Thursday, May 13, 2010

जन्म कैसा बध्दाते?

ज्ञाता आत्मज्ञान मिळाल्याने सुटतो .बध्दाला जन्म येतो असे समर्थांनी सांगितल्यावर श्रोता विचारतो :
ज्ञाता सुटला ज्ञानमतेपरंतु जन्म कैसा बध्दातेबध्दाचे काय जन्मतेअंतकाळी । । - - । ।
ज्ञानी आत्मज्ञानाने जन्माच्या तावडीतून सुटतो .पण अज्ञानी ,बध्द माणसाला जन्म कसा येतो ? बध्द माणूस गेल्यावर त्याचे काय उरते ?
बध्द प्राणी मरतो तेव्हा त्याचे काही म्हणजे जाणीव सुध्दा उरत नाही .मग तो पुन्हा जन्माला कसा येतो ?
या शंकेला समर्थ उत्तर देतात :
पंचप्राण स्थळे सोडितीप्राणरूप वासना वृत्तीवासना मिश्रित प्राण जातीदेह सोडूनिया । । - - । ।
वायोसरिसी वासना गेलीते वायोरूपेचि राहिलीपुन्हा जन्म घेउनि आलीहेतुपरत्वे। । - - । ।
पांचही प्राण शरीरातील आपली स्थाने सोडतात .त्यावेळी वासना त्यांच्या मागोमाग जाते .कारण वासना प्राणरूप आहे .सूक्ष्म देहाचे प्राण ,मन ,बुध्दी ,अहंकार हे घटक असतात .म्हणून माणसाचा सूक्ष्म देह वासनारूप
असतो .वासना वायूरूप असते .ती असते पण दिसत नाही .स्थूल देह सुटला तरी वासना शिल्लक असते .ती पुन्हा जन्म घ्यायला लावते .मारताना जसा हेतू असेल त्याप्रमाणे ती पुन्हा जन्म घेउन येते .
फूंकल्यासरिसा वायो गेलातेथे वायोसूत निर्माण जालाम्हणो वायोरूप वासनेलाजन्म आहे। । - -११ । ।
मनाच्या वृती नानात्यात जन्म घेते वासनावासना पाहता दिसेनापरंतु आहे । । - -१२ । ।
मुळात वायू स्तब्ध्द असतो .तो फुंकला की त्यात हालचाल होते .हालचालीने प्राण निर्माण होतो .प्राण वासनारूप असतो .वासना जन्म घ्यायला लावते .वासना अत्यंत सूक्ष्म असल्याने आपल्याला दिसत नाही .आपल्या मनातल्या अनेक वृत्तींचे मूळ वासनेत असते .वासनेतून वृत्ती आणि वृत्तीतून वासना असे चक्र चालू राहते .आणि बध्दाला जन्म येतो .

No comments: