
। जाणीव म्हणिजे अंत :कर्ण । अंत :कर्ण विष्णूचा अंश जाण। विष्णू करितो पाळण । येणे प्रकारे । । १०-१-२६ । ।
नेणतां प्राणी संव्हारितो । नेणीव तमोगुण बोलिजेतो । तमोगुणे रूद्र संव्हारितो । येणे प्रकारे । । १०-१-२७ । ।
कांही जाणीव कांही नेणीव । हा रजोगुणाचा स्वभाव । जाणतां नेणतां जीव । जन्मास येती । । १०-१-२८ । ।
जाणण्यानेणण्याची बुध्दी । तोचिं देही जाणावा विधि । स्थूळ देही ब्रह्मा त्रिशुध्दी । उत्पत्ति । । १०-१-२९ । ।
जाणीव म्हणजे सत्वगुण ! विष्णू जाणीवेच्या रूपाने ,सत्वगुणाच्या रूपाने आपल्या देहात असतो .महेश तमोगुणाच्या रूपाने आपल्या शरीरात आहे .तर जाणीव नेणीवेच्या रूपात ब्रह्मा रजोगुणाच्या रूपाने आपल्या देहात असतो .तेव्हा शिष्य शंका विचारतात :
स्वामीने विचार दाखविला । येथे विष्णूचा अभाव दिसोन आला । ब्रह्मा विष्णू महेशाला । उरी नाही । । १०-२-१ । ।
उत्पत्ती स्थिती संहार । ब्रह्मा विष्णू महेश्वर । याचा पाहता विचार । प्रत्ययो नाही । । १०-२-२ । ।
ब्रह्मा उत्पत्तीकर्ता चौमुखांचा । येथे प्रत्ययो नाही त्याचा ।
पाळणकर्ता विष्णू चौभुजांचा । तो ही ऐकोन जाणो। । १०-२-३ । ।
महेश संहार करतो । हाहि प्रत्ययो कैसा येतो । लिंग महिमा पुराणी तो । विपरीत बोलिला । । १०-२-४ ।
शिष्य म्हणतात
ब्रह्मा ,विष्णू व महेश या देवता शरीरात आहेत ,पण त्या देवतांना शरीरात कोठे स्थान आहे ते कळत नाही .ब्रह्मा विष्णू महेश उत्पति स्थिती संहार घडवतात .याचा शोध घेतला तर अनुभव येत नाही .उत्पत्ती करणारा ब्रह्मदेव चार तोंडाचा आहे असे सांगतात ,पालन करणारा विष्णू चौभुजांचा आहे असे सांगतात ते खरे आहे का?
समर्थ सांगतात :परब्रह्माच्या ठिकाणी मूळमाया निर्माण झाली .ती वायूस्वरूप व शक्तिमय आहे .वायूमधील जाणीवेचे रूप तीच मूळमायेची इच्छा .तिच्यातील शक्तीतील जाणीव सत्यसंकल्प आहे ती मूळमाया परब्रह्माच्या एका भागावर वावरते .त्या जाणीवेच्या अधिष्ठान ब्रह्माला ईश्वर म्हणतात .
तोच ईश्वर गुणासी आला । त्याचा त्रिगुण भेद जाला । ब्रह्मा विष्णू महेश उपजला । तये ठायी। । १०-४-१७ । ।
सत्व रज आणि तम । हे त्रिगुण उत्तमोत्तम । त्यांच्या स्वरूपाचा अनुक्रम । मागां निरोपिला । । १०-४-१८ । ।
जाणता विष्णू भगवान । जाणतानेणता चतुरानन । नेणता महेश पंचानन । अत्यंत भोळा । । १०-४-१९ । ।
वायोमध्ये विष्णू होता । तो वायोस्वरूपची तत्वता । पुढे झाला देह्धर्ता। चतुर्भुजू । । १०-४-२१ । ।
तैसाच ब्रह्मा आणि महेश । देह धरिती सावकाश । गुप्त प्रगट होता तयांस । वेळ नाही । । १०-४-२२ । ।
तीनही गुणांचे स्वामी निर्माण झाले .सत्व गुणाचा स्वामी विष्णू ,रजोगुणाचा ब्रह्मदेव ,तमोगुणाचा स्वामी शंकर !
मूळमायेतील जाणीवेत सत्वमय विष्णू जाणीवस्वरुप होता पण त्याने चार हात असलेला देह धारण केला .त्याच प्रमाणे योग्य वेळी देह धारण करतात .
ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली .शुध्द जाणीवेने प्रत्यक्ष शरीर धारण करून दुष्टांचा संहार केला .त्यासाठी विष्णूरूप शुध्द जाणीव अनेक अवतार धारण करते .धर्मस्थापना करणारे सर्व विष्णूचे अवतार समजले जातात .
जन्माला आलेल्या सर्व प्राण्यांचा नेणीव संहार करते .सर्व प्राण्यांच्या शरीरातील रूद्र खवळतो तेव्हा सारी सृष्टी नाश पावते .सारे विश्व जळून जाते .समर्थ म्हणतात :
आता प्राणी जे जन्मले । ते नेणोंन संव्हारेल । मूळरूपे संव्हारिले । येणे प्रकारे । । १०-४-४३ । ।
No comments:
Post a Comment