Sunday, June 27, 2010

सृष्टीची उभारणी व संहारणी



सृष्टीची उभारणी संहारणी कशी होते असा प्रश्न श्रोत्यांनी विचारल्यावर समर्थ सांगतात :
आकाशापासून वायो होतोहा तों प्रत्यया येतोवायोपासून अग्नी जो तोसावध ऐका। । ११-- । ।
वायोची कठीण घासणीतेथे निर्माण जाला वन्ही मंद वायो सीतळ पाणीतेथुनि जाले। । ११-- । ।
आपापासून जाली पृथ्वीते नाना बीजरूप जाणावी
बीजापासून उत्पत्ति व्हावीहा स्वभावची आहे । । ११-- । ।
मुळीं सृष्टी कल्पनेचीकल्पना आहे मुळींचीजयेपासून देवत्रयाची काया जाली । । ११-- । ।
निश्चळामध्ये चंचळते ची कल्पना केवळअष्टधा प्रकृतीचे मूळकल्पनारूप । । ११-- । ।
कल्पना तेची अष्टधा प्रकृतीअष्टधा तेची कल्पनामूर्तीमूळाग्रापासून उत्पत्तीअष्टधा जाणावी । । ११-- । ।
पांच भूते तीन गुणआठ जाली दोनी मिळूनम्हणोनि अष्टधा प्रकृति जाणबोलिजेते । । ११-- । ।
मुळी कल्पनारूप जालीपुढे तेचि फाफावलीकेवळ जडत्वास आलीसृष्टीरूपे । । ११-- । ।
आकाशापासून वायू निर्माण होतो हा आपल्याला प्रत्यय येतो .वायू मधील कठीण घासणी मुळे अग्नी निर्माण
होतो .मंद वायूपासून पाणी तयार होते .पाणी आळून पृथ्वी तया होते .पृथ्वीवर अनेक प्रकाराची बीजे साठवलेली असतात .त्या बीजांपासून प्राणी ,वनस्पती तयार होतात .
निर्गुण निराकार ,त्रिगुणातीत परब्रह्मामध्ये जे स्फुरण झाले '-एको हं बहुस्याम ''' मी एक आहे ,अनेक व्हावे '' हे स्फुरण म्हणजे मूळमाया !तिच्यामध्ये तीन गुण निर्माण झाले म्हणून ती गुणमाया झाली .तिच्यापासून
सत्व ,रज,तम हे त्रिगुण निर्माण झाले .या तीनही गुणांचे स्वामी असलेले ब्रह्मा ,विष्णू ,महेश हे देहधारी देव निर्माण झाले .रजोगुणाचा स्वामी ब्रह्मा ,सत्वगुणाचा स्वामी विष्णू , तमोगुणाचा स्वामी महेश निर्माण
झाले .तमोगुणापासून पृथ्वी आप तेज वायू आकाश ही पंचमहाभूते निर्माण झाली .पंचमहाभूते त्रिगुण यापासून अष्टधा प्रकृती निर्माण झाली .मूळात ही मूळमाया ही सूक्ष्म कल्पना ,अष्टधा प्रकृतीच्या रूपाने फाफावली ,विस्तार पावली ,दृश्य विश्व निर्माण झाले .चार खाणी,चार वाणी ,८४ क्ष जीवयोनी निर्माण झाल्या .
अशा प्रकारे सृष्टीची उभारणी सांगुन झाल्यावर श्रीसमर्थ संहारणी सांगतात :
शत वरुषे अनावृष्टीतेथे आटेल जीवसृष्टीऐशा कल्पांताच्या गोष्टीशास्त्री निरोपिल्या । । ११--१३ । ।
बाराकळी तपे सूर्यतेणे पृथ्वीची रक्षा होयेमग ते रक्षा विरोन जायेजळांतरी । । ११- -१४ । ।
ते जळ शोषी वैश्वानरूवन्ही झडपी समीरूसमीर वितुळे निराकारूजैसे तैसे । । ११--१५ । ।
शंभर वर्षे पाऊस पडल्यामुळे पृथ्वी वरील सर्व जीवांचा नाश होइल .बारा प्रकाराच्या किरणांनी सूर्य तापेल .पृथ्वी जळून राख होइल .राख पाण्यात विरघळेल.अग्नी पाणी शोषेल.अग्नीला वायू विझवेल.वायू नाहीसा
होइल .निराकार ब्रह्म शिल्लक राहील .

Thursday, June 10, 2010

पुढील भाग शंका समाधान भाग २ मध्ये पहा

प्रपंच व परमार्थात प्रचितीचे महत्त्व कोणते ?

प्रपंच परमार्थात ज्ञानाची लक्षणे सारखीच असतात .त्यांची प्रचिती महत्वाची असते .प्रपंचात जे ज्ञान असते ते इंद्रिय गोचर असते .त्यामुळे ते पारखून घेता येते .त्याची प्रत्यक्ष प्रचिती घेता येते .उदा:बीज उगवेलेसे पहावेतरी मग द्रव्य घालून घ्यावे .बी उगवते असे पाहून मग द्रव्य खर्च करून ते घ्यावे .देहाला झालेला रोग अमुक एक मात्रेने बरा होतो असा अनुभव आला ती मात्रा घेता येते .एखादा किमयागार लोखंडाचे सोने करून देतो म्हणाला तरी त्याच्या विद्येचा प्रत्यक्ष अनुभव नसताना त्याला काही देऊ नये नाही तर तो हातोहात फसवतो.नीट चौकशी केल्याशिवाय जर काम अंगावर घेतले ,तर काम तडिला जात नाही .तर उलट आपल्या जिवीताला धोका पोचण्याची शक्यता असते .रोग्याला औषध देण्याची सवय नसलेला वैद्य आणला तर तो रोगी दगावतोच.समर्थ म्हणतात :
दिवाळखोराचा मांडपाहाता वैभव दिसे उदंडपरी ते अवघे थोतांडभंड पुढे । । १०--१५ । ।
एखादा दिवाळखोर असा बडेजाव दाखवतो की त्यापाशी खूप दौलत आहे पण त्याचा बडेजाव थोतांड असते .पुढे त्याची फजिती होते .ही सर्व उदाहरणे समर्थांनी प्रपंचातली दिली .आता परमार्थातल्या प्रचिती विषयी सांगतात :
तैसे प्रचितीवीण ज्ञानतेथे नाही समाधानकरून बहुतांचा अनुमानअन्हीत जाले । । १०--१६ । ।
ज्या पुरुषाला स्वानुभव नसतो ,त्याचे ज्ञान थोतांड असते .त्याचे ज्ञान शाब्दिक असते प्रत्यक्ष प्रचिती त्याला आलेली नसते .त्यामुळे तो स्वत :चे दुस-याचे हीत करू शकत नाही .परमार्थात आत्मप्रचिती आलेली कशी
ओळखावी ते समर्थ सांगतात :
पापाची खंडणा जालीजन्मयातना चुकलीऐसी स्वये प्रचित आलीम्हणिजे बरे । । १०--२१ । ।
परमेश्वरास वोळखिलेआपण कोणसें कळलेआत्मनिवेदन जालेम्हणिजे बरे । । १०--२२ । ।
ब्रह्मांड कोणे केलेकासयाचे उभारलेमुख्य कर्त्यास वोळखिलेम्हणिजे बरे । । १०--२३ । ।
पाप नाश पावले ,जन्मास येऊन यातना भोगणे थांबले असा प्रत्यक्ष अनुभव आला की आत्मज्ञान
झाले .परमेश्वराची ओळख झाली ,खरा मी कोण कळले ,संपूर्ण शरणागती साधता आली की आत्मज्ञान झाले .विश्व कोणी निर्माण केले ,ते कशाचे आहे ,त्या विश्वाचा खरा कर्ता कोण हे कळले की आत्मज्ञान झाले .हीच परमार्थातील प्रचिती !

Wednesday, June 9, 2010

निष्काम सगुणोंपासना का करावी ?

अनेक पुरश्चरणे करणे,अनेक तीर्थ हिंडणे,प्रबळ वैराग्य धारण करणे ,अशा अनेक प्रकारच्या शक्ती अंगी
बाणणे ,म्हणजे पुण्यमार्ग अवलंबणे असे समर्थ म्हणतात .मी आत्मस्वरूप आहे अशा निश्चयाने ज्ञानमार्ग साधतो सामर्थ्यही चढते,पण एक सद्गुरु किंवा देव या दोघांपैकी एकावर संपूर्ण निष्ठा असायला हवी.एखाद्याला निर्गुणाचा अनुभव आला म्हणून सगुणाची उपासना सोडली म्हणजे सद्गुरुची किंवा देवाची उपासना सोडली तर निर्गुणही स्वाधीन होत नाही आणि सगुणही हाताशी लागत नाही .
नाही भक्ती नाही ज्ञानमध्येच पैसावला अभिमानम्हणौनिया जपध्यानसांडूच नये। । १०--१७ । ।
भक्ती नसेल तर ज्ञानही नसते पण अभिमान मात्र येतो .म्हणून समर्थ सांगतात की जप ध्यान सोडू नये .
सांडील सगुणभजनासीजरी तो ज्ञाता परी तो अपेसीम्हणौनिया सगुण भजनासीसांडूचि नये । । १०- -१८

जो आत्मज्ञानी सगुणाची उपासना सोडतो ,तो ज्ञानी पण अपयशी ठरतो .म्हणून सगुणाची उपासना सोडू नये .जो कोणी ज्ञानाची ,कलेची ,विद्येची ,विज्ञानाची ,भगवंताची उपासना निष्काम भावनेने करू लागतो तेव्हा ती उपासना शुध्द पवित्र बनते.तिच्यात सामर्थ्य उत्पन्न होते .तेव्हाच ते जगाच्या उध्दारासाठी उपयोगी पडते.ज्ञाता ज्यावेळेस उपासना करत नाही तेव्हा त्याच्या जवळ सामर्थ्य निर्माण होत नाही .म्हणून समर्थ म्हणतात :
नि :काम बुध्दीचिया भजनात्रैलोकी नाही तुळणासमर्थेविण घडेनानि ;काम भजन । । १०- -१९ । ।
कामनेने फळ घडेनि :काम भजने भगवंत जोडेफळ भगवंता कोणीकडेमहदानंतर । । १०--२० । ।
निष्काम बुध्दीने म्हणजे अपेक्षा ठेवता जेव्हा भगवंताची उपासना घडते ती अनमोल असते .तिची बरोबरी कोणी करू शकत नाही .समर्थेविण घडेनायाचा अर्थ प्रबळ आत्मबळ असणारी व्यक्तीच फक्त नि :काम भजन ,
नि :स्वार्थी भजन करू शकते .
आपेक्षा ठेवून उपासना केली तर अपेक्षा पूर्ण होते पण आपेक्षा ठेवता उपासना केली तर प्रत्यक्ष भगवंताची गाठ पडते .भगवंत आपलासा होतो .पण आपेक्षा पूर्ण होणे प्रत्यक्ष भगवंताची प्राप्ती यात खूपच फरक आहे .
नाना फळे देवापासीआणि फळ अंतरी भगवंतासीयाकारणे परमेश्वरासीनि :काम भजावे । । १०- -२१ । ।
आपल्या आपेक्षा ,वासना पूर्ण करण्याचे सामर्थ्य भगवंताकडे असते .पण आपण भगवंताकडे काही मागता कामा नये कारण आपले मागणे पूर्ण होते पण भगवंत आपल्या पासून दूर जातो .नि :काम उपासनेने कोणते फळ मिळते ते समर्थ सांगतात ;
नि :काम भजनाचे फळ आगळेसामर्थ्य चढे मर्यादेवेगळेतेथे बापुडी फळेकोणीकडे । । १०--२२ । ।
भक्ते जे मनी धरावेते देवे आपणचि करावेतेथे वेगळे भावावेनलगे कदा । । १०--२३ । ।
दोनी सामर्थ्ये येक होताकाळास नाटोपे सर्वथातेथे इतरांची कोण कथाकीटक न्याये। । १०--२४ । ।
म्हणो नि :काम भजनवरी विशेष ब्रह्मज्ञानतयास तुळिता त्रिभुवनउणे वाटे। । १०--२५ । ।
नि :काम उपासकाच्या अंगी अमर्याद सामर्थ्य असते .त्यामुळे तो वाटेल ते करू शकतो .भक्ताच्या मनात आलेला कोणताही संकल्प भगवंत आपण सिध्दीला नेतो .आत्मज्ञान भगवंताची भक्ती या दोन गोष्टी मिळून ज्ञानी भक्ता पुढे काळही काही करू शकत नाही .म्हणजे निष्काम उपासना ब्रह्मज्ञान असा योग जेव्हा एखाद्या ज्ञात्यामध्ये असतो तेव्हा त्रिभुवन उणे पडते .त्याचा प्रताप ,यश ,कीर्ती दिवसां दिवस वाढत जातात .