तत्व निरुपण
अंत:करण पंचक
अंत:करण | मन | बुद्धी | चित्त | अहंकार |
निर्विकल्प स्फुरण | संकल्प विकल्प | निश्चयात्मक बुद्धी | कार्याचे चिंतन | कार्य करण्याचा |
|
|
|
| अभिमान |
प्राण पंचक
पाच प्राण हे वायूचे विभाग आहेत .
व्यान | समान | उदान | अपान | प्राण |
सर्वांगाला व्यापून | नाभी च्या ठिकाणी | कंठाशी | गुद्स्थानी | तोंडात व नाकात |
|
|
|
|
|
ज्ञानेंद्रिय पंचक
कान | त्वचा | डोळे | जीभ | नाक |
कर्मेंद्रिय पंचक
वाणी | हात | पाय | जननेंद्रिय | गुद |
पाच विषय
शब्द | स्पर्ष | रूप | रस | गंध |
अशी ही पाच पंचकांची प्रत्येकी पाच तत्वे म्हणजे २५ तत्वांचा सूक्ष्म देह बनतो .ही तत्वे पंचमहाभूतात सामावलेली असतात .
अंत:करण ,व्यान ,कान ,वाणी ,शब्द यांचा आकाश या महाभूताशी संबंध असतो .
मन ,समान ,त्वचा ,हात ,स्पर्ष यांचा वायू या महाभूताशी संबंध असतो .
बुद्धी ,उदान ,डोळे ,पाय रूप यांचा तेजाशी संबंध असतो .
चित्त ,अपान ,जीभ ,जननेंद्रिय ,रस यांचा आपाशी संबंध असतो .
अहंकार ,प्राण ,नाक ,गुद ,गंध यांचा पृथ्वीशी ,या तत्वाशी संबंध असतो .
पंचमहाभूते स्थूलात कोणत्या गुणांनी व्यक्त होतात ?
पंचमहाभूते गुण
आकाश काम ,क्रोध ,शोक ,मोह ,भयं
वायू चळण ,वळण ,प्रसारण ,निरोध ,आकुंचन .
तेज भूक ,तहान ,आळस ,झोप ,मैथून .
पाणी रेत ,रक्त ,लाळ ,मूत्र ,घाम .
पृथ्वी हाडे ,मांस ,त्वचा ,नाडी ,रोम
पंचमहाभूतांच्या २५ तत्वांनी स्थूल देह बनतो ।
अंत:करण पंचकाची म्हणजे सूक्ष्म देहाची २५ तत्वे असतात .कारण देह ,अज्ञान रूप असतो .महाकारण देह ज्ञान रूप असतो .समर्थ म्हणतात :
विचारे चौदेहा वेगळे केले | मीपण तत्वासरीसे गेले | अनन्य आत्मनिवेदन जाले | परब्रह्मी ||१७-८-३१ ||
विवेके चुकला जन्ममृत्यू | नरदेही साधले महत्कृत्य | भक्तियोगे कृतकृत्य | सार्थक जाले ||१७-८-३२ ||
विचाराने चारही देह वेगळे झाले की तत्वांबरोबर मीपण नाहीसे होते .आत्मनिवेदन साधते .आत्मानात्म विवेकाने जन्म मृत्युच्या चक्रातून सुटका होते .भक्तीने कृतकृत्यता येते .जन्माची सार्थकता येते .यालाच पंचीकरण म्हणतात .
No comments:
Post a Comment