म्हणाल तेथे कैंची जाणीव । तरी एका याचा अभिप्राव । पिंडी महाकारण देही सर्व -। साक्षिणी अवस्था । । ९ -६ -४ । ।
तैसी मूळप्रकृती ब्रह्मांडीचे । देह महाकारण साचे । म्हणोन तेथे जाणिवेचे । अधिष्ठान आले । । ९ -६ -५ । ।
श्रोते विचारतात मूळमायेत जाणीव कोठून आली ?समर्थ सांगतात :पिंडाचे चार देह असतात .महाकारण हा चौथा देह आहे .हा देह ज्ञानाचा असतो .सर्वसाक्षिणी तुर्या अवस्था हे त्याचे लक्षण आहे .ब्रह्मांडाच्या चार देहापैकी मूळप्रकृती हा महाकारण देह आहे .तो ज्ञानमय आहे .त्यामुळे शुध्द जाणीवेचे अधिष्ठान आहे .जाणिवेने ज्ञान
होते .म्हणजे जेथे जाणीव असते तेथे ज्ञान जन्माला येते .व जेथे ज्ञान दिसते तेथे जाणीव असते .
परब्रह्म केवल असते .तेथे ज्ञानही नसते अज्ञानही नसते .पण मूळमायेत 'मी ब्रह्म आहे 'अशी ज्ञानरूप जाणीव
आहे ,तशीच अज्ञानरूप नेणीवही आहे .मूळमाया नसती तर परब्रह्माला स्वत :ची ज्ञानरूप जाणीव झाली
नसती .जाणीव आणि नेणीव किंवा ज्ञान आणि अज्ञान या जोड्यांना मूळमाया हेच अधिष्ठान आहे .मूळमाया वायूरूप आहे मूळमायेपासून गुणमाया निर्माण झाली .त्यापासून त्रिगुणांची निर्मिती झाली .पंचमहाभूते व त्रिगुण यांच्या सहाय्याने दृश्य विश्व निर्माण झाले .हेतूपूर्वक होणारी हालचाल म्हणजे जाणीव .हे वायूचे लक्षण
आहे .जाणीव हे जिवंतपणाचे लक्षण आहे .म्हणून समर्थ म्हणतात :
जेथे मुळीच नाही चळन । तेथे कैचे जाणीव लक्षण । म्हणोनि वायो । नेमस्त जाणावा । । ९ -६ -१३ । ।
जेथे कोठे हालचाल होते तेथे जाणीव असते .वायू हालचाल करतो म्हणून वायूचा जाणीव ह़ा गुण आहे .मूळमाया जाणीव रूप आहे म्हणून ती वायूरूप आहे
म्हणोन जाणीवनेणीव मिश्रित । अवघे चालिले पंचभूत । म्हणोनिया भूतात । जाणीव असे । । ९ -६ -२० । ।
जाणीव आणि नेणीव यांच्या मिश्रणाने पंचमहाभूतांचा सगळा खटाटोप चालतो .त्यामुळे पंचभूतात जाणीव असतेच असते .पण काही ठिकाणी ती दिसते तर काही ठिकाणी ती दिसत नाही . जाणीव स्थूल किंवा सूक्ष्म दोंहीनाही
असते .लाकडात अग्नी असून दिसत नाही .वायू वाहणे बंद झाले की असून भासत नाही .जाणीव जेव्हा पिंडाला व्यापते तेव्हा त्याला जीव म्हणतात .जाणीव जेव्हा विश्वाला किंवा ब्रह्मांडाला व्यापते तेव्हा त्याला शिव
म्हणतात .दृश्य वस्तूची -पिंडाची ,ब्रहमांडाची ,मर्यादा नसणारी जी शुध्द निर्भेळ ,अनंत जाणीव तेच परमात्मस्वरूप !
Friday, April 30, 2010
Wednesday, April 28, 2010
पिंड ब्रह्माण्ड एकच कसे ?
श्रोते म्हणती हे प्रमाण । जाले परम समाधान । परी पिंड ब्रह्मांड ऐक्य लक्षण। मज निरोपावे । । ९ -४ -४३ । ।
ब्रह्मांडी तेची पिंडी असे । बहुत बोलती ऐसे । परन्तु याचा प्रत्यय विलसे। ऐसे केले पाहिजे । । ९ -४ -४४ । ।
श्रोत्यांनी विनंती केली की पिंड व ब्रह्मांड सारखे कसे ते सांगावे .पिंडी ते ब्रह्मांडी असे सर्व लोक म्हणतात ,पण नेमके कसे ते कळत नाही तेव्हा कृपा करून उलगड़वून सांगावे .समर्थ म्हणतात :
पिंडासारखी ब्रह्मांड रचना । न ये आमुच्या अनुमाना । प्रचित पाहाता नाना । मते भांबावती । । ९ -५ -१ । ।
ब्रहमांडाची पिंडासारखी रचना आहे असे बोलण्याची पध्दत आहे .पण मनाला ते पटत नाही .तसा अनुभव ही येत नाही .
स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण । हे च्यारी पिंडीचे देह जाण।
विराट हिरण्य अव्याकृत मूळप्रकृती हे खूण । ब्रह्मांडीची । । ९ -५ -४ । ।
पिंडाचे स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण हे चार देह तर ब्रह्मांडीचे विराट , हिरण्य ,अव्याकृत मूळप्रकृती हे चार देह आहेत ,पण शास्त्रातले हे वर्णन काल्पनिक वाटते .कारण पिंडात अंतकरण तर ब्रह्मांडात विष्णू ,पिंडात मन तसे ब्रह्मांडात चंद्र,पिंडात बुध्दी तशी ब्रह्मांडात ब्रह्मदेव ,पिंडात चित्त तसे ब्रह्मांडात नारायण असतो .पिंडात अहंकार तसा ब्रह्मांडात रूद्र असतो .पण श्रोते विचारतात की विष्णूचे अंत :करण कोणते ?चंद्राचे मन असते .रूद्राचा अहंकार कसा असतो ?
या प्रश्नांचे उत्तर देताना समर्थ म्हणतात :
म्हणोंन हा अवघाच अनुमान । अवघे कल्पनेचे रान । भली न घ्यावे आडरान। तष्करी घ्यावे । । ९ -५ -२० । ।
कल्पून निर्मिले मंत्र । देव ते कल्पना मात्र । देव नाही स्वाधेन। मंत्राधेन। । ९ -५ -२१ । ।
जे पिंडी ते ब्रह्मांडी हा अनुमानाचा खेळ आहे .कल्पनेचे जंगल आहे .आपण ज्या देवतांना मानतो त्या सुध्दा काल्पनिक आहेत .कोणाच्यातरी मनात कल्पना येते ,तो मंत्र रचतो ,त्या मंत्राची देवता कल्पनेतून
निर्माण होते .मंत्राने देवतेची प्राणप्रतिष्ठा करतात .म्हणजे देवता स्वतंत्र नसतात .मंत्रांच्या अधीन असतात .पण त्यातही अनेक प्रश्न निर्माण होतात .ब्रह्मदेवाने जग निर्माण केले तर ब्रह्मदेवाला कोणी निर्माण केले ?विष्णू विश्वाचे पालन करतो तर विष्णूला कोण सांभाळतो?रूद्र किंवा शंकर विश्वाचा संहार करतो तर शंकराचा संहार
कोण करतो ?असा प्रश्न येतो .या सगळयांचा काळ नियंता आहे असे म्हटले तर काळाचा नियंता कोण असा प्रश्न येतो .या प्रश्नांची उत्तरे देता येत नाहीत .म्हणजेच अज्ञानाचा अंध:कारच असतो .त्यासाठी आत्मानात्म विचार करावा लागतो .
ब्रह्मांड स्वभावेचि जाले। परंतु हे पिंडाकार कल्पिले । कल्पिले परी प्रत्यया आले । नाही कदा। । ९ -५ -२७ । ।
ब्रह्मांड आपोआप घडलेले आहे .त्याची रचना पिंडासारखी आहे अशी कल्पना केली पण ती खरी असल्याचा अनुभव कोणालाच येत नाही .खरेच ब्रह्मांड पिंडासारखे आहे का असा शोध घेऊ लागले तर अनेक संशय निर्माण
होतात .श्रोते विचारतात :
औटकोटी भुतावळी। औट कोटी तीर्थावळी। औटकोटी मंत्रावळी । पिंडी कोठे । । ९ -५ -३० । ।
तेतीस कोटी सुरवर । अडोतीस सहस्र ऋषीश्वर । नवकोटी कात्यायेणीचा विचार । पिंडी कोठे । । ९ -५ -३१। ।
च्यामुंडा छपन्न कोटी । कित्येक जीव कोट्यानुकोटी । चौ-यांशी लक्ष योनींची दाटी। पिंडी कोठे । । ९ -५ -३२ । ।
ब्रह्मांडी पदार्थ निर्माण जाले । पृथाकाकारे वेगळाले। तेहि तितुके निरोपिले । पाहिजेत पिंडी । । ९ -५ -३३ । ।
ब्रह्मांडात साडेतीन कोटी भुते,साडेतीन कोटी तीर्थ ,साडेतीन कोटी मंत्र आहेत .तेहेतीस कोटी देव ,८६ हजार
ऋषीश्वर ,नऊ कोटी कात्यायनी देवता आहेत .छपन्न कोटी चामुंडी आहेत ,कोट्यावधी जीव आहेत .चौ-यांशी लाख योनी आहेत .ते पिंडात कोठे आहेत ,पिंडात दाखवता येणे शक्य नाही .मग पिंडब्रह्मांड यांची रचना सारखी कशी होइल ?कारण ते तर्काने खरे ठरणारे नाही .यावर समर्थ सांगतात :
पांचभूते ते ब्रह्मांडी । आणि पांचचि वर्तती पिंडी । याची पाहावी रोकड़ी । प्रचित आता । । ९ -५ -३७ । ।
हे सर्व विश्व पंचमहाभूतांचे बनलेले आहे व पिंडही पांच महाभूतांचा बनलेला आहे याचा प्रत्यक्ष अनुभव
घेता येतो .ब्रह्मांडात असलेली पृथ्वी ,आप ,तेज ,वायू ,आकाश ही सर्व भूते पिंडातही आहेत म्हणूनच म्हणतात :
पिंडी ते ब्रह्मांडी !

Tuesday, April 27, 2010
प्रत्येकाचे भाग्य वेगळे का ?

पृथ्वी मध्ये लोक सकळ । येक संपन्न येक दुर्बळ। येक निर्मळ येक वोंगळ । काय निमित्त । । ९ -४ -१ । ।
पृथ्वीवर असंख्य माणसे आहेत .त्यातील काही श्रीमंत तर काही गरीब आहेत .काही स्वच्छ आहेत तर काही घाणेरडी आहेत ,असा फरक का ?
हे सकळ गुणापासी गती। सगुण भाग्यश्री भोगिती । अवगुणास दरिद्रप्राप्ती । यदर्थी संदेह नाही । । ९-४-४ । ।
समर्थ म्हणतात :गरीबी श्रीमंती ,स्वच्छ घाणेरडा हे सगळे भेद आपल्या गुणांचा परिणाम असतो .जे गुणवान असतात ते भाग्य व वैभव भोगतात .जे गुणहीन असतात ते दरिद्र भोगतात .
विद्या ,जाणतेपणा किंवा ज्ञान याला जीवनाच्या सर्व क्षेत्रात महत्त्व असते .समर्थ म्हणतात :
जाणता तो कार्य करी । नेणता कांहीच न करी । जाणता तो पोट भरी । नेणता भीक मागे । । ९ -४ -६ । ।
जाणता माणूस श्रम करतो ,उद्योगी असतो .नेणता श्रम करत नाही .आळशी असतो .जाणता आपले काम चोख करतो .त्यामुळे तो पोट भरतो .तर नेणता पोट भरू शकत नाही .तसेच विद्या नसेल तर तो करंटा असतो व विद्यावंत भाग्यवान असतो .
विद्या नाही बुध्दी नाही । विवेक नाही साक्षेप नाही ।
कुशळता नाही व्याप नाही । म्हणौनि प्राणी करंटा । । ९ -४ -१० । ।
ज्याच्या अंगी विद्या ,हुशारी ,विवेक प्रयत्न ,कौशल्य ,व्याप यापैकी एकही गुण नसेल तर तो करंटा असतो .हे गुण ज्याच्या अंगी असतात त्याच्या वैभवाला कमी पडत नाही .
जैसी विद्या तैसी हांव । जैसा व्याप तैसे वैभव । तोलासारिखा हावभाव । लोक करिती । । ९ -४ -१३ । ।
विद्या नसे वैभव नसे । तेथे निर्मळ कैचा असे । करंटपणे वोखटा दिसे । वोंगळ आणि विकारी । । ९ -४ -१४ । ।
माणसाजवळ जेव्हडी विद्या असते तेव्हडीच त्याच्या जवळ महत्वाकांक्षा असते .माणूस जेव्ह्डा व्याप करतो तेव्ह्डे त्याला वैभव मिळते.ज्या माणसा जवळ विद्या वैभव नाही तो मलिन पणे वावरतो .तो भाग्यहीन
असतो ,अस्वच्छ वाईट प्रवृत्तीचा असतो .
गुण नाही गौरव नाही । सामर्थ्य नाही महत्त्व नाही । कुशळता नाही । तर्क नाही । प्राणीमात्रासी । । ९ -४ -१६ । ।
ज्या माणसाच्या अंगी गुण नाही ,मोठेपणा नाही ,समाजात वजन नाही ,कौशल्य नाही बुध्दीमत्ता नाही त्याच्या जीवनात काही स्वारस्य नाही .
या कारणे उत्तम गुण । तेचि भाग्याचे लक्षण। लक्षणेविण अवलक्षण । सहजचि जाले। । ९ -४ -१७ । ।
म्हणून उत्तम गुण अंगी असणे हे भाग्याचे लक्षण आहे .
जनामध्ये जो जाणता । त्यास आहे मान्यता । कोणी येक विद्या असतां । महत्त्व पावे । ९ -४ -१८ । ।
प्रपंच अथवा परमार्थ । जाणता तोचि समर्थ । नेणता जाणिजे वेर्थ । नि :कारण । । ९ -४ -१९ । ।
प्रपंच व परमार्थात जाणत्याचा प्रभाव पडतो .नेणता आपले आयुष्य विनाकारण व्यर्थ घालवतो .कारण नेणतेपण किंवा अज्ञान हे सर्व वाईटाचे ,अपयशाचे कारण आहे .समर्थाँनी अनेक उदाहरणे देऊन हे स्पष्ट केले की नेणतेपणा अपयशाचा धनी असतो .अज्ञानाने साप कीं विंचू चावतो .अज्ञानाने जीवाचा घात होतो .आपण करत असलेले कार्य बिघडते .अज्ञानाने माणूस भ्रमात पडतो व काहीतरीच वागतो .अज्ञानाने माणूस फसतो .आपली वस्तू
विसरतो .त्याच्या अज्ञानानेच शत्रु त्याला जिंकतो ,त्याची हानी होते ,संहार होतो ,आपले हित कळत
नाही .त्यामुळे यातना भोगाव्या लागतात .माणूस अधोगतीला जातो .
माणूस जेव्हा माया ब्रह्म ,जीव शिव ,सार असार या सर्वांचे योग्य ज्ञान होते तेव्हा जन्म मरणाचा फेरा चुकतो .देव निर्गुण आहे असे जाणून देव व मी एकरूपच आहोत याचे जो ज्ञान करून घेतो तो मुक्त होतो .आजूबाजूला दिसणारे दृश्य जेव्हा मिथ्या असे साधक जाणतो तेव्हा तो दृश्याला ओलांडतो.त्याचा मीपणा नाहीसा असतो .मी पणाने वावरणारी अहंता नाहीशी होते .केवळ शुध्द आत्मस्वरूप शिल्लक राहते .तेच त्याचे आत्मज्ञान !
Subscribe to:
Posts (Atom)