जेणे होये उपरतीअवगुण पालटतीजेणे चुके अधोगतीत्या नाव ग्रंथ । । - -३२ । ।
जेणे धारिष्टया चढेजेणे परोपकार घडेजेणे विषय वासना मोडेत्या नाव ग्रंथ। । - -३३ । ।
जो ग्रंथ वाचला असता साधकाचा परमार्थ वाढतो ,अनुताप उत्पन्न होतो ,मन शुध्द होते ,भक्तीची साधना करावी असे मनापासून वाटते ,तो अद्वैत ग्रंथ !
जो ग्रंथ वाचला ,ऐकला तर अभिमान नाहीसा होतो ,मन भगवंताकडे जाते तो ग्रंथ !ज्याच्या श्रवणाने माणसाला विरक्ती प्राप्त होते ,त्याचे दोष सुधारतात ,अधोगती होत नाही तो ग्रंथ ! ज्या ग्रंथाच्या वाचनाने देहातून सुख घेण्याची प्रवृत्ती मरते तोच खरा ग्रंथ !
ज्याच्या वाचनाने माणसाला परमार्थ साधना समजते ,ज्याच्या नित्य सहवासाने साधकाला आत्मज्ञान प्राप्त
होते ,माणूस कृतकृत्य होतो तो ग्रंथ !माणसाला आत्मज्ञाना पर्यंत पोचाविण्याची शक्ती असलेला तोच
खरा ग्रंथ !तोच श्रवणास योग्य !
म्हणोनी नित्यानित्यविचारजेथे बोलिला सारासारतोचि ग्रंथ पैलपारपाववि विवेके । । - -६० । । ज्या ग्रंथात शाश्वत काय ,अशाश्वत काय याचे विवेचन असते ,सार कोणते ,असार कोणते हे सांगितलेले
असते ,अशा ग्रंथाचे परिशीलन विवेक निर्माण करते माणूस आत्मज्ञाना पर्यंत पोहोचतो .

No comments: