Friday, March 20, 2009

या नांव ज्ञान


शुध्द ज्ञान
तरी ते कैसे आहे ज्ञानसमाधानाचे लक्षणऐसे हे विशद करूनमज निरोपावे । । - -३८ दशक समास मध्ये बहुधाज्ञान निरूपण समासात चौदा विद्या ,चौसष्ट कला सगळ्या सिध्दी काहीही ज्ञान नाही असे सांगितले .म्हणून ३८ व्या शिष्य विचारतो की ते ज्ञान काय आहे ते मला सांगा . दशक समास मध्ये समर्थ म्हणतात ,
ऐक ज्ञानाचे लक्षणज्ञान म्हणजे आत्मज्ञानपहावे आपणासि आपणया नाव ज्ञान । । - - । । ज्ञान म्हणजे आत्मज्ञान ,म्हणजे मी कोण याचे ज्ञान .त्यासाठी आपले आपण आपल्याला पहायला हवे मी कशाचा बनलो आहे याचा शोध घेतला तर हे बाह्य शरीर पंचभूतांचे बनले आहे .पृथ्वी ,आप ,तेज ,
वायु
,आकाश या पंमहाभूतां ! मग ही पंचमहाभूते म्हणजे मी आहे का असा प्रश्न पडतो .
पृथ्वी हे आपल्या शरीरातील तत्व दाखवते कठीणपणा ! आपल्या शरीरात ते हाडे,मांस ,त्वचा ,
नाडी
,रोम या स्वरूपात असते .पण या तत्वाला स्वतंत्र जाणीव नसते ,स्वतंत्र अस्तित्व नसते .त्यामुळे पृथ्वी तत्व माझ खर रूप नाही
आपल्या
शरीरात रक्त ,लाळ,रेत ,मूत्र ,घाम या रूपात आप तत्व असते .आपल्या शरीरात रूधिराभिसरण सतत चालू असते .परंतु आप तत्वाला स्वतंत्र जाणीव नसते .स्वतंत्र अस्तित्व नसते .त्यामुळे आप तत्व म्हणजे मी नाही .
तेज
तत्व आपल्या शरीरात भूक ,तहान ,आळस,झोप ,मैथुन या स्वरूपात असते .परंतु या सर्व मनाच्या कल्पना आहेत .त्यांना स्वतंत्र अस्तित्व नाही .म्हणून तेज तत्व म्हणजे मी नाही .
वायु
तत्व आपल्या शरीरात घडणारे चलन ,वलन,प्रसारण ,निरोध ,आकुंचन या स्वरूपात असते .पण ते जडच असते ,त्यामुळे ते तत्व म्हणजे मी नाही .
आकाश
तत्त्व आपल्या शरीरात असलेल्या पोकळी च्या रूपात असते .त्यामुळेच आपल्या अं:करणात काम , क्रोध ,शोक ,मोह ,भय या रूपात वृतीचे तरंग असतात .शरीरातील पोकळी मुळे रक्त प्रवाह चालू रहातो ,वायु ची देवाण घेवाण चालू रहाते.तरी सुध्दा आकाशाला ही जडत्व असते .कारण पाचही तत्त्व एकत्र मिसळलेली असतात .त्यामुळे हे पंचभूतिक शरीर जड़ आहे नाशिवंत आहे .म्हणजे वायु तत्व मी नाही
म्हणजे
हे स्थूल शरीर म्हणजे मी नाही . गूद ,शिश्न ,हात ,पाय,वाणी ही आपली कर्मेंद्रिये ,नाक ,जीभ ,कान ,डोळे,त्वचा ही ज्ञानेंद्रिये सुध्दा पंचभूतिक आहेत ,जड़ आहेत .नाशिवंत आहेत म्हणजे कर्मेंद्रिये ज्ञानेंद्रिये म्हणजे मी नाही .यापैकी एखाद्या इन्द्रियात कमतरता आली तरी माणूस जिवंत राहू
शकतो .म्हणजे कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिये म्हणजे मी नाही .म्हणजे स्थूल देह म्हणजे मी नाही .
पिंडा चे चार देह आहेत -स्थूल ,सूक्ष्म,कारण ,महाकारण .
यापैकी
स्थूल देह म्हणजे मी नाही हे पाहिल .
आता
सूक्ष्म देह म्हणजे मी आहे का बघू . सूक्ष्म देह हा वासनात्मक असतो किंवा वायु स्वरुप
असतो
.सूक्ष्म शरीर विचारांचा तरंग असतो .प्रथम माणसाच्या मनात कोणताही विचार येतो तेव्हा त्याला अं:करण किंवा संकल्प म्हणतात .संकल्प पुरा होइल की नाही असा विचार येतो त्याला विकल्प म्हणतात .संकल्प विकल्प मिळून मन तयार होते .संकल्प विकल्प करून एक निर्णय आपण घेतो .त्याला बुध्दी म्हणतात .घेतलेला निर्णय कृतित आणण्यासाठी योजना बनवतो .विचारांचे तरंग मनात उत्त्पन्न होतात .त्याला चित्त म्हणतात .प्रत्यक्षात कृती घडते तेव्हा अभिनिवेश निर्माण होतो त्याला अंहकार म्हणतात .
म्हणजे
सूक्ष्म देहाचे अंत :करण ,मन ,बुध्दी ,चित्त ,अंहकार असे भाग पडतात .पण अंत :करण पंचक हे विचारांचे तरंग आहेत ,मानासिक आहेत ,म्हणून अंत :करण पंचक म्हणजे मी नाही .म्हणून सूक्ष्म देह म्हणजे मी नाही.
वासना
अज्ञानाने असते ,अज्ञान असते म्हणून वासना आहे अज्ञान ही सुध्दा अवस्था आहे .अज्ञान रूपी कारण देह सुध्दा मी नाही .
ज्ञान ही सुध्द्दा अवस्थाच आहे ,ज्ञान रूपी महाकारण देह सुध्दा मी नाही .
मग
मी कोण ?
केनोपनिषदात म्हटले आहे ,
श्रोत्रस्य
श्रोत्रं मनसो मनो
यद्
वाचो वाचं प्राणस्य प्राण :।
क्षुश्श्च क्षु : अतिमुच्य धीरा :।
प्रत्यास्मा ल्लोकाद अमृता भवन्ति
म्हणजे आपल्या शरीरात असा काही आहे की जे कानांचा कान आहे ,जो ऐकतो आहे ,डोळ्यांचा डोळा आहे जो पाहतो आहे .वाचेची वाणी आहे ,मनाचे मन आहे हे सर्व करणारा कर्ता करावीता जो आहे तोच मी आहे .

No comments: