Monday, February 23, 2009

आत्मनिवेदन भक्ती


आत्मनिवेदन भक्ती
ऐक निवेदनाचे लक्षण देवासि वहावे आपण करावे तत्वविवरण म्हणिजे कळे - -
नववी भक्ती आत्मनिवेदन आहे .नि + विद = समर्पण करणे,ताब्यात किंवा हातात देणे कोणाकडे सोपवणे.आत्मनिवेदन म्हणजे स्वत :ला भगवंताला समर्पण करणे ,देवासि वहावे आपण असे समर्थ म्हणतात त्यात तीन गोष्टी येतात . आपल्याला आपण वाहून घेतो म्हणजे अत्यंत प्रेमाने आदराने देवाला शरणागत होतो . एखादी वस्तू आपण दुस-याला देतो तेव्हा तिच्यावरील ममत्व ,माझेपणाचा हक्क ,आसक्ती ,प्रीती सोडतो . त्या वस्तूला देऊन टाकल्यावर त्या वस्तूला आपण विसरतो. तिचे पुढे काय झाले हां विचार करत नाही .तसेच आपण देवाला वाहिल्यावर आपल्या देहावर ,आपल्या वस्तूंवर ,आपल्या घरादारावर कोणतेही ममत्व ठेवता ,सर्वस्वी भगवंतावर सोडून देणे
तत्वविवरण म्हणजे मी कोण ,कशाचा बनलो आहे ,हा शोध घेणे .माणूस म्हणजे देह +मन +आत्मा .आत्मा हा खरा मी असतो .आपण देह आणि मन यांच्या संयोगाला मी म्हणतो .देह मन दोन्ही पंचभूतांचे [पृथ्वी ,आप,
तेज,वायू आकाश ]यापासून बनलेले असते .मग ही पं महाभूते म्हणजे मी आहे का याचा शोध घेतला तर असे
लक्षात येते की या तत्वात जाणीव नाही .म्हणून ही पंचमहाभूते म्हणजे मी नाही. म्हणजे देह मन म्हणजे मी नाही .सारी तत्व म्हणजे मी नही असा निश्चय होतो तेव्हा तत्त्व निरसनही होत
स्थूल देह सूक्ष्म देह यांचा निरास झाल्यावर कारण महाकारण देहाचा निरास व्हायला हवा .कारण देह म्हणजे अज्ञान अवस्था ,तर महाकारण देह म्हणजे ज्ञानाची अवस्था .ज्ञान अज्ञान या दोन्ही अवस्था असल्याने ते देह म्हणजे मी नाही. असा तत्त्व झाडा होतो तेव्हा आत्मनिवेदन होते .म्हणजे आत्मा म्हणजे मी हे प्रत्ययाला येते. देहबुध्दीच्या आश्रयाने जो मी वावरत असतो तो तत्त्व विचारापुढे टिकत नाही.आत्मनिवेदनासाठी विचार हे एकमेव साधन आहे .
आत्मनिवेदन करण्यासाठी या समासात समर्थ आपल्याला विचार करायला शिकवतात .
येक मुख्य परमेश्वरूदुसरी प्रकृती जगदाकारूतीसरा आपण कैंचा चोरूआणिला मध्ये । । - -११ । ।
मुख्य मूलतत्वे दोनच परमेश्वर विश्वाचा आकार घेउन दिसणारी प्रकृती .मग या दोघात मी हा तिसरा चोर कोठून येतो ?तो मी मुळात नसतो पण खोता देहाहंकार चिकटलेला असतो .पिंड ब्रम्हां दोन्ही पंभूतांचा विस्तार आहे त्यामुळे दोन्ही नाशिवंत आहेत .त्यामुळे विश्वाच्या आरंभी जसा आत्मा होता तसाच विश्वाच्या शेवटी रहातो, मग हा मी कोठून आला असे समर्थ विचारतात .मी कोणी नाही असे मानणे म्हणजे आत्मनिवेदन .
आत्मा म्हणिजे तो अद्वैत जेथे नाही द्वैताद्वैत तेथे मीपणाचा हेत उरेल कैसा
आत्मा एकच एक आहे.तेथे दुसरा कोणी नाही ,त्यात द्वैत नाही ,त्यामुळे मी म्हणजे दुसरा कोणी नाही ,वेगळा असू शकत नाही .हा मी पणा काढून टाकणे म्हणजे आत्मनिवेदन !
आत्मनिवेदन तीन प्रकारचे .जड़ चंचळ निश्चळ
मी ,माझे सगळे ,माझ्या मालकीच्या सर्व वस्तू ,माझे मन ,माझी काया,माझी वाचा ,माझा प्रपंच हे सर्व देवाच्या मालकी चे आहे ही भावना ठेऊन जगणे याला जड़ आत्मनिवेदन म्हणतात .
प्रत्येक प्राणीमात्रात विश्वात्माचा अंश आहे .प्रत्येक सजीवात त्याचा अंतरात्मा त्याचा कर्ता असतो .देहाहंकार मी कर्ता नाही अशी धारणा निर्माण करणे म्हणजे चंच आत्मनिवेदन
चंच नाशवंत आहे ,पण परमात्मा निश्चळ आहे .त्या निश्चळ परमात्म्याशी तदाकार होणे म्हणजे निश्चळ आत्मनिवेदन

No comments: