Wednesday, March 25, 2009

या नाव ज्ञान

मुख्य देवास जाणावे
मुख्य देवास जाणावे सत्य स्वरुप वोळखावे नित्यानित्य विचारावे या नाव ज्ञान - - माणसाने त्याच्या कल्पनेप्रमाणे अनेक प्रकारचे अनेक देव निर्माण केले .अनेक शास्त्रे ,अनेक मते मतांतरे या सगळ्यात खरा देव कोणाला कळेनासे होते .लोक सर्व साधारण पणे प्रकारचे देव मानतात . प्रतिमा अवतार .अंतरात्मा .निर्मळात्मा [निश्चळ परब्रह्म ].
हिंदू धर्मात ३३ कोटी देव मानले आहेत .हे दे लोकांच्या प्रापंचिक वासना पूर्ण कराव्या म्हणून भजले जातात .पण त्यापासून समाधान मिळत नाही .
मृत्तिका ,धातू पाषाणादिक ऐसिया प्रतिमा अनेकबहुतेक लोकांचा दंडकप्रतिमादेवी ११ --२९
धातू ,दगड ,माती यापासून तयार केलेल्या देवांच्या प्रतिमा म्हणजे देव अशी लोकांची कल्पना असते .
देवांचे जे अवतार होउन गेले त्यांना लोक पूजा करतात ,त्यांचा जप करतात ,त्यांचे ध्यान करतात .
सर्वांच्या अंतरात्म्याला काही लोक देव मानतात तर काही जण विश्वाला व्यापून असणा-यांना विश्वात्म्याला देव मानतात,तर काही जो ज्ञानात्मा ,द्रष्टा असतो त्याला देव मानतात .
आपल्या आराध्य दैवताची मूर्ती ,प्रतिमा देवघरात ठेऊन त्याची यथासांग पूजा केली जाते .त्यामुळे लोकांना दिलासा मिळतो ,सांसारिक चिंतनात आडकलेले मन त्यापासून थोड़े वेगळे होते .पण आपल्या घरातील देव खरा देव आहे का ? हा प्रश्न आहे . तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी लोकांनी देव पाहिला ,तशीच धातूची मूर्ती तयार केली तर प्रतिमादेव तयार होतो .क्षेत्रातील देव अवतारी देवांची प्रतिमा असते .ब्रह्मा ,विष्णू हे तीनही देव सर्व देवात वरिष्ठ मानले जातात .
त्या तिही देवांस ज्याची सत्ता तो अंतरात्माचि पाहता। कर्ता भोक्ता तत्वता प्रत्यक्ष आहे १८- -
ब्रह्मा ,विष्णू ,महेश या तीनही देवांवर अंतरात्म्याची सत्ता चालते .अंतरात्माच कर्ता ,भोक्ता असतो .माणसाच्या अंतर्यामी असलेली शुध्द जाणीव म्हणजे अंतरात्मा ! अंतरात्मा शरीर चालवतो ,जाणीवेच्या रूपाने ,विवेकाने ! सामान्य माणूस त्याच्या अंतर्यामी असलेल्या अंतरात्म्याला विसरतो ,तीर्थक्षेत्रांना भेटी देतो ,सगळीकड़े त्याला दगडधोंडे दिसतात .खरा देव दिसतच नाही .सत्संगाने माणूस अंतर्मुख होतो ,आत बघायला शिकतो ,सूक्ष्माचे ज्ञान होते ,विचाराने ,साधनेने आत्मस्वरूपा पर्यंत पोहोचतो .
तो अंतरात्मा म्हणिजे देव त्याचा चंच स्वभाव पाळिताहे सकळ जीव अंतरीच वसोनि११ -- अंतरात्मा हाच देव जो सर्व जीवांच्या अंतर्यामी राहतो .त्यांचे पालन करतो .अंतरात्मा सर्व दृष्याचे मूळ
आहे .अंतरात्मा तो एकच आहे जो विश्वरूपाने विस्तार पावला आहे .पण सगुणामध्ये .दृश्य प्रकृती मध्ये विश्वरूपाने विस्तार पावलेला आत्मा हा अनेक प्रकारांच्या बदलांचा ,भेदांचा आहे ,त्यामुळे तो शाश्वत
नाही .अंतरात्मा सर्वत्र व्यापून असतो पण सर्व प्राण्यांत माणसात सारख्या सामर्थ्याने प्रकट होत
नाही .शरीराला जिवंत ठेवणारी ,इंद्रियांना चेतना देणारी ,मनाच्या व्यापारांना प्रेरणा देणारी ,बुध्दी ला विचार करायला लावणारी ,जीवपणाने सुखदू : भोगणारी ,उद्वेग ,चिंता ,माया ममता अनुभवणारी सूक्ष्म चित्कला ती आत्मा !देहात राहणारा आत्मा डोळ्यातून पाहतो ,कानातून ऐकतो ,नाकातून वास घेतो .तो एकटा इंद्रियांद्वारा सगळी हालचाल घडवून आणतो आत्माच उठतो ,निजतो,चालतो ,पळतो सर्व क्रिया घडवून आणतो .देह नाशवंत आहे ,आत्मा शाश्वत आहे ,खरा देव आहे .
पिंडाच्या दृष्टीने देह धारण करणारा आत्मा तो जीव ,ब्रह्मांडाच्या दृष्टीने विश्व धारण करणारा तो शिव .जसे पिंडाचे चार देह तसे ब्रह्मांडाचे चार देह असतात .विराट ,हिरण्यगर्भ,अव्याकृत मूळमाया .या चार देहांनी ईश्वर विश्वाला धारण करतो .तो त्रिगुणातीत असतो .त्रिगुणातीत असणारा ईश्वर म्हणजे परब्रह्म ! परब्रह्मामध्ये जो संकल्प निर्माण होतो तो स्फुरणरूप असतो .त्या संकल्प रूपाला मूळमाया म्हणतात .मूळमायेची दोन अंगे असतात .एक शुध्द जाणीव रूप दूसरी शक्तीरूप .जाणीव रूप अंगाला मूळपुरूष म्हणतात .त्यालाच समर्थ थोरला देव
म्हणतात . दशक समास मध्ये श्रोते प्रश्न विचारतात ,
देव कोणासी म्हणावेकैसे तयासी जाणावे
समर्थ उत्तर देतात ,
जेणे केले चराचरकेले स्रुष्ट्यादि व्यापारसर्व कर्ता निरंतरनाम ज्याचे । । - -१७ । ।
ज्याने सर्व जग निर्माण केले ,दृश्य विश्वाचे सर्व व्यापार जो नियंत्रित करतो तो देव .ज्याने मेघमाला निर्माण
केल्या , चंद्राच्या चांदण्यात अमृत घातले ,रविमंलाला तेज दिले ,ज्याने सागराला मर्यादा घालून
दिली ,शेषाला पृथ्वी चा भार सांभाळण्यासाठी नेमणूक करून दिली तो थोरला देव .चार खाणी-स्वेदज ,
उद्भिज ,अण्डज,जारज ,चार वाणी -परा ,पश्यंती ,मध्यमा ,वैखरी ,चौ-यांक्षी लक्ष जीवयोनी ,स्वर्ग ,मृत्यु ,पाताळ हे तीनही लोक ज्याने निर्माण केले तो देव .
ब्रह्मा विष्णू आणि हरहे जयाचे अवतारतोचि देव हां निर्धारनिश्चयेसी । । - -२१ । ।
समर्थ म्हणतात ,देव्हा-यातील देव खरा नव्हे ,कारण तो सर्व जीवप्राणी निर्माण करू शकत नाही .जागोजागी माणसाने बनवलेले खूप देव आहेत पण त्यांच्या पैकी कोणीही पृथ्वी बनवलेली नाही,किंवा चंद्र ,सूर्य ,तारका बनवलेल्या नाहीत .
मग देव कोण हे सांगताना समर्थ म्हणतात ,
सर्व कर्ता तोचि देवपाहो जाता निरावेवज्याची कळा लीळा लाघवनेणती ब्रह्मादिक। । - -२४। ।


No comments: