Monday, November 29, 2010

आत्मसाक्षात्कारी कसा असतो ?

दशक १४ स .७ मध्ये समर्थ आत्मसाक्षात्कारी कसा असतो याचे वर्णन करतात ।
पुरश्चरणी कायाक्लेशी । दृढवतीपरम सायासी । जगदीशा वेगळे जयासी । थोर नाही । । १४-७-७
काया वाचा जीवे प्राणे । कष्टे भगवंता कारणे । मने घेतले धरणे । भजन मार्गी । । १४-७-८
ऐसा भगवंताचा भक्त । विशेष अंतरी विभक्त । संसार सांडून झाला मुक्त । देवाकारणे । । १४-७-९
अंतरा पासून वैराग्य । तेंची जाणावे महदभाग्य । लोलंगते एव्हडे अभाग्य । आणिक नाही । । १४-७-१०
आत्मसाक्षात्कारी पुरश्चरणे [मंत्रामध्ये जेव्हडी अक्षरे असतील तेव्ह्ड़े लक्ष जप करणे ] करतो .शरीराला कष्ट देतो ,दृढपणे आपले व्रत सांभाळतो। .श्रम करतो .त्याला फक्त भगवंतच श्रेष्ठ वाटतो । शरीराने ,वाणीने , जीवाने ,प्राणाने तो भगवंतासाठी कष्ट करतो .त्याचे मन सतत भगवंताचे भजन करण्यात रममाण होते .असा भगवंताचा भक्त अंतरातून विरक्त असतो .भगवंतासाठी संसार सोडतो .त्याला अगदी अंतरा पासून वैराग्य आलेले असते .आसक्ती लोभ नसतो म्हणून समर्थ अशा आत्मसाक्षात्कारी माणसाला महाभाग्यवान म्हणतात ।
ऐसा जो का योगेश्वर । अंतरी प्रत्ययाचा विचार । उकलू जाणे अंतर । प्राणीमात्राचे । । १४-७-१२
ऐसी वृत्ती उदासीन । त्याहिवरी विशेष आत्मज्ञान । दर्शन मात्रे समाधान । पावती लोक । । १४-७-१३
बहुतांसकरी उपाये । तो जनाच्या वाटया न ये । अखंड जयाचे हृदये । भगवद्रूप । । १४-७-१४
जनास दिसे हा दुश्चित्त । परी तो आहे सावचित्त । अखंड जयाचे चित । परमेश्वरी । । १४-७-१५
अशा आत्मसाक्षात्कारी जो असतो त्याला समर्थ योगेश्वर म्हणतात .तो अन्तर्यामी वृत्तीने उदासीन असतो ,विवेकी असतो .विवेक त्याला स्वानुभवाने प्राप्त झालेला असतो .तो अनासक्त ,वैराग्यशील असतो .या सर्व गुणांमुळे त्याला आत्मसाक्षात्कार होतो .

No comments: