सद्गुरु कसा असावा ?
समर्थ गुरुलक्षण सांगताना सद्गुरु कसे ओळखावे ते सांगतात .चौदा विद्या ,चौसष्ट कला शिकवणारे गुरु सद्गुरु नाहीत असे सांगतात ,कारण ह्या सर्व कला पोटार्थी आहेत .त्या कोणत्याही कलेतून आत्मज्ञान प्राप्त होणार नाही ,त्यामुळे त्या कला शिकवणारे गुरु सद्गुरु नाहीत .आपले आई वडील सुद्धा आपले गुरु असतात ,पण सद्गुरु नसतात ,कारण ते आत्मज्ञान देत नाहीत .
मग सद्गुरु कोणाला म्हणायच ?त्यांची लक्षणे कोणती ?
बिघडले देव आणि भक्त । जीवशिवपणे द्वैत । तया देव भक्ता येकांत। करी तो सद्गुरु । । ५ -२ -१० । ।
प्रत्येक जीव स्वत :ला देह समजतो ,त्यामुळे देव आणि जीव ,देव आणि भक्त यात द्वैत निर्माण होते .ते द्वैत नाहीसे करण्याचे काम सद्गुरु करतात .देव आणि भक्त यांची गाठ घालून देतो .
प्राणी मायाजाळी पाडिले। संसार दु:खे दु:खवले । ऐसे जेणे मुक्त केले । तो सद्गुरु जाणावा । । ५ -२ -१२ ।
जीव मायाजाळी पडतो ,याचा अर्थ प्राणी स्वत :ला देह समजतो ,मी ,माझे ,माझी बायको ,माझी मुले ,माझा व्यवसाय सर्व माझ समजतो .त्यामुळे दु :खी होतो .मी कर्ता समजतो .यश मिळाल तर आनंदी होतो ,अपयश मिळाल तर दु :खी होतो . सद्गुरु आत्मज्ञान देवून देह्बुध्दी नाहिशी करतो ,आत्मबुध्दी निर्माण करतो .
सुखदु :खातून प्राण्याची सुटका करतो .
वासनानदी माहांपुरी । प्राणी बुडता ग्लांती करी । तेथे उडी घालून तारी । तो सद्गुरु जाणावा । ।५-२-१३ । वासना म्हणजे एखादी वस्तू हवीच असे वाटणे .एक वस्तू मिळाली की दूसरी वस्तू हवी वाटते.त्यामुळे वासना नदी म्हटले आहे .हव नको कधी संपत नाही म्हणून वासनानदी चा महापूर म्हटले आहे .त्यामुळे प्राणी वासनेच्या महापुरात बुडून जातो ,तेथे सद्गुरु जीवाला हात देऊन वाचवतो ।
गर्भवास अति सांकडी । इच्छा बंधनाची बेडी। ज्ञान देऊन सीघ्रसोडी । तो सद्गुरु स्वामी । । ५ -२ -१४ । ।
इच्छा अनेक असल्यामुळे माणूस बंधनात पडतो .त्यामुळे बध्द होतो .जन्म मृत्यु च्या फे-यात
अडकतो . सद्गुरु आत्मज्ञान देऊन बंधनाची बेडी तोडतो .प्राण्याची पुन्हा पुन्हा होणा-या गर्भावासातून सुटका करतो ,तो सद्गुरु असतो .
बाणे तिहींची खूण। तोचि गुरु सुलक्षण । तेथेचि रिघावे सुलक्षण । अत्यादरे मुमुक्षे। । ५ -२ -३० । ।
शास्त्रप्राचिती ,गुरुप्राचिती आणि आत्मप्रचिति ,यांचा मनोहर संगम गुरूच्या ठिकाणी असतो .श्रुती मध्ये व संताच्या ग्रंथामध्ये वर्णिलेला स्वरूपानुभाव ,सद्गुरुचा स्वानुभव ,आणि स्वत :चा अनुभव [गुरुचा ] अनुभव एकच असतो.त्याच गुरुलाच शरण जावे असे समर्थ म्हणतात .
मुख्य सद्गुरूचे लक्षण । आधी पाहिजे विमळ ज्ञान । निश्चयाचे समाधान । स्वरूपस्थिती । । ५ -२ -४५ । सद्गुरूचे मुख्य लक्षण आहे शुध्द ज्ञान .शुध्द ज्ञानामुळे त्याला मिळालेले समाधान कधीही भंग पावत नाही .आत्मज्ञानाने त्याचे संशय नाहीसे होतात .आत्मस्वरूपाशी सतत अनुसंधान राखले जाते .तो समाधानरूपच असतो .तो स्वस्वरूपापासून कधीही ढळत नाही.
म्हणोनि नवविधा भजन । जेथे प्रतिष्ठ्ले साधन । हे सद्गुरूचे लक्षण । श्रोती वोळखावे। । ५ -२ -४९ । ।
जो गुरु नवविधा भक्ती साधकांना करायला शिकवतो ,जो साधन मार्गास प्रतिष्ठा देतो तो सद्गुरु असतो.सद्गुरु शुध्द ज्ञानाने युक्त असल्याने त्याच्या जवळ साधकांना विश्रांती मिळते .ज्ञान वैराग्य ,भजन ,स्वधर्मकर्म , साधन ,कथा निरूपण ,श्रवण ,मनन ,नीति ,न्याय ,मर्यादा या सर्व गोष्टींचे पालन केले जाते तो सद्गुरु असतो .
जे जे काही उत्तम गुण । ते ते सद्गुरूचे लक्षण । तथापि सांगो ओळखण । होए जेणे। । ५ -२ -६५ । ।
सद्गुरु मध्ये सर्व प्रकाराचे उत्तम गुण असतात .आत्मज्ञाना मुळे जे सहज गुण येतात ते सद्गुरुत
असतातच ,याशिवाय अज्ञानी जीवांबद्दल अतिशय दया त्यांच्या अंगी असते .म्हणून समर्थ म्हणतात ,
नाना सद्विद्येचे गुण । याहिवरी कृपाळूपण । हे सद्गुरूचे लक्षण । जाणिजे श्रोती । । ५ -२ -७३ । ।

2 comments:
छान लिहिले आहेत. वर्तमानपत्रात वाचले होते आपल्या ब्लॉग विषयी
Farach chaan aahe. Manusuhyala shaanti denare dnyan aahe
Post a Comment