Sunday, March 1, 2009

चत्वार मुक्ती

चत्वार मुक्ती
आत्मनिवेदन भक्ती सांगितल्यावर समर्थांनी या भक्तींचे फळ म्हणजे चार मुक्ती सांगितल्या आहेत . सलोकता
समीपता सरूपता सायुज्यता .
आत्मनिवेदन भक्तीत शेवटी समर्थ म्हणतात ,
ऐसी हे नवविधा भक्तीकेल्या पाविजे सायोज्यमुक्तीसायोज्यमुक्तीस कल्पांतीचळण नाही । । - - । ।
नवविधा भक्तीचे आचरण केले तर सायोज्य मुक्ती लय पावत नाही .वेद शास्त्रांनी चार मुक्तींचे वर्णन केले आहे मुक्तींचे वर्णन करण्यापूर्वी मुक्ती म्हणजे काय ते पहायला हवे .मोक्षयती दु:ख़म अनेन इति मुक्ती: । सर्व प्रकारच्या दु:खापासून बंधनापासून ,वासनांपासून ,ज्ञानापासून सुटण्याची ,मोकळे होण्याची अवस्था म्हणजे मुक्ती !
दशक समास १० मध्ये समर्थांनी चारही मुक्तींच्या व्याख्या केल्या आहेत .
येथे ज्या देवाचे भजन करावेतेथे ते देवलोकी रहावेस्वलोकता मुक्तीचे जाणावे लक्षण ऐसे । ।
-१० -२३ । ।
लोकी रहावे ते स्वलोकतासमीप असावे ते समीपतास्वरूपचि व्हावे ते स्वरूपतातिसरी भक्ती।।
-१० -२४। ।
देवस्वरुप झाला देहीश्रीवत्स कौस्तुभ लक्ष्मी नाहीस्वरूपतेचे लक्षण पाहीऐसे असे । । -१० -२५ । ।
सुकृत आहे तो भोगितीसुकृत सरताच ढकलून देतीजैसे तैसे । । - १० -२६ । ।
ज्या देवाची भक्ती करायची त्या देवाच्या लोकात रहायला मिळणे याला सलोकता मुक्ती म्हणतात .देवाच्या जवळ रहायला मिळणे याला समीपता मुक्ती म्हणतात .देवाच्या रूपा सारखे रूप मिळणे याला सरूपता मुक्ती म्हणतात.पण जेव्हा पुण्य संपते तेव्हा त्या लोकातून ,देवाच्या जवळून खाली मृत्युलोकात यावे लागते .त्यामुळे या
तीनही मुक्ती नाशिवंत आहेत .तर शेवटची मुक्ती सायोज्यता मुक्ती .आत्मनिवेदन भक्तीत मी चे समर्पण असते .तेव्हा जीव शिवाची ऐक्यता असते .भक्ताचा विभक्तपणा संपतो .साधक भगवंताशी समरस झाला मीपणा ने तो वेगळा होऊ शकत नाही .तेव्हा संसारात समाजात असून तो नसल्या सारखा असतो
जीवनातल्या सुखदु :खांची मजसी का बाधा ?जीवन नामक ज्ञातील या दोन्हीही समिधाअशी अलिप्त पणाची अवस्था असते .तुकाराम महाराज म्हणतात -तुका म्हणे उरलो उपकारापुरता
दशक ११ समास मध्ये समर्थ म्हणतात ,
निर्गुणी जे अनन्यतातेचि मुक्ती सायोज्यता लक्षां वाच्यांश आतापुरे झाला । । ११ - -४२। ।
निर्गुणाशी अनन्यता होणे म्हणजे सायोज्य मुक्ती .श्रवणाने बुध्दीमध्ये स्वरूपाबद्दल निश्चय होणे ती टिकवणे म्हणजे सायोज्यमुक्ती .

No comments: