Thursday, May 20, 2010

ब्रह्म आणि ब्रह्मांडाचा परस्पर संबंध काय ?

श्रोता म्हणतो :ब्रह्माचे निवारण करता येत नाही .बाजूला सारता येत नाही ,मोड़ता येत नाही ,ब्रह्माला भोक पाड़ता येत नाही .ब्रह्म मागे कलता येत नाही .ब्रह्म अखंड आहे .त्याचे तुकडे करता येत नाहीत .असे असताना ब्रह्मात ब्रह्मांड कसे शिरले ?पर्वत ,पाषाण ,शिळा ,शिखरे नाना प्रकारची स्थाने ,ही रचना कशी निर्माण झाली ?
भूगोळ आहे ब्रह्मामध्ये ब्रह्म आहे भूगोळामध्ये पाहता येक येकामध्ये प्रत्यक्ष दिसे --
ब्रह्मी भूगोळे पैस केला आणि भूगोळही ब्रह्मे भेदिला विचार पाहता प्रत्यय आला प्रत्यक्ष आता --
ब्रह्मी ब्रह्मांड भेदिले हे पाहता नीटची आले परी ब्रह्मांस ब्रह्मांड स्वभावे हे विपरीत दिसे --
भेदिले नाही म्हणावेतरी ब्रह्मी ब्रह्मांड स्वभावेहे सकळांस अनुभवेदिसत आहे । । -- । ।
तरी हे आतां कैसे जालेविचारून पाहिजे बोलिलेऐसे श्रोते क्षेपिलेक्षेपवचन । । -- । ।
पृथ्वी ब्रह्मात आहे ,ब्रह्म पृथ्वी मध्ये आहे .पृथ्वी ब्रह्म एकमेकात आहे असे प्रत्यक्ष आढळते .ब्रह्मात प्रुथ्वीने जागा व्यापली आहे आणि पृथ्वीने अंतर्यामी ब्रह्म आहे .ब्रह्मांड स्थूल ,जड़ आहे .त्याने ब्रह्माचा भेद करून जागा व्यापावी हे विपरीत वाटते असे श्रोते म्हणतात .ब्रह्मांडाने ब्रह्माचा भेद केला नाही असे म्हणावे तर ब्रह्मात ते आहे .मग हे घडले कसे असा श्रोत्यांचा प्रश्न आहे .
समर्थ उत्तर देतात :आपला दृष्टीकोन अतिशय संकुचित असतो त्यामुळे वस्तू जशी आहे तशी आपल्याला दिसत नाही .जर आकाशात दिवा लावला तर दिव्याने आकाश बाजूला साराले जात नाही ..पाणी अग्नी वायू यापैकी एकही भूत आकाशाला बाजूला सारू शकत नाही .आकाश मात्र सर्वत्र स्थिरपणे दाटपणे सगळीकडे भरलेले
असते .ते स्थिर आहे .त्यात हालचाल होत नाही म्हणून त्याला बाजूला सारता येत नाही .पृथ्वी कठीण
आहे ,आकाश सूक्ष्म आहे .मृदु ,बारीक आहे .त्यामुळे ते पृथ्वीच्या अणू ,परमाणूमध्ये आहे .आकाशाशिवाय एकही दुसरे भूत आकाशाचा भेद करू शकत नाही .
मग प्रश्न असा येतो की आकाश ब्रह्म एकच आहेत का ?पण आकाश आणि ब्रह्म यातील भेद समर्थांनी सांगितला आहे :
आकाशाला आपण वेगळेपणाने पाहू शकतो ,म्हणून ते महाभूत !सर्वव्यापीपणा ,सूक्ष्मपणा ,निश्चळपणा घनदाट पणा हे सर्व ब्रह्माचे गुण आकाशात आहेत पण आपण आकाशाला वेगळे पणाने पाहू शकतो म्हणून ते दृश्यात
मोडते . वेगळे पणाने पाहण्याने द्वैत निर्माण होते .त्याला वेगळेपणाने पाहणारा मी देहबुध्दी चा आकुंचितपणा सोडत नाही .आकाशा कडे पाहताना निर्गुण ब्रह्माची कल्पना येते .पण ब्रह्म निर्विकल्प ,अतींद्रिय आहे .
परब्रह्माच्या स्वरूपाचे अज्ञान असल्याने भ्रम होतो .भ्रम देह्बुध्दीचा आकुंचित पणा असतो .भ्रमाने जे दिसते ते खरे काहीच नसते असा अनुभव येतो .जे नाहीच नाही ,ज्याला अस्तित्व नाही ,असे म्हटले तर चुकीचे होणार
नाही .कारण जेव्हा आपण आपली वृती विशाल करतो ,तर वृतीची मर्यादा संपते ,आणि मग परब्रह्मात विलीन
होते ,मुळचे निर्गुण आत्मस्वरूप प्रत्ययास येते ,तेव्हा ब्रह्मांड जे झालेच नाही ते ब्रह्माला भेदण्याचा प्रश्न येत
नाही .

No comments: