Saturday, October 31, 2009

मी कसा नाहीसा होतो ?

मी नाहीसा करण्या साठी कोणाकडे शिकावे ?
आता मनासी जे अप्राप्तते कैसे होइल प्राप्तऐसे म्हणाल तरी कृत्यसद्गुरुविण नाही । । --१२ । ।
मी देह आहे या घट्ट समजुती मुळे परमार्थ साधत नाही .सद्गुरूजवळ ते कसे शिकावे ?असा प्रश्न शिष्य विचारतात तेव्हा समर्थ म्हणतात की धान्याने कोठारे भरलेली आहेत पण कुलुपे लावली आहेत .त्यांची किल्ली आपल्याजवळ नसेल तर त्यातील वस्तू अप्राप्य होतात तसे मनाला जे अप्राप्त असते ,ते आपल्याला मिळत नाही कारण देह्बुध्दी हे कुलुप असते .त्या कुलुपाची किल्ली आपल्याला सापडत नाही .
तेव्हा शिष्य विचारतात ,
तरी ते किली ते कवणमज करावी निरूपणऐसा श्रोता पुसे खूणवक्तयासी । । - १४ । ।
श्रोता समर्थांना विनंती करून विचारतो ती किल्ली कोणती ते कृपा करून सांगा .
समर्थ उत्तर देतात -
सद्गुरू कृपा तेचि किल्लीजेणे बुध्दी प्रकाशिलीद्वैत कपाटे उघडलीयेकसरी। । -- १५। ।
समर्थ सांगतात की सद्गुरुकृपा हीच किल्ली आहे तिच्यामुळे आत्मज्ञान होते द्वैताची दारे उघडतात म्हणजे सद्गुरु कृपेने देह्बुध्दी जावून आत्मबुध्दी प्रकट होते .द्वैताची कपाटे म्हणजे सत्य -मिथ्या ,हर्ष -शोक ,मी -तू ,
माझे -तुझे , या द्वैताच्या कल्पनांच्या आड परब्रह्म दडलेले असते सद्गुरु कृपेने द्वैत कल्पना मावळून अद्विताचा अनुभव येतो .देह्बुध्दी मुळे जीव द्वैताच्या कोंडीत पकडलेला असतो .आत्मबुध्दी निर्माण झाली की जीवाचे वेगळेपण गळून पडते आत्म्बुध्दीत मन मनपणाने उरत नाही .जीव शिव बनतो .मग सुखाला वाण नसते .अनुसंधान रूप झाल्याने वेगळेपणाने साधना नसते .