Wednesday, March 17, 2010

देव कोणासी म्हणावे ?

देव कोणासी म्हणावेकैसे तयासी जाणावेतेचि बोलणे स्वभावेबोलिजेल । । - -१६ । ।
हिन्दू संस्कृति मध्ये ३३ कोटी देव मानले आहेत .देव दर्शन होण्यासाठी देवाचे स्वरुप आकलन होण्यास कठीण
आहे ,त्याला ओळखण्याचा मार्ग समजणे आवश्यक आहे .हे विश्व त्यातील अनंत जीवप्राणी त्याच्या सत्तेने निर्माण होतात जगतात ,तो खरा देव .देवाच्या सत्तेने सगळे दृश्य तगते पण देव मात्र अदृश्य नामरूपविरहित आहे .
खरा देव कोणता ?
जेणे केले चराचरकेले सृष्टयादि व्यापारसर्वकर्ता निरंतरनाम ज्याचे । । - -१७ । ।
तेणे केल्या मेघमाळाचंद्रबिंबी अमृतकळातेज दिधले रविमंडलाजया देवे । । - -१८ । ।
ज्याची मर्यादा सागराजेणे स्थापिला फणीवराजयाचेनि गुणे ताराअंतरीक्ष । । - -१९ । ।
च्यारी खाणी चारी वाणीचौ-यासि क्ष जीव योनीजेणे निर्मिले लोक तिनीतया नाव देव । । - -२० । ।
ब्रह्मा विष्णू आणि हरहे जयाचे अवतारतोचि देव हा निर्धारनिश्चयेसी । । -- २१ । ।
ज्याने चराचर विश्व निर्माण केले ,ज्याच्या सत्तेने विश्वातील घडामोडी घडून येतात ,जो कायमच सर्वकर्ता या नावाने ओळखला जातो तो खरा देव !
ज्याने आकाशात मेघमाळा निर्माण केल्या ,चंद्राच्या चांदण्यात अमृत निर्माण केले रविमंडलाला तेज दिले , सागराला मर्यादा घालून दिल्या ,शेषाची स्थापना करून पृथ्वी स्थिर केली ,अनंत तारका आकाशात बसविल्या तोच खरा देव .चार वाणी ,चारी खाणी ,प्राण्यांच्या चौ-याशी क्ष योनी ,स्वर्ग मृत्यु पाताळ हे तीनही लोक ज्याच्या सत्तेने निर्माण झाले तो खरा देव !
ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे ज्याचे अवतार आहेत तोच खरा देव !
सर्वकर्ता तोचि देवपाहो जाता निरावेवज्याची कळा लीळा लाघवनेणती ब्रह्मादिक । । - -२४ । ।
असा जो सर्वकर्ता आहे तोच खरा देव आहे .त्याला बघायला गेले तर तो निरावेव निराकार आहे .
खरा देव कोणता नाही ?
देव्हाराचा उठोनि देवकरू नेणे सर्व जीवतयाचेनि ब्रह्मकटावनिर्मिला वचे। । - -२२ । ।
ठाई ठाई देव असतीतेंहि केली नाही क्षितीचंद्र सूर्य तारा जी मूर्तीतयाचेनि नव्हे । । - -२३ । ।
देव्हा-यातील देव खरा नाही कारण तो जीवप्राणी निर्माण करू शकत नाही ,ब्रह्मांड उत्पन्न करू शकत
नाही ,जागोजागी आढळणा-या देवांपैकी कोणीही पृथ्वी निर्माण करू शकत नाही .ब्रह्मांड उत्पन्न करू
शकत नाही .जागोजागी आढळणा-या देवांपैकी कोणीही पृथ्वी निर्माण करत नाही .चंद्र सूर्य तारका मेघ यापैकी काहीही त्यांच्या सामर्थ्याने अस्तित्वात येत नाही .
देवे निर्मिली हे क्षितीतिचे पोटी पाषाण होतीतयासिच देव म्हणतीविवेकहीन । । - -२९ । ।
जी पृथ्वी देवाने निर्माण केली ,त्या पृथ्वीवर दगड निर्माण होतात ,अज्ञानी ,अडाणी माणसे त्या दगडांना देव म्हणतात .
मग खरा देव नक्की कोणता ?
सगळे दृश्य विश्व ,दृश्य पदार्थ मिथ्या आहे नाशिवंत आहे .त्याला पायाभूत असणारे जे तत्व म्हणजे देव ! सगळे दृश्य विश्व नाश पावले तरी जे जसेच्या तसे राहते ,टिकते तो देव ! जीवाच्या अंतर्यामी असतो तो आत्मा ,चराचर विश्वाला आतबाहेर व्यापतो तो अंतरात्मा ,विश्वाच्या पलिकडे असतो परमात्मा ! एकच सदवस्तू जीव जगत यांच्या उपाधीने भिन्न वाटते .ते शुध्द आत्मस्वरूप म्हणजे देव !

No comments: