Thursday, May 27, 2010

परमार्थाची खरी खूण कोणती ?

परमार्थ अंतरंगाचा असतो .बहिरंगाचा नसतो .बाहेरून कितीही साधनेचा दंभ केला तरी अंतरंगात परमार्थाची आवड असेलच असे नाही .तेथे अंतरनिष्ठा असावी लागते .परमार्थात जे ध्येय आपण ठेवतो तेथे आपले अंतरंग तादात्म्य पावते .नाहीतर परमार्थ लटका पडतो .
अंतर्निष्ठा कशी निर्माण करावी याचे उत्तर देताना समर्थ म्हणतात :
लौकिक बरा संपादिला परी अंतरी सावध नाही जाला मुख्य देवास चुकला तो आत्मघातकी -१०-
एखाद्याने व्यवहारात उत्तम लौकिक मिळवला पण अंतर्यामी स्वरूपाकडे क्ष दिले नाही तर मुख्य देव प्राप्त होत
त्याला समर्थ म्हणतात .देवाची केली तर साधक देवलोकाला प्राप्त होतो .निर्गुणाची उपासना केली तर तो निर्गुण बनतो .तेव्हा श्रोते प्रश्न विचारतात :
निर्गुणाचे कैसे भजन निर्गुणी असावे अनन्य अनन्य होता होइजे धन्य निश्चयेसी -१०-१२
निर्गुणाचे भजन किंवा उपासना कशी करावी याचे उत्तर देताना समर्थ म्हणतात की निर्गुणाशी अनन्य
व्हावे .मीपणा बाजूला सारावा .व मी कोण याचा विचार करावा .समर्थ सांगतात :
देव पाहता निराकार आपला तो माईक विचार सोहं आत्मा हा निर्धार बाणों गेला -१०-१४
देव निर्गुण निराकार आहे .मीपणा खरा नाही .अशा विचाराने मी तोच आहे ,मी आत्मा आहे हा निर्धार अंगी बाणतो.मी आत्मा आहे असा साक्षात्कार होतो .तो सिध्द बनतो .त्याला साधनाचे बंधन नसते .तो आत्मस्वरूप झाल्यावर त्याला साधनाचे बंधन नसते .त्याची साधकावस्था संपते .मग तो स्वस्वरूपाचा मायेचा शोध
घेतो .आपली अहंता ,माया खोटी आणि परमात्मा खरा असा त्याला प्रत्यक्ष अनुभव येतो .
साधनाने आपल्याला काय साधायाचे आहे हे ध्येय निश्चित ठरवावे लागते .देहाचा विचार केला तर देह पंचमहाभूतांचा असतो व जीवाचा विचार केला तर जीव असतो ब्रह्माचा अंश !विचाराने तत्वांचा निरास करता येतो व फक्त निर्भेळ आत्मस्वरूप अनुभवास येते .
ज्ञाता वेगळेपणाने ज्ञेयाचे ज्ञान करून घेतो तोपर्यंत ते ज्ञान वृत्तीरूप असते ,कारण त्या ज्ञेयाची प्रतिमा ज्ञात्याच्या मनात तयार होते .त्या प्रतिमेत कल्पना असते ,पूर्वानुभव असतो ,भावनेचा ओलावा असतो ,बुध्दीचा अंश
असतो .ही स्थल कालाच्या मर्यादेत असते .अशा अनेक प्रतिमा तयार होतात .त्यांना वृत्ती म्हणतात .आपल्या मी मध्ये अशा अनेक वृत्तींचा समूह असतो .
मी लयाला गेला की वृत्ती लयाला जातात .
देह्बुध्दीचे ज्ञान वृत्तीरूपात असते .त्या वृत्ती कल्पनेने भरलेल्या असतात .कल्पनेने जे दृश्य निर्माण होते ते खोटे असते .ते खोटे ठरले ,दृश्य लय पावले की शुध्द निर्गुण स्वस्वरूप उरते .विवेकाने ते स्वस्वरूप म्हणजे आपण
स्वत : आहोत असा आत्मसाक्षात्कार होतो .हीच परमार्थाची खूण आहे .

No comments: