Monday, March 29, 2010

मोक्ष लाभे किती दिवसी ?

नेहमी असा प्रश्न पडतो की लोक साधना करतात ,त्यांना सत्समागम घडतो तरीही त्यांना ब्रह्म दर्शन घडत नाही असे का ?म्हणून श्रोता प्रश्न विचारतो :
श्रोता विनवी वक्तयासी सत्संगाची महिमा कैसी मोक्ष लाभे कितां दिवसी हे मज निरोपावे - -
धारिता साधूची संगती कितां दिवसां होते मुक्ती हा निश्चय कृपामूर्ती मज दिनास करावा - -
श्रोता वक्त्याला विनंती करतो की आपण सत्संगाचा महिमा सांगता ,जर सत्संग लाभला तर किती दिवसात मोक्ष प्राप्त होतो ते सांगावे .सत्पुरुषाची संगत धरल्यावर किती दिवसात ब्रह्मदर्शन घडून मुक्ती लाभते ते सांगावे .
वक्ता उत्तर देतो :
मुक्ती लाभे त्क्षणी विश्वासता निरूपणी दुश्चितपणी हानी होतसे - -
सत्पुरुष जो उपदेश करतो त्यावर संपूर्ण विश्वास ठेवावा की ताबडतोब आत्मज्ञानाने मुक्ती लाभते .दुश्चित्तपणे मात्र हानी होते .यावर श्रोता म्हणतो :
सुचितपणे दुश्चित्त मन होते अकस्मात त्यास करावे निवांत कोणेपरी - -
मन सूचित असते पण एकाएकी दुश्चित्त होते .मग मन अशांत होते ते एकाग्र चित्त कसे व्हावे ते कृपा
करून सांगावे .त्यावेळेस समर्थ सांगतात :
मनाच्या तोडून वोढी श्रवणी बैसावे आवडी सावधपणे घडीने घडी काळ सार्थक करावा - -
आपले मन निरनिराळया वस्तूंकड़े ,विषयांकड़े ओढले जाते .ते प्रथम थांबवावे .आवडीने श्रवण करायला
बसावे .वेळ वाया जाऊ देता त्याबद्दल सावध असावे .वेळ सार्थकी लावावा .आपण जो ग्रन्थ श्रवण करतो त्यातील अर्थ प्रमेय सिद्धांत शोधून काढावे आपल्या बुध्दीत साठवावे असे समर्थ सांगतात .
मोक्ष केव्हा मिळेल ते सांगताना समर्थ म्हणतात :
लोहो परिसेसी लागला थेंबुटा सागरी मिळाला गंगे सरीते संगम झाला त्क्षणी - -४३
सावध साक्षपी आणि क्ष त्यास तत्काळचि मोक्ष इतरांस ते अलक्ष क्षिले नवचे - -४४
येथे शिष्य प्रज्ञा केवळ प्रज्ञावंता नलगे वेळ अनन्यास तत्काळ मोक्ष लाभे - -४५
प्रज्ञावंत आणि अनन्य तयास नलगे येक क्षण। अनन्य भावार्थे विण प्रज्ञा खोटी - -४६
प्रज्ञेविण अर्थ कळे विश्वासेविण वस्तू कळे प्रज्ञाविश्वासे गळे देहाभिमान --४७
देहाभिमानाचे अंती सहजचि वस्तूप्राप्ती सत्संगे सद्गती विलंबचि नाही --४८
सावध साक्षेपी विशेष प्रज्ञावंत आणि विश्वास तयास साधनी सायास करणेंचि नलगे - -४९
इतर भाविक साबडे तयांसहि साधने मोक्ष जोड़े साधुसंगे तत्काळ उडे विवेकदृष्टी - -५०
लोखंड परिसाला लागले की त्क्षणी सोने बनते ,थेंब सागरात पडला की त्क्षणी सागर बनतो .नदी गंगेला मिळाली की त्क्षणी गंगा बनते .त्याप्रमाणे जो अत्यंत सावध ,कष्टाळू ,त्पर आहे त्यास सत्समागमामध्ये ताबडतोब मोक्ष प्राप्त होतो .ज्याच्या अंगी हे गुण नाहीत त्यांना मोक्ष लाभत नाही .
परमार्थाच्या अनुभवासाठी ,ब्रह्मानुभावासाठी त्याची बुध्दी तयार व्हावी लागते ,सू क्ष्म व्हावी लागते ,तरच त्क्षणी मोक्ष मिळतो .ज्याची बुध्दी अत्यंत सूक्ष्म आहे अनन्य श्रध्दा आहे त्याला स्वरूपसाक्षात्काराला वेळ
लागत नाही .पण अनन्य श्रध्देशिवाय सूक्ष्म बुध्दीचा उपयोग होत नाही .
सूक्ष्म बुध्दी नसेल तर सद्गुरु जे सांगतात ते कळत नाही अनन्यता नसेल तर आत्मवस्तू आकलन
होत नाही. प्रज्ञा अनन्यता दोन्ही असेल तर देहाभिमान ,देह्बुध्दी गळून पडते .मी देह आहे या भावनेचा नाश झाला की आत्मवस्तू सहज लाभते .
जे श्रध्दावंत भोळे असतात अशांना साधनाने मोक्ष मिळतो .सत्समागम झाला की विवेकशक्ती निर्माण होते सदवस्तूचे दर्शन घडते .सत्पुरुष आत्मशक्ती निर्माण करणारे चालते बोलते यंत्र असते .जो जीव सत्पुरुषाच्या संगतीत येतो ,त्याच्यात आत्मशक्ती सारखी ओततो .जो प्रज्ञावं ,श्रध्दावंत असतो त्याला संतांकडून संक्रमित झालेली आत्मशक्ती पचते,आत्मदर्शन होते ,प्रतिभा जागी होते .
ज्ञान झाले ,आत्मदर्शन झाले तरी साधना सोडू नये असे समर्थ सांगतात .समर्थ म्हणतात :
परी ते साधन मोडू नयेनिरूपणाचा उपायेनिरुपणे लागे सोयेसर्वत्रांसी । । - -५१ । ।

No comments: