Saturday, November 28, 2009

ब्रह्म आणि माया यातील द्वैताचा निरास


ब्रह्म आणि माया यातील द्वैताचा निरास कसा करायचा ?
ब्रह्म अंतरी प्रकाशे आणी माया प्रत्यक्ष दिसे आता हे द्वैत निरसे कवणे परी हो - -
श्रोता म्हणतो की मागच्या समासात सांगितलेले ब्रह्मस्वरूप पटले.अंतर्यामी शुध्द ब्रह्म प्रकाशते आहे ,इंद्रीयांना माया प्रत्यक्ष दिसते आहे .मग अशा द्वैताचे निरसन कसे करावे ?
समर्थ उत्तर देतात :
सत्य ब्रह्माचा संकल्प मिथ्या मायेचा विकल्प ऐसिया द्वैताचा जल्प मनची करी - -
जाणे ब्रह्म जाणे माया ते एक जाणावी तुर्या सर्व जाणे म्हणोनिया सर्वसाक्षिणी - -
मनच
संकल्प व विकल्प करते .मन ब्रह्माची कल्पना करते तेव्हा तिला संकल्प म्हणतात .मन मायेची कल्पना करते तेव्हा तिला विकल्प म्हणतात .ब्रह्म व माया हे द्वैत ,संकल्प विकल्प हे सुध्दा द्वैतच !ते मन करते .जेव्हा मनाची अवस्था अशी असते की ते ब्रह्म ही जाणते व मायाही जाणते .तेव्हा त्या अवस्थेला तुर्या म्हणतात .
संकल्प विकल्पाची सृष्टी जाली मनाचिये पोटी ते मनचि
मिथ्या शेवटी साक्षि कवणू - - मनातूनच संकल्प विकल्पाची सृष्टी बाहर पडते .पण शेवटी मन मिथ्या ठरते .मन नाहिसे झाल्यावर साक्षिपणाने पहाणारा कोणी रहात नाही .ज्याप्रमाणे आकाश एकच खरे आहे पण त्याचे घटाकाश ,मठाकाश,महादाकाश असे भेद केले जातात त्याप्रमाणे शुध्द ब्रह्माच्या ठिकाणी कोणतेच गुण नसले तरी त्याच्यावर साक्षिपणा चैतन्य ,सत्ता हे गुण ब्रह्माच्या माथी मारले जातात .
माया आपण खरी मानतो म्हणून ब्रह्मावर हे गुण आपण लादतो .पण माया ,अविद्या यांचा निरास झाला की द्वैत नाहीसे होते .साक्षित्व विलीन पावते .मन व्यापक बनता बनता सर्वसाक्षि बनते .द्वैत नाहीसे होते .तेव्हा मन उन्मन होते तुर्या नाहीशी होते .मी सर्व जाणतो हे ज्ञान ही नाहिसे होते .
येवं द्वैत आणि अद्वैत होये वृत्तीचा संकेत वृत्ती जालिया निवृत्त द्वैत कैंचे - -१३
वृत्तीरहित जे ज्ञानतेचि पूर्ण समाधानजेथे तुटे अनुसंधानमाया ब्रह्मीचे । । - -१४ । ।
जेव्हा द्वैत अद्वैत असा भेद प्रतित होतो तेव्हा वृत्ती असते .वृत्ती नाहिशी झाल्यावर द्वैत उरत नाही .तेव्हा मन दृश्यातून बाहेर पडून परमश्रेष्ठ ब्रह्मात विलीन होते .जेव्हा ज्ञानात वृत्तीला स्थान नसते तेव्हा ते ज्ञान खरे ब्रह्मज्ञान असते .ब्रह्मज्ञान झाले की माया ब्रह्माचे चिंतन संपते .
सदा स्वरूपानुसंधानकरी द्वैताचे निर्शनअद्वय निश्चयाचे ज्ञानतेचि शुध्द कल्पना । । - -३४ । । जेव्हा स्वस्वरूपाचे अनुसंधान राखले जाते ,स्वस्वरूपात मन लीन होते तेव्हा माया ब्रह्माचे द्वैत संपते .
अद्वैत कल्पना प्रकाशेतेचि क्षणी द्वैत नासेद्वैता सरिसी निरसेसबळ कल्पना । । - -३७ । ।
अद्वैत कल्पना जेव्हा उगम पावते त्या क्षणी द्वैत नाहिसे होते .त्याच वेळेस सबळ कल्पना म्हणजे अशुध्द कल्पना नाहिशा होतात .
आता असो हे बोलणे जालेआशंका फेडू येका बोले
जयास द्वैत भासलेते तू नव्हेसी सर्वथा । । - -४३ । ।
ज्या कल्पनारूप मनाला द्वैतमय दृश्य स्वरुप अनुभवास येते ते मन तुझे खरे स्वरुप नाही .खरा तू त्या पलिकडे आहेस .

No comments: