Thursday, March 11, 2010

मृत्यु कोणता चांगला ?

मृत्यु कसा हवा ?
सामान्य माणूस देहाच्या अवस्थेवरुन अंतकाल कसा झाला ते ठरवतो .बरा झाला की वाईट ते ठरवतो .
देहाचा अंत बरा झालादेह सुखरूप गेलात्यासी म्हणती धन्य झालाअज्ञान जन । । -१० -११ । ।
पुण्यनदीचे जे तीरतेथे पडावे शरीरहा इतर जनाचा विचारसाधू नित्य मुक्त । । -१० -१२ । ।
उत्तरायण ते उत्तमक्षणायेन ते अधमहा संदेही वसे भ्रमसाधू तो नि :संदेह । । -१० -१३ । ।
शुक्ल क्ष उत्तरायेनगृही दीप दिवा मरणअंती रहावे स्मरणगतीकारणे । । -१० -१४ । ।
अज्ञानी माणसे फारसा त्रास होता देह पडला म्हणजे देहाचा अंत चांगला झाला ,तो धन्य झाला असे
म्हणतो .एखाद्या पुण्य नदीच्या काठी देह पडला की मुक्ती लाभते असा सामान्य लोकांचा विचार असतो .मृत्यु येण्यासाठी उत्तरायण हा उत्तम क्षिणा हा अधम काळ असा देह्बुध्दीचा भ्रम असतो .शास्त्र सांगते की उत्तरायाणात ,शुक्ल क्ष असताना ,घरात दिवा जळत असताना ,दिवसा मरण यावे ,त्याच्या अंतकाली त्याला भगवंताचे स्मरण असावे म्हणजे जीवाला उत्तम गती लाभते .परंतु अंतकाली भगवंताचे नाम मुखात येणे,भगवंताचे स्मरण असणे हा उत्तम मृत्यु होय .जन्मभर कसेही वागून अंतकाली भगवंताचे नाम मुखात येत नाही .म्हणून देहाच्या दृष्टीने सुखाचे मरण आले तरी भक्ती केलेली नसेल नामस्मरण केलेले नसेल तर त्याला गती चांगली मिळे असे नाही .
म्हणून साधू बाहेरून इतरांसारखा असला तरी त्याची आतील अवस्था निराली असते .त्याच्या देहाला कष्ट झाले दु: झाले तरी त्याचा त्याला पत्ता नसतो .तो स्वानंदात मग्न असतो .मी देह आहे ही भावना त्याला उरत नाही म्हणून समर्थ म्हणतात :
जे का जीवन्मुक्त ज्ञानीत्यांचे शरीर पडो रानीअथवा पडो स्मशानीतरी धन्य झाले । । -१० -२५ । ।
साधूचा देह खितपलाअथवा श्वानादिकी क्षिलाहे प्रशस्त वाटे जनालामंदबुध्दी स्तव । । - १० -२५ । ।
अंत बरा नव्हेचि म्हणोंकष्टी होती इतरजनपरी बापुडे अज्ञाननेणती वर्म । । -१० -२७ । ।
साधूच्या अंगी देह बुध्दी नसते ,आत्मबुध्दी असते म्हणून अंतकाळी त्यांचा देह रानात ,स्मशानात पडला तरी ते धन्य होत .त्यांचा देह खितपत पडला ,कुत्र्या मांजरांनी खाल्ला तर लोकांना त्याचे वाईट वाटते .पण मी आत्मा आहे अशी दृढ़ भावना साधूची असते त्यामुळे ज्या आत्म्याला जन्मच येत नाही त्याला मृत्युही नाही असा आत्मानात्म विवेक साधूकडे असतो .तो मृत्युच्या पलिकडे गेलेला असतो .
जो जीतची असता मेलामरणास मारून ज्यालाजन्ममृत्यु स्मरे त्यालाविवेकबळे । । -१० -३० । ।
तो जनी दिसतो परी वेगळावर्तता भासे निराळादृश्य पदार्थ त्या निर्मळास्पर्षलाच नाही । । -१० -३१ । ।
साधूची देह्बुध्दी मेलेली असल्याने जिवंत असून मेल्यासारखा राहतो .वासना मरतात .त्यामुळे तो मृत्युला मारून जिवंत राहतो .

No comments: