Monday, November 22, 2010

गृहस्थाश्रम उत्तम का ?

गृहस्थाश्रम उत्तम का ?
नाना वेश नाना आश्रम । सर्वांचे मूळ गृहस्थाश्रम । जेथे पावती विश्राम । त्रैलोक्य वासी । । १४-७-१
देवहृषी मुनी योगी । नाना तापसी वीतरागी । पितृआदि करून विभागी । अतीत अभ्यागत । । १४-७ -२
गृहस्थाश्रमी निर्माण जाले । आपला आश्रम टाकून गेले । परन्तु गृहस्थागृही हिंडू लागले । कीर्तीरूपे । । १४-७-३
याकारणे गृहस्थाश्रम । सकळामध्ये उत्तमोत्तम । परंतु पाहिजे स्वधर्म । आणि भूतदया । । १४-७-४
ब्रह्मचर्याश्रम ,गृहस्थाश्रम ,वानप्रस्थाश्रम ,संन्यासाश्रम असे वेगवेगळे आश्रम आहेत .पण या सर्वांचे मूळ गृहस्थाश्रम आहे कारण देव ऋषी मुनी योगी तपस्वी या सर्वांना गृहस्थाश्रमात च जन्म घ्यावा लागतो .ते सर्व जरी गृहस्थाश्रम सोडून जातात तरी कीर्ती मिळवल्यावर गृहस्थाश्रमातून त्यांची सर्व व्यवस्था होते ।
त्यामुळे या सर्व आश्रमात गृहस्थाश्रम उत्तम आहे .परंतु त्यात स्वधर्माचे आचरण व भूतदया असावी .अध्ययन ,अध्यापन ,दान ,प्रतिग्रह ही शट कर्मेही हवीत .धर्मशास्त्रा प्रमाणे सर्व क्रियांचे आचरण ही घडायला हवे .तेथेच भक्तीही आढळते .नियमीत व शास्त्रोक्त पद्धतीने आचरण ज्या गृहस्थाश्रमात होतो तो गृहस्थाश्रम धन्य असतो ,उत्तम असतो .

No comments: