Monday, April 19, 2010

देहातीत कैसे होणे?

मी देह आहे असे समजून आपण राहिलो तर आपल्याला सुख दुःख सोसावी लागतात ,देह्बुध्दी सोडून आपण देहातीत झालो तर आपल्याला परब्रह्माचा लाभ होतो असे समर्थानी सांगितले तेव्हा श्रोता विचारतो :
देहातीत कैसे होणेकैसे परब्रह्म पावणेऐश्वर्याची लक्षणेकवण सांगीजे। । - -२६ । ।
श्रोता विचारतो की देहातीत कसे व्हायचे ?परब्रह्माचा लाभ कसा करून घ्यायचा ते सांगावे ?ऐश्वर्याची लक्षणे कोणती ते सांगावे .श्रोत्याने प्रश्न विचारल्यावर समर्थ म्हणतात :
देहातीत वस्तू आहेते तूं परब्रह्म पाहेदेह्संग हा साहेतुज विदेहासी । । - -२८ । ।
परब्रह्म देहातीत वस्तू आहे हे तू ध्यानात ठेव .तू विदेही झालास ,देहातीत झालास म्हणजे तुला देह्बुध्दी
राहणार नाही ,देहाची आसक्ती राहणार नाही .देहाची आसक्ती नाहिशी झाली की देहातीत असणारी आत्मबुध्दी प्राप्त होते .विदेह अवस्था प्राप्त होते .पण त्यासाठी मी देह आहे ही भावना सोडावी लागते .ती सोडण्यासाठी सत्संगाची आवश्यकता असते .त्यातूनच तत्वांचा निरास होतो ,पंचीकरण होते आणि मी देह नाही ,खरा मी असणारा आत्मा म्हणजे मी आहे हे कळते. सोहं म्हणजे तो आत्मा मीच आहे ,मीच स्वानंदघन आत्मा आहे ,ज्याला जन्म नाही असा आत्मा तूच आहे असे संत वचन मनात ठसले की विदेही पणाचे ऐश्वर्य प्राप्त होते . 'तूच शाश्वत ब्रह्म आहेस 'या महा वाक्याचा खरा अर्थ कळतो .

No comments: