Thursday, November 26, 2009

ब्रह्म नक्की कसे आहे ?या पोस्ट वरील टिप्पणी वर उत्तर

ब्रह्म नक्की कसे आहे या पोस्ट वर आलेल्या टिप्पणी वर उत्तर देताना काय द्यावं याचा विचार करत होते .विचार करता करता मला गाढ झोप लागली .झोपेत एकदम सर्व खोली प्रकाशाने प्रकाशित झाली .प्रकाश इतका प्रखर होता की डोळे उघडत नव्हते .पण प्रकाश जाणवत होता .तेव्हड्यात आवाज आला , '' मुली ,माझ्या स्वरूपाचा विचार करते आहेस ?अग ,जे देवादिकांना ज्ञात नाही ते तुम्हा पामरांना कसे समजणार ?तरी मी तुला सांगतो .बघ,तू डोळे मिटले आहेस .तरीही तुला प्रकाश दिसतो आहे कशाने ?अग मीच तुझ्या डोळ्यांमध्ये आहे माझ्याच शक्ती ने तू पाहू
शकतेस .आता तू झोपली आहेस ,झोपेत इँद्रियांची कार्य थांबलेली असतात .पण तरीही तू ऐकते आहेस का माहीत आहे ?कारण मीच त्याच्या मागे शक्ती देतो आहे .मीच तुझ्या कर्मेँद्रियांना ,ज्ञानेंद्रियांना काम करण्याची शक्ती मीच
देतो . ज्ञान करून घेण्यासाठी मीच उद्युक्त करतो .तुझ्या मनावरही माझाच ताबा आहे ,तसेच बुध्द्दीवरही .मीच तुला सर्व गोष्टी करायला लावतो आहे .बघ ,आहे ना मी तुला व्यापून ?अग ,तू आता जिवंत आहेस कारण माझाच अंश तुझ्यामध्ये आहे .तुझ्या आतमध्ये असलेला माझा अंश म्हणजे अंतरात्मा !
जसा मी तुला व्यापून आहे ,तू माझ्यात आहेस तसा मी या दृश्य विश्वाला व्यापून आहे .त्यातील सर्व चराचरांना व्यापून आहे .हे सर्व चराचर ,दृश्य विश्व ,त्यातील प्रत्येक सजीव निर्जीव या सर्वांना मी व्यापून आहे .पशु ,पंछी,वनस्पती याना पोट भरण्यासाठी ,स्वत :चा जीव वाचवीण्या साठी ज्या प्रेरणा आहेत त्या सर्व माझ्या मुळे आहेत .अनेक पंछी हिवाळ्यात अनेक किलोमीटर प्रवास करून उबदार प्रदेशात स्थलांतर करतात .लाजालू चे झाडाची पाने स्पर्श केला की मिटतात.ही उदाहरणे सांगतात की मीच या सर्व विश्वाला व्यापून आहे .त्यालाच विश्वात्मा म्हणतात .
तुला वाटेल मी फक्त सजीवांना व्यापून आहे .पण तसे नाही .निर्जीवांनाही मी व्यापून आहे .अगदी दगडात सुध्द्दा ! दगडातील अति सूक्ष्म कण अणू ,त्यांच्या मध्ये असलेल्या आकर्षण प्रतिकर्षण बलाने ते एकमेकांना चिकटलेले असतात ,मग विशिष्ट आकारही तयार होतात .अनेक धातू ,अधातु ज्यांचा उपयोग तुम्ही तुमच्या सुख सोईं साठी उपयोग करून घेता त्यामध्ये असलेले विशिष्ठ गुणधर्म ही मीच दिलेले आहेत .ते दिले मूळमाये तर्फे .माझ्यात पहिले स्फुरण 'एको हं बहुस्याम 'म्हणजे मूळमाया .मूळमायेतून गुणमाया निर्माण झाली .गुणमायेतून
सत्व ,रज ,तम हे तीन गुण निर्माण झाले .तमोगुणा पासून पंचमहाभूते निर्माण झाली .पंचमहाभूते त्रिगुण यापासून प्रकृती निर्माण झाली .दृश्य विश्व निर्माण झाले .पण माझ्यात ह्या त्रिगुणांचे वास्तव्य नाही .मी गुणातीत आहे .मी निर्गुण आहे .
मला आकार नाही .बघ .२१ स्वर्ग सप्त पाताळ यांच्या पासून एक ब्रह्मगोल तयार होतो .या ब्रह्मगोलाची ,त्याच्या आकाराची तू कल्पना करू शकशील ?असे अनंत ब्रह्मगोल माझ्यात आहेत .मग माझा आकार कसा असेल ?मी निराकार आहे .
दासबोधात समर्थ रामदासांनी सांगितले आहे ना की हे दृश्य विश्व माझ्या एका अंशात्मक भागावर आहे .ते अगदी खरे आहे .समर्थ रामदास मला जाणणारे होते .ज्ञानी होते .त्यावरून तुला कल्पना येइल माझ्या अनंतपणाची! या अनंतपणातही मी घनदाट पणे भरून आहे .अशी एकही जागा नाही जिथे मी नाही .सर्वत्र मी भरून आहे .
ज्याप्रमाणे पाण्याला आकार नसतो ,आपण ठेवू त्या भांडयाचा आकार पाण्याला आल्या सारखा वाटतो ,त्याप्रमाणे मी ज्या ज्या इंद्रियाकडून काम करवून घेतो त्या त्या इंद्रिया मी आहे असा भास होतो ,पण माझ्यात इंद्रिये नसतात .मी इंद्रियातीत आहे .
मी अतिशय सूक्ष्म अत्यंत विशाल आहे .ज्याप्रमाणे साखरेची गोडी साखरेच्या सूक्ष्म कणातही असते अतिशय मोठ्या साखरेच्या गोणीतही असलेल्या साखरेतही असते . त्याप्रमाणे मी सूक्ष्म कणात ही असतो अति विशाल ब्रह्म गोलांनाही व्यापून असतो .
मुंडक उपनिषदात माझे वर्णन आले आहे :
दूरात सुदूरे तद इह अंतिकेच
पशत्सु इहैव निहितं
मी दूराहून दूर अगदी जवळ आहे समीप आहे .मला कोणी पहाण्याचा प्रयत्न करत नाही .तू जेव्हा घरी एकटी असतेस तेव्हा टी .व्ही,रेडिओ लावता अशी कल्पना कर की मी तुझ्या बरोबर आहे ,मी तुझ्या अगदी सन्निध आहे .असा जर अभ्यास चालू ठेवलास तर एक दिवस तुला नक्की जाणवेल की मी तुझ्या जवळ आहे .प्रयत्न तर करून पहा !
माझे केवळ निर्गुण रूपच नाही तर सगुण रूपही आहे .प्रभू रामचंद्र भगवान श्रीकृष्ण ही माझी सगुण रूपेच आहेत त्यांची भक्ती करूनही भक्तांना माझ्या पर्यंत पोहोचता येते .

1 comment:

sharayu said...

ब्रह्म हे इंद्रियगोचर नसल्याने अस्तित्वात नाही असे म्हणता येते, पण साक्षात्काराच्या योगे त्याला अस्तित्व आहे असे जाणवते. ब्रह्माची ही व्याख्या मला अधिक पटते.