Thursday, November 5, 2009

परब्रह्म नक्की कसे आहे ?

सत्यब्रह्म ते कवण ऐसा श्रोता करी प्रश्न प्रत्योत्तर दे आपण वक्ता श्रोतयासी - -४२
सत्यब्रह्म नक्की कसे आहे ? असा प्रश्न श्रोते विचारतात ,त्याला समर्थ उत्तर देतात .परमात्म वस्तू एकच एक
आहे .सर्व दृष्टींनी अनंत आहे .त्याच्यात अनंत शक्ती अनंत प्रमाणात वास करतात .प्रत्येक माणसाची मनोरचना वेगवेगळ्या प्रकाराची असते .त्यामुळे प्रत्येकाला ब्रह्माच्या वेगवेगळ्या अंगाचा अनुभव येतो .जसा अनुभव त्याला येतो तसे ब्रह्म त्याला भासते .
काही जणांना ब्रह्माचे अनंतपण ,काहींना अलिप्तपण ,काहींना निवांतपण ,काहींना सर्वज्ञपण ,काहींना त्याचे सत्तास्वरुप भासते .तर कोणाला ब्रह्म नादस्वरूप ,ज्योतीरूप ,काहींना साक्षीरूप,कोणाला शब्दरूप ,चैतन्य रूप ,अशा अनेक प्रकारे अनुभवास येते .
खरे तर ब्रह्म नामरूपातीत आहे.ते निर्मळ ,निश्चल,शांत ,स्वानंदघन आहे .ब्रह्म अरूप आहे कारण त्याला पाहता येत नाही ,अगोचर आहे कारण ईंद्रियांना त्याचे आकलन होत नाही ,अच्युत आहे कारण ते स्थान सोडत नाही ,अनंत आहे कारण त्याला आदि अंत नाही ,अपरंपार आहे कारण त्याला मर्यादा नाही ,अदृश्य आहे ,अतर्क्य
तर्कापलिकडे ,अपार म्हणजे पार नसलेले आहे .
सुन्य आणि सनातनसर्वेश्वर आणि सर्वज्ञंसर्वात्मा जगजीवनऐसी नामे । । - -४८ । ।
ते शून्य ,सनातन ,सर्वेश्वर सर्वज्ञं ,सर्वात्मा जगाचे जीवन आहे .
सहज आणि सदोदितशुध्द बुध्द सर्वातीतशाश्वत आणि शब्दातीतऐसी नामे । । -- ४९ । ।
सह आणि सदोदित म्हणजे नेहमी असणारे शुध्द -कोणताही मळ नसणारे ,सर्वातीत म्हणजे सर्वांच्या पलिकडे ,शाश्वत -कायम टिकणारे ,शब्दातीत म्हणजे शब्दांनी बोलता येणारे ,विशाळ म्हणजे अतिशय भव्य ,असणा-या परब्रह्माला आत्मा ,परमात्मा ,परमेश्वर ,ज्ञानघन,पुरातन चिद्रूप चिन्मात्र असेही म्हणतात .२१ स्वर्ग पाताळ मिळून एक ब्रह्मगोल ,अशा अनेक ब्रह्म गोलांना ब्रह्म व्यापते . जळी,स्थळी,काष्ठी ,पाषाणी सर्वत्र ब्रह्म व्यापून
असते .ब्रह्म नाही अशी एकही जागा नाही .मनाच्या श्लोकात समर्थ म्हणतात ,'रीता ठाव या राघवेवीण
नाही '.ज्याप्रमाणे समुद्रातील माशांना पाणी आतबाहेर व्यापून असते त्याप्रमाणे सर्व जीवांना ब्रह्म आतबाहेर व्यापून असते .
ब्रह्माला कोणतीही उपमा देता येत नाही ,कारण ब्रह्म इंद्रियानी जाणता येत नाही .माणूस जेव्हा दोन गोष्टींची तुलना करतो तेव्हा तो त्याला इंद्रियानी जाणता येणा-या वस्तूंची तुलना करतो .पाणी कोठेतरी संपते जमीन सुरु
होते ,पण ब्रह्म सर्वत्र असते ते संपत नाही ते आपल्याला व्यापून असते .पण आपल्याला त्याची जाणीव
नसते .
तयामधेचि असिजेपरी तयास नेणिजेउमजे भास नुमजेपरब्रह्म ते । । -- । ।

No comments: