Friday, August 28, 2009


सिध्द
सिध्द :साधकाची पुढची अवस्था !समर्थ म्हणतात :साधू वस्तू होउनि ठेला । साधू म्हणजे सिध्द ब्रह्मरूप
होतो .त्यामुळे त्याचे संशय नाहीसे होतात .मी देह आहे ही देह्बुध्दी उरत नाही .मी ब्रह्म आहे या निश्चया पासून तो ढळत नाही .याकारणे नि :संदेह श्रोतीसाधू वोळखावा। । -१० -३२ । ।
साधकामधील संदेह वृत्ती नाहीशी होते ,सिध्द नि :संदेह असतो .
संशयरहित ज्ञानतेचि साधूचे लक्षण। । -१० -१३ । ।
अत्यंत संशयरहित आत्मज्ञान हेच सिध्द्पण अंगी बाणण्याचे लक्षण आहे .
म्हणोनि संदेहरहित ज्ञान । निश्चयाचे समाधान । तेचि सिध्दाचे लक्षण । निश्चयेसी । । ५ -१० - २७ । ।
संदेह म्हणजे संशय .यात अज्ञान असते .कारण वस्तूच्या स्वरूपाबद्दल खात्री नसते .सिध्दाला कोणतीही शंका नसते .देहबुध्दीत शंका असते .सिध्दाला शंका नसल्याने देह्बुध्दी विरलेली असते .सिध्द देहातीत असल्याने त्याची लक्षणे वाणीने सांगता येणारी नसतात .
जे लक्षवेना चक्षूसी । त्याची लक्षणे सांगावी कैसी । निर्मळ वस्तू सिध्द त्यासी । लक्षणे कैसी । । ५ -१०- ४३ । ।
सिध्द ब्रह्मस्वरूप झालेला असतो त्यामुळे त्याची लक्षणे वर्णन करता येत नाहीत .
अचळ झाली अंतरस्थितीतेथे चळणास कैची गतीस्वरूपी लागता वृतीस्वरूपची जाली । । - -१४ । । सिध्दाच्या मनाची वृती निश्चल होते .त्याच्यावर कोणत्याही बाह्य घटकांचा ,सुख दू :खाचा परिणाम होत
नाही .त्यामुळे त्याचे समाधान अचल राहते .सुख आणि दू :ख तो समान मानतो .अंतर्यामी तो स्थिर असतो .त्याची अंतरीच निवृती झालेली असते .कारण त्याचे मन सतत भगवंताच्या चरणी लागलेले असते .त्याचे हवे नको पण संपलेले असते .देहाची अवस्था कशीही असली तरी त्याचे मन आत्मस्वरूपाला चिकटलेली असते .
वृत्ती निर्गुण स्वरूपाच्या ठिकाणी राहणे ही परमार्थ साधनेची पराकाष्ठा आहे .त्रिगुणातीत परमात्म स्वरूपात राहणे ही साधनेच्या अभ्यासाची पराकाष्ठा आहे .हे केवळ संतसंगतीत राहून व श्रवण मननाने घडते .त्यामुळे साधू निष्काम असतात .त्याच्या जवळ स्वस्वरूपाचा अक्षय ठेवा असल्याने त्याला षड्रिपू त्रास देत नाहीत .सर्वत्र माझेच स्वरुप आहे असा प्रत्यय त्याला येत असल्याने कोणावर रागवायचे असा प्रश्न असतो त्यामुळे तो क्रोध रहित असतो .साधू स्वस्वरूपाच्या आनंदात तल्लीन असतो .दुस-यावर आरेरावी करायला त्याला वेळ नसतो .स्वस्वरूप निर्विकार असल्यामुळे साधूच्या अंगी विकार नसतात .साधू स्वरुप स्वयंभ । तेथे कैसा असेल दंभ । साधू
स्वत : स्वस्वरूप असल्यामुळे त्याच्यात द्वैत नसते .त्यामुळे दंभ कोणाला दाखवणार ?त्यामुळे तो दंभ रहित असतो .साधू कसा ओळखावा त्यासाठी समर्थ म्हणतात :
आशा धारिता परमार्थाचीदुराशा तुटली स्वार्थाचीम्हणोनि नैराशता साधूचीवोळखण। ।
-- ४६ । ।
मृदपणे जैसे गगनतैसे साधूचे लक्षणयाकारणे साधूवचनकठीण नाही । । - -४७ । ।
स्वरूपाचा संयोगीस्वरूपाची जाला योगीयाकारणे वीतरागीनिरंतर । । - -४८ । ।
स्थिती बाणता स्वरूपाचिचिंता सोडिली देहाचीयाकारणे होणाराचिचिंता नसे । । - -४९ । ।
साधू स्वरूपीच राहेतेथे संगची साहेम्हणोन साधू तो पाहेमानापमान । । - -५१ । ।

Wednesday, August 26, 2009

सांसारिक साधक होऊ शकत नाही का ?


समर्थांनी साधकाचे जे वर्णन केले ते ऐकून श्रोत्याने विचारले प्रपंचिकाला त्याग घडत नाही मग तो साधक बनू शकत नाही का ?
येथे संशय उठिलानिस्पृह तोचि साधक झाला
त्याग घडे सांसारिकालातरी तो साधक नव्हे की । । - -६१ । ।
या प्रश्नाचे उत्तर समर्थांनी . समास १० मध्ये दिले आहे .
सन्मार्ग तो जीवी धरणेअनमार्गाचा त्याग करणेसंसारिका त्याग येणेप्रकारे ऐसा । । -१० - । ।
कुबुध्दी त्यागेविण काहीसुबुध्दी लागणार नाहीसंसारिका त्याग पाहीऐसा असे । । -१० - । ।
प्रपंची वीट मानिलामने विषय त्याग केलातरीच पुढे अवलंबिलापरमार्थ मार्ग । । -१० - । ।
त्याग घडे अभावाचात्याग घडे संशयाचात्याग घडे अज्ञानाचाशनै शनै । । -१० - । ।
सांसारिका ठाई ठाईबाह्यत्याग घडे काहीनित्यनेम श्रवण नाहीत्यागेविण । । -१० - । ।
ज्याला साधक व्हायचे आहे त्याला सन्मार्ग धरावा लागतोत्यासाठी त्याला अनेक दुर्गुणांचा,कुविद्यांचा ,स्वार्थाचा षड्रिपूंचा त्याग करावा लागतो .हाच संसारिकांचा त्याग असतो .कुबुध्दी -वाईट बुध्दीचा त्याग केल्याशिवाय सुबुध्दी येत नाही .त्यामुळे कुबुध्दीचा त्याग हाच संसारिकांचा त्याग असतो .प्रपंचाचा वीट येतो त्यामुळे देहातून सुख घेण्याची इच्छा नाहीशी होते .त्यामुळे साधक बनण्याचा मार्ग खुला होतो .साधक व्हायचे असेल तर अभावाचा [परमेश्वर नाही या भावाचा ] त्याग करावा लागतो .परमेश्वराच्या अस्तित्वा विषयी संशयाचा त्याग करावा
लागतो .त्यागाशिवाय नित्यनेम ,श्रवण ही परमार्थ साधने आचरता येत नाहीत .
फिटली आशंका स्वभावेत्यागेविण साधक नव्हे । । -१० - । ।

Monday, August 24, 2009

साधक

साधक कोणाला म्हणावे?

आपल्यातील अवगुणांचा त्याग करून संतांची संगती जो धरतो संत त्याला आपला म्हणतात त्या मुमुक्षुला साधक म्हणतात .संत मुमुक्षुला आपला म्हणतात .तेव्हा त्याला आत्मज्ञानाचा उपदेश करतात .तेव्हा मी कोण हे त्याला स्वानुभवाने पटते .संसाराचे बंधन तुटते.म्हणजे त्याने संसार सोडावा लागत नाही .फक्त तो संसार अलिप्त पणे करू लागतो .साधनही तो सोडत नाही .संसारातील अलिप्त पणामुळे इतर विषय त्याला आकर्षित करत नाहीत .साधना दृढ करण्याचा तो प्रयत्न करतो .त्यासाठी तो सतत प्रयत्न करतो .सतत श्रवण करतो .तो तूच आहेस या महा वाक्यांच्या निरूपणाची गोडी त्याला लागते .श्रवणा नंतर मनन ,चिंतन करण्याची त्याला सवय लागते .त्यामुळे शब्दांच्या सूक्ष्म अर्थाकडे तो वळतो.श्र वणात आत्मानात्म विवेक मांडला तर मन लावून ऐकतो .त्यातून त्याला असलेले संशय तो फेडून घेतो .आत्मज्ञान दृढ करतो .
संत पले सर्व संशय फेडतात त्यासाठी तो संत संगती धरतो .गुरुप्रचिती ,शास्त्रप्रचिती ,आत्मप्रचिती एकच आहे हे तो अनुभवतो .त्यासाठी देह्बुध्दी विवेकाने तो बाजुला सारतो ,म्हणजे मी देह नाही ही मिथ्या भावना विवेकाने बाजूला सारतो .आत्म बुध्दी सुदृढ करतो म्हणजे मी देह नसून आत्मा आहे असे मानतो .इंद्रिय गोचर नसलेली ब्रह्मवस्तू बघण्याचा एकाग्र होउन प्रयत्न करतो .आत्म्याशी तदाकार होउन राहण्याचा अभ्यास करतो .म्हणजे मी देह नाही आत्मा आहे असे अनुसंधान ठेवतो .आत्म्याशी ठेवलेले अनुसंधान दृत्वाने धरलेले असते .
ज्या आत्मस्वरूपाचे वर्णन करताना वाचा कुंठीत होते ,दृष्टीला जे दिसत नाही ,तेच आत्मस्वरूप साधक अनेक प्रयत्नांनी धरतो .ज्या आत्मस्वरूपाचे वर्णन करताना मनही पोचत नाही ,जेथे तर्कही चालत नाही त्याचा अनुभव साधक घेतो .आत्मस्वरूपाचा अनुभव घेतो .
साधक देहावरील प्रेम नाहीसे करतो त्यामुळे त्याच्यातील अनेक दुर्गुण नाहीसे होतात .अनेक भ्रामक कल्पना नाहीशा होतात .षड्रिपू त्याच्या पासून दूर पळतात तो कुलाभिमान सोडतो ,वैराग्याच्या जोरावर तो परमार्थ वाढवतो .वैभव ,मानसन्मान बाजूला सारतो .संशय विकल्प नाहीसे करतो .आत्मस्वरूपी लीन झाल्याने संसाराचे भय त्याला वाटत नाही .काळाची तो तंगडी मोडतो म्हणजे तो आत्मस्वरूपाशी अनुसंधान साधल्याने निर्भय होतो .आत्मबुध्दी असल्याने देह्बुध्दी नाहीशी होते .त्यामुळे देह्बुध्दी मुळे येणारी दू :खे नाहीशी होतात .
आत्मज्ञानाने साधकाचा विवेक शक्तीमान होतो .त्यामुळे स्वस्वरूपा बद्दल दृढ निश्चय होतो .अवगूणांचा नाश
होतो .अवगुणांची जननी आसक्ती सुध्दा विवेक वैराग्याने नष्ट होते .समर्थ म्हणतात :
विसरास विसरलाआळसाचा आळस केलासावध नाही दुश्चित्त झालादुश्चित्तपणासी । । - -५८ । । साधक स्वस्वरूपाचे अनुसंधान विसरण्याचे विसरतो .त्याचे अखंड स्मरण ठेवतो .तो आळसाचा आळस करतो .
तो चित्तविक्षेप होऊ देत नाही .चित्त व्यग्र नसते म्हणजे अनेक गोष्टीत मन पसरत नाही .संतांचा उपदेश ऐकून जो आपले अवगूण सोडतो तो साधक असतो .

Tuesday, August 11, 2009

मुमुक्षु


मुमुक्षु
जेव्हा रेशमाचा किडा कोषातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो कोषातून सुटतो ,कमलावरील भुंगा कमल पाकळ्या झुगारतो व त्यातून बाहेर पडतो ,तसे आकस्मात आलेल्या आपत्ती मुळे मनुष्य खडबडून जागा होतो ,ह्या संसारात काही राम नाही असे त्याला वाटू लागते , आपण पूर्वी केलेल्या चुकांची ,कुकर्मांची आठवण होउन त्याला पश्चात्ताप होतो .पश्चात्ताप होउन पूर्वी घडलेल्या चुका पुन्हा करायच्या नाहीत असा अनुताप होतो .तेव्हा त्याला संसारातून सुटण्याची तळमळ लागते .आपल्याला ईश्वर प्राप्तीसाठी प्रयत्न करावे असे मनापासून वाटते तेव्हा तो मुमुक्षु पणात जातो .आत्तापर्यंत घालवलेल्या जीवनाबद्दल अनुताप व त्याच बरोबर आत्मज्ञानाची तळमळ ही मुमुक्षु पणाची दोन अंगे आहेत .अनुतापाने पूर्वीच्या जीवन पध्दतीत अमुलाग्र बदल होतो .त्यामुळे मुमुक्षुपण म्हणजे दूसरा जन्म समजला जातो .समर्थ म्हणतात :
संसार दु:खे दुखावलात्रिविध तापे पोळलानिरूपणे प्रस्तावलाअंतर्यामी । । - - । ।
जाला प्रपंची उदासमने घेतला विषय त्रासम्हणे आता पुरे सोससंसारीचा । । - - । ।
प्रपंचात जे श्रम घेतले ती हमाली झाली ,आता जीवनाचे सार्थक करू अशी पश्चात्तापाची भावना निर्माण होते .सार्थक करू असे म्हणताना सत्संगती करावीशी वाटते .आपले स्वत :चे दोष ,आपण केलेल्या चुका दिसू लागतात ,त्यातून तो स्वत :ची निंदा करू लागतो .
म्हणे मी अवगुणांची राशीम्हणे मी व्यर्थ आलो जन्मासीम्हणे मी भार झालो भूमीसी
या नाव मुमुक्षु । । - -३६ । ।
कोणत्याही साधनांनी मनाचे समाधान झाले नाही की काया ,वाचा मनोभावे संतांना शरण जातो .
देहाभिमान ,कुलाभिमान द्रव्याभिमान संतचरणी वाहतो .लौकिक थोरपणाची त्याला लाज वाटायला
लागते ,परमार्थासाठी झीज सोसायाची त्याची तयारी असते .संताचा त्याला आपलेपणा त्याला वाटू
लागतो .थोडक्यात मुमुक्षु म्हणजे
स्वार्थ सांडून प्रपंचाचाहव्यास धरिला परमार्थाचाअंकित होइन सज्जनाचाम्हणे तो मुमुक्षु । ।
- -४३ । ।

Monday, August 10, 2009

बध्द ,मुमुक्षु साधक सिध्द

समर्थांनी सांगितलेला क्रमविकास :बध्द ,मुमुक्षु ,साधक ,सिध्द
बध्द
श्री के .वि .बेलसरे त्यांच्या ग्रंथात म्हणतात ,पृथ्वीला समांतर असणा-या एका सरळ रेषेवर सर्व माणसे उभी केली तर रेषेचा आरंभ बिंदू म्हणजे अज्ञानी माणसे रेषेचा अंत्यबिंदू म्हणजे ज्ञानी माणसे पृथ्वी वरील समांतर रेषेला मध्य बिंदू मानला तर लोकांचे आणखी दोन वर्ग मानता येतात .आरंभ बिंदुकडून मध्यबिंदूकडे सरकणारी माणसे , मध्यबिंदू कडून अंत्य बिंदूकड़े सरकणारी माणसे .
पहिल्या बिंदूवरील लोक म्हणजे अज्ञानी म्हणजे बध्द ,मध्य बिंदूकडे सरकणारे मुमुक्षू ,मध्य बिंदूकडून अंत्य बिंदूकड़े सरकणारे साधक ,अंत्य बिंदूवरील पोहोचलेले सिध्द .
समर्थांनी सांगितलेला हां क्रमविकास आहे .या व्यतिरिक्त पाचवा वर्ग अस्तित्वात नाही .
बध्द कसा असतो ?
बध्द म्हणजे बांधलेला .कामिनी कांचनाच्या सापळ्यात अडकलेला असतो .
आता बध्द तो जाणिजे ऐसाअंधारीचा अंध जैसाचक्षुवीण दाही दिशासुन्याकार । । - - । ।
अंध माणूस जसा चाचपडत जातो त्याप्रमाणे बध्द माणूस अज्ञानाच्या अंधारात वावरत असतो .त्यामुळे त्याला भक्ती ,ज्ञान ,वैराग्य ,मोक्ष,साधन ,निश्चितपणे देव ,संताचा विवेक त्याला कळत नाही .कर्म ,अकर्म ,धर्म ,
अधर्म ,कळत नाही परमार्थ पंथ कितीही सुगम असला तरी दिसत नाही.पोटात भूतदया नसते ,देहाची स्वच्छता नसते .लोकांचे अंत :करण शांत करणारी मृदू वाणी नसते .
जयास नाही आत्मज्ञानहे मुख्य बध्दाचे लक्षण - -१८ । ।
त्याच्याकडे आत्मज्ञानाचा अभाव असतो .त्याला तीर्थ ,व्रत ,दान ,पुण्य काहीच करायच नसत. दया ,करूणा ,नम्रता सरलता हा कोणताच गुण त्याच्या जवळ नसतो .त्याच्याकडे सर्व गोष्टीँचा अतिरेक असतो .समर्थांनी बध्दांचे वर्णन करणारा मनाचा श्लो़क लिहिला आहे :
अति मूढ़ त्या दृढ़ बुध्दी असेना
अति काम त्या राम चित्ती वसेना
अति लोभ त्या क्षोभ होईल जाणा
अति वीषयी सर्वदा दैन्यवाणा। । ६४ । ।
या शिवाय बध्दांचे वर्णन करणा-या ओव्या पुढील प्रमाणे:
नेत्री द्रव्य दारा पहावीश्रवणी द्रव्य दारा ऐकावीचिंतनी द्रव्यदारा चिंतावीया नाव बध्द । । - -४० । ।
काया वाचा आणि मनचित्त वित्त आणि प्राणद्रव्य दारेचे करी भजनया नाव बध्द । । -- ४१। ।
द्रव्य दारा तेचि तीर्थद्रव्य दारा तोचि परमार्थद्रव्यदारेसि लावी सकलया नाव बध्द । । - -४३ । ।
द्रव्य दारेशी तो बध्द असल्यामुळे त्याला अनेक चिंता ,अनेक उद्वेग ,अनेक दू : सहन करावी लागतात ,त्यामुळे चित्त दु:श्चित्त रहाते आणि हातून परमार्थ घडत नाही .