Wednesday, May 12, 2010

आधी स्थूळ की सूक्ष्म?

आधी स्थूळ की सूक्ष्म असा प्रश्न निर्माण होतो .प्रत्येक वस्तू चे बाहेरून दिसणारे अंग म्हणजे स्थूळ आणि वस्तूचे अंतरंग म्हणजे सूक्ष्म अंग .आपला बाहेरून दिसणारा देह म्हणजे स्थूळ देह आणि आपले
अंत :करण ,मन ,बुध्दी ,चित्त अहंकार म्हणजे आपला सूक्ष्म देह !म्हणून श्रोते विचारतात :
आधी स्थूळ आहे येक । तरी मग अंत :करणपंचक जाणतेपणाचाविवेक स्थूळाकरिता - - । ।
तैसेची ब्रह्मांडावीण काहीमूळमायेसी जाणीव नाहीस्थूळाच्या आधारे सर्व हीकार्य चाले । । - - । ।
ते स्थूळचि स्ता निर्माणकोठे राहील अंत:करणऐसा श्रोती केला प्रश्नयाचे उत्तर ऐका। । - - । ।
आधी स्थू पिंड असतो .मग त्यात अंत :करण ,मन ,बुध्दी ,चित,अहंकार असे अंत :करण पंचक असते .स्थूळ निर्माण झालेच नसते तर जाणीव अंत :करण कोठे राहिले असते असा प्रश्न श्रोत्यांनी विचारला .त्याला उत्तर देताना समर्थांनी व्यवहारातील उदाहरणे दिली आहेत .रेशमाचा किडा स्वत :भोवती तंतूंचे कोष तयार करतो .दुसरे किडे काट्यांचे कवच करून घर तयार करतात .मग आधी घरे का आधी किडे असा प्रश्न येतो .किडा आधी जन्माला येतो आणि मग घर तयार करतो असा आपल्याला अनुभव येतो .म्हणजेच आधी सूक्ष्म आणि मग स्थूळ निर्माण होते .आधी स्थूळ की सूक्ष्म या प्रश्नावरून अनेक प्रश्न श्रोत्यांनी विचारले आहेत .
जीवाला जन्माला कोण घालतो ?मेल्यानंतर कोण जन्माला येतो ?याचा प्रत्यक्ष अनुभव कसा घेता येतो ?
याचे उत्तर समर्थ देतात :
ब्रह्म जन्मास घालतोविष्णू प्रतिपाळ करितोरूद्र अवघे संहारितोऐसे बोलती । । - -१० । ।
सामान्य लोक म्हणतात की ब्रह्मदेव जन्माला घालतो ,विष्णू सांभाळ करतो ,रूद्र संहार करतो .पण याचा अनुभव येत नाही .श्रोते पुढे विचारतात ब्रह्मदेवाला कोण जन्माला घालतो ?विष्णूला कोण सांभाळतो ?महाप्रळयाच्या वेळी रूद्राचा संहार कोण करतो ?या प्रश्नांची उत्तरे देता येत नाहीत .म्हणूनच दृश्य विश्व खरे नाही .तो मायेचा पसारा
आहे . मग या विश्वाचा कर्ता कोण असा विचार केला तर निर्गुण देव विश्वाचा कर्ता होणार नाही कारण तो विकार रहित आहे .त्यामुळे तो विकारी विश्व निर्माण करणार नाही ..माया विश्व निर्माण करते म्हटले तर मायाच विश्वरूपाने विस्तार पावली आहे .ती शेवटपर्यंत टिकत नाही .असे म्हटल्यावर श्रोते विचारतात :
आता जन्मतो तो कोणकैसी त्याची वोळखणआणि संचिताचे लक्षण । तेही निरोपावे । । - -१५ । । जन्माला कोण येतो ?त्याची ओळखण कशी करावी ?संचिताचे लक्षण मला सांगा असे श्रोता विचारतो .पाप पुण्याचे स्वरुप काय ?हे सर्व प्रश्न विचारणारा कोण आहे ?असे अनेक प्रश्न श्रोते विचारतात .त्यावर समर्थ उत्तर देतात :
हे काहीच ये अनुमानाम्हणती जन्म घेती वासनापरी ते पाहता दिसेनाना धारिता ये । । - -१७ । ।
जन्माला येतो तो कोण या बद्दल काहीच सांगता येत नाही .काही लोक म्हणतात की वासना जन्म घेते .पण वासना पाहता येत नाही ,धरता येत नाही .वासना ,कामना ,कल्पना या अंत:करणाच्या वृत्ती आहेत .त्यामुळे समर्थ म्हणतात की कोण कोणाला जन्माला घालतो हे प्रत्यक्ष दिसत नाही .म्हणून जन्माला आलेल्या प्राण्याला जन्म नाही .मग प्रश्न असा येतो की मेल्यानंतर कोणालाच जन्म नाही तर संतसंगतीने काय होते ?ज्या प्रमाणे वाळलेल्या लाकडाला हिरवा कोंब फुट नाही .फळ पडले की पुन्हा झाडाला लागत नाही त्याप्रमाणे शरीर पडले की पुन्हा जन्माला येत नाही .म्हणजे ज्ञानी अज्ञानी सारखेच झाले असा आक्षेप श्रोते घेतात .तेव्हा समर्थ म्हणतात :
वक्ता म्हणे हो ऐकाअवघे पाषांड करू नकाअनुमान असेल तरी विवेकाअवलोकावे । । - -३२ । ।
प्रेत्नविण कार्य जालेजेविल्याविण पोट भरलेज्ञानेविण मुक्त जालेहे तो घडेना । । - -३३ । ।
प्रयात्नाशिवाय कार्य सिध्दीस गेले ,जेवाल्याशिवाय पोट भरले ,आत्मज्ञानावाचून मुक्त झाला असे घडत नाही .एक जेवला की सर्वांचे पोट भरत नाही .ज्याला पोहता येते तो तरतो .ज्याला येत नाही तो बुडतो .त्याचप्रमाणे आत्मज्ञानी असतात ते संसारसागर तरून जातात .ज्याचे बंधन तुटले तोच मुक्त ! जो बंधनापासून मुक्त होतो तोच म्हणतो आता कसले बंधन नाही .समर्थ म्हणतात :
ज्ञाने चुके जन्ममरणसगट बोलणे अप्रमाणवेदशास्त्र आणि पुराणमग कासयासी । । - -४० । ।
आत्मज्ञानाने जन्म मरण चुकते पण सर्व लोक आत्मज्ञानी नसतात .मग बध्दांना जन्ममरणाचा फेरा
असतोच .म्हणून वेद शास्त्र पुराणे यांचा सिध्दांत आहे की ज्याला आत्मज्ञान होते तोच मुक्त होतो ,इतर जन्म मरणाच्या फेर्यात अडकतात.

No comments: