Thursday, May 5, 2011

देहाची ३२ तत्वे

पिंडाची ३२ तत्व

शिष्यांनी समर्थांना पिंडातील ३२ तत्व समजावून सांगण्याची कृपा करावी असे सांगीतले तेव्हा समर्थ सागतात

देह

स्थूल

सूक्ष्म

कारण

महाकारण

अवस्था

जागृती

स्वप्न

सुषुप्ती

तुरीया

अभिमान

विश्व

तैजस

प्राज्ञ

प्रत्यगात्मा

अभिमानाचे स्थान

नेत्र

कंठ

हृदय

टाळू

भोग

स्थूल भोग

प्रविविक्त

आनंदभोग

आनंदावभास भोग

मात्रा

अकार

उकार

मकार

अर्धमात्रा

गुण

तमोगुण

रजोगुण

सत्वगुण

शुध्द सत्व गुण

शक्ती

क्रिया

द्रव्य

ईच्छा

ज्ञान

ओंकार हा विश्वातला पहिला नाद ,पहिला आकार ,पहिला प्रकाश ,पहिले ईश्वराचे प्रतिक आहे ओंकाराला चार पाद आहेत .अ ,उ ,मं आणि अनुस्वार .ओंकाराच्या या चार पादावरून चार देहाचे स्पष्टीकरण देता येते .ओंकाराचा पहिला पाद ही मानवाच्या स्थूल देहाची जागृती ही अवस्था आहे .

जागृतीचे सांसारिक व पारमार्थिक असे दोन प्रकार आहेत सांसारिक जागृतीत माणूस स्वत: खेरीज अन्य सर्व गोष्टींसाठी सतत जागृत असतो .स्वत; विषयी मात्र तो पूर्ण झोपलेला असतो .मी देह आहे एव्हडीच जागृती माणसाला असते .

त्याला पारमार्थिक जागृती म्हणजे मी कोण ? मी येथे कशासाठी आलो ?माझे ध्येय काय ? याची जागृती असणे .ती माणसाला नसते .

ओंकाराचा दुसरा पाद ही मानवाच्या सूक्ष्म देहाची स्वप्न ही अवस्था आहे .या अवस्थेत ईद्रीयांचे व्यापार थांबलेले असतात .मन फक्त जागे असते .वासनांच्या मुळे ऐकलेले ,पाहिलेले ,अनुभवलेले सगळे स्वप्नात पाहिले जाते .

ओंकाराचा तिसरा पाद म्हणजे कारण देहाची सुषुप्ती ही अवस्था .यात ईद्रीयांबरोबर मन ही शांत होते .यात कोणत्याही प्रकारची ईच्छा नसते .कोणतेही रूप ,देखावा पाहिला जात नाही .जागृती व स्वप्नावस्थेत होणारे मिथ्या ज्ञान यात होत नाही .ही पूर्ण पणे अद्न्यानाची अवस्था असते .

सांसारिक अवस्थेत जागृती उत्तम ,स्वप्न मध्यम ,व सुषुप्ती अज्ञानमय अवस्था असते .

ओंकाराचा चौथा पाद म्हणजे अनुस्वार ,किवा अर्धमात्रा म्हणजे महाकारण देहाची तुरीया अवस्था या अवस्थेत सर्व विश्वाची अवस्था गोचर होते .सर्वांच्या अंतर्यामी असणारा तुरीय इतर सर्व अवस्थांचा द्रष्टा असतो .हा तुरीय म्हणजे देहात राहणारा परमेश्वर अत्यंत सूक्ष्म असतो .त्याचे वर्णन शब्दाने करता येत नाही .म्हणून त्याला तुरीय म्हणतात .

परमेश्वर एकच पण तो तीन प्रकारे अनुभवायला मिळतो .असे स्मृती ग्रंथ म्हणतात .त्यांना आपण स्थूल ,सूक्ष्म व कारण देहाचे अभिमान म्हणतो

जेव्हा परमेश्वर बाहेरील विषयांचा ज्ञाता असतो तेव्हा त्याला विश्व अभिमान म्हणतात .तो स्थूल विषयांचा भोक्ता असतो .जागेपणी हा देह मी आहे असे म्हणणारा विश्व असतो म्हणून स्थूल देहाचा अभिमान विश्व

जेव्हा तो वासनांचा ज्ञाता असतो तेव्हा त्याला तैजस म्हणतात तो सूक्ष्म विषयांचा भोग घेतो स्वप्न पडत असणारा वावरणारा मी तो तैजस असतो . म्हणून सूक्ष्म देहाचा अभिमान तैजस

जेव्हा त्याला बाह्य व सूक्ष्म दोन्ही विषयांचे ज्ञान नसते तेव्हा त्याला प्राज्ञ म्हणतात .गाढ शांत झोपेत शांत असणारा मी म्हणजे प्राज्ञ

तुरीय अवस्थेत जो साक्षीरूप अंतरात्मा असतो तो प्रत्यगात्मा म्हणतात .

विश्वाचे स्थान नेत्र ,तैजासाचे स्थान कंठ ,प्राज्ञाचे स्थान हृदय ,प्रत्यगात्माचे स्थान टाळू होय .

भोग :

नेत्र विषय ग्रहणाचे प्रमुख स्थान आहे . विषय स्थूल असतात म्हणून स्थूल देह स्थूल भोग भोगतो .

प्रविक्त भोग हा सूक्ष्म देहाचा भोग .स्वप्नात ज्ञात्याने किंवा भोक्त्याने निवडलेला भोग असतो .आपल्या आयुष्यात घडणा-या घटना एखाद्या चित्रफिती सारख्या आपल्या मनावर कोरल्या जातात .त्याच घटना आपण स्वप्नात पाहण्यासाठी निवडतो .म्हणून त्याला प्रविक्ताभोग म्हणतात .

कारण देहात अज्ञान किंवा मिथ्यत्व नसते .तेथे ज्ञान ,सत्यता वास करते .ज्ञान आनंदघन असते .त्यामुळे जीव आनंदाचा उपभोग घेतो .म्हणून कारण देहाचा आनंद भोग असतो .

सुशुप्तीच्या पलीकडे पण परब्रह्माच्या अलीकडे आनंदमय कोशामध्ये जो आनंदाचा भोग होतो तो महाकारण देहाचा आनंदावभास भोग असतो

मात्रा :

ओंकाराच्या चार मात्रा आहेत .

अ ही मात्रा स्थूल देहाची .ती वाणीने व्याप्त असते .ही मात्रा सर्व व्यापक आहे .त्यामुळे विश्वाचे दर्शन प्रथम होते .भगवंतापासून जी वाणी प्रगट झाली ती अ या मात्रेने झाली .अकार म्हणजे जड पंचभूते .

उ ही सूक्ष्म देहाची मात्रा .सूक्ष्म देहात स्वप्नावस्थेत राहणारा तैजस त्याची ही मात्रा ! उकार म्हणजे जीवनकला !

मं ही कारण देहाची मात्रा .सुषुप्त स्थानी असणारा आत्म्याचा पाद प्राज्ञ व ओंकाराची तृतीय मात्रा एकरूप असतात .ओंकाराचे स्वरूप स्पष्ट करण्याचे व प्रापंचिक मर्यादा दाखविण्याचे काम मं ही मात्रा करते .या मात्रेने वस्तूंची उत्पत्ती ,स्थिती ,लय याबरोबर त्यांचा विनियोग व परिणामाचे ज्ञान होते .मकार म्हणजे अंत:करण

अर्धमात्रा म्हणजे अंतरात्मा ,महाकारण देहाची मात्रा म्हणजे अर्धमात्रा !

शक्ती :

स्थूल देहाची क्रिया करण्याची शक्ती असते

सूक्ष्म देहाची द्रव्य शक्ती .म्हणजे दृश्य पदार्थातील सुप्त शक्ती

कारण देहाची ईच्छा शक्ती ईच्छाशक्ती म्हणजे माणसांच्या वासनांना ताजेपणा ठेवायला लागणारी अविद्या .

महाकारण देहाची ज्ञानशक्ती .या शक्तीने मी आत्मस्वरूप आहे या अनुभवातून सामर्थ्य निर्माण होते