Friday, April 30, 2010

मूळमायेत जाणीव कोठून आली ?

म्हणाल तेथे कैंची जाणीव तरी एका याचा अभिप्राव पिंडी महाकारण देही सर्व - साक्षिणी अवस्था - -
तैसी मूळप्रकृती ब्रह्मांडीचे देह महाकारण साचे म्हणो तेथे जाणिवेचे अधिष्ठान आले - -
श्रोते विचारतात मूळमायेत जाणीव कोठून आली ?समर्थ सांगतात :पिंडाचे चार देह असतात .महाकारण हा चौथा देह आहे .हा देह ज्ञानाचा असतो .सर्वसाक्षिणी तुर्या अवस्था हे त्याचे क्षण आहे .ब्रह्मांडाच्या चार देहापैकी मूळप्रकृती हा महाकारण देह आहे .तो ज्ञानमय आहे .त्यामुळे शुध्द जाणीवेचे अधिष्ठान आहे .जाणिवेने ज्ञान
होते .म्हणजे जेथे जाणीव असते तेथे ज्ञान जन्माला येते . जेथे ज्ञान दिसते तेथे जाणीव असते .
परब्रह्म केवल असते .तेथे ज्ञानही नसते अज्ञानही नसते .पण मूळमायेत 'मी ब्रह्म आहे 'अशी ज्ञानरूप जाणीव
आहे ,तशीच अज्ञानरूप नेणीवही आहे .मूळमाया नसती तर परब्रह्माला स्वत :ची ज्ञानरूप जाणीव झाली
नसती .जाणीव आणि नेणीव किंवा ज्ञान आणि अज्ञान या जोड्यांना मूळमाया हेच अधिष्ठान आहे .मूळमाया वायूरूप आहे मूळमायेपासून गुणमाया निर्माण झाली .त्यापासून त्रिगुणांची निर्मिती झाली .पंचमहाभूते त्रिगुण यांच्या सहाय्याने दृश्य विश्व निर्माण झाले .हेतूपूर्वक होणारी हालचाल म्हणजे जाणीव .हे वायूचे लक्षण
आहे .जाणीव हे जिवंतपणाचे लक्षण आहे .म्हणून समर्थ म्हणतात :
जेथे मुळीच नाही चळनतेथे कैचे जाणीव लक्षणम्हणोनि वायोनेमस्त जाणावा । । - -१३ । ।
जेथे कोठे हालचाल होते तेथे जाणीव असते .वायू हालचाल करतो म्हणून वायूचा जाणीव ह़ा गुण आहे .मूळमाया जाणीव रूप आहे म्हणून ती वायूरूप आहे
म्हणो जाणीवनेणीव मिश्रित अवघे चालिले पंचभूत म्हणोनिया भूतात जाणीव असे - -२०
जाणीव आणि नेणीव यांच्या मिश्रणाने पंचमहाभूतांचा सगळा खटाटोप चालतो .त्यामुळे पंचभूतात जाणीव असतेच असते .पण काही ठिकाणी ती दिसते तर काही ठिकाणी ती दिसत नाही . जाणीव स्थूल किंवा सूक्ष्म दोंहीनाही
असते .लाकडात अग्नी असून दिसत नाही .वायू वाहणे बंद झाले की असून भासत नाही .जाणीव जेव्हा पिंडाला व्यापते तेव्हा त्याला जीव म्हणतात .जाणीव जेव्हा विश्वाला किंवा ब्रह्मांडाला व्यापते तेव्हा त्याला शिव
म्हणतात .दृश्य वस्तूची -पिंडाची ,ब्रहमांडाची ,मर्यादा नसणारी जी शुध्द निर्भेळ ,अनंत जाणीव तेच परमात्मस्वरूप !

No comments: