Wednesday, March 18, 2009

सद्शिष्य कसा असावा ?

सद् शिष्य कसा असावा ?
सद्गुरु ची लक्षणे सांगून झाल्यावर समर्थ सद् शिष्याची लक्षणे सांगतात .परमार्थात सद्गुरु सद् शिष्य यांची सांगड
होणे महत्वाचे असते कारण -
सद्गुरुविण सद् शिष्य ते वाया जाय निशेष का सद् शिष्येविण विशेष सद्गुरु शिणे - - सद् शिष्याला सद्गुरु भेटला नाही तर तो पूर्ण वाया जातो .तसेच सद्गुरुला सद् शिष्य भेटला नाही तर सद्गुरुला श्रम
होतात
.ही गोष्ष्ट स्पष्ट करण्यासाठी ते भूमीचा दृष्टांत देतात .भूमी उत्तम आहे ,पण बी किडके आहे तर पीक येत नाही ,किंवा बी उत्तम आहे पण जमीन खडकाळ आहे तरी पीक येत नाही .
सद् शिष्य ही उत्तम भूमी ,तर सद्गुरु उत्तम बी सारखा .शिष्य अनाधिकारी ,अपात्र असेल तर सद्गुरुला फुकट श्रम होतात .जेव्हा सद्गुरु सद् शिष्य एकत्र येतात तेव्हा सद्गुरूंना वाटत की हाच तो ज्याची मी वाट पाहात
होतो .रामकृष्ण परमहंसांना विवेकानंदांना पाहून असच वाटल,श्री समर्थांना कल्याण स्वामींना पाहून असेच वाटले सद्गुरु ,सद् शिष्य आहेत पण अध्यात्म निरूपण नसेल उपयोग होत नाही ,जसे पीक तयार होउन आले तरी त्याची निगा राखावी लागते .त्याप्रमाणे आत्मज्ञान झाले तरी साधन चालू ठेवावे लागते .कारण साधन नसेल तर अविद्येचा अंमल होतो .
म्हणौन साधन अभ्यास आणि सद्गुरुसद् शिष्य आणि सद्शास्त्र विचारू
सत्कर्म सद्वासना पारूपाववी भवाचा । । समर्थ म्हणतात ,'साधन ,अभ्यास ,सद्गुरु ,सद् शिष्य ,सद्शास्त्र विचार सत्कर्म सद्वासना या सर्व गोष्टी एकत्र असतील तरच भवसागर पार करून जाता येइल .
आता समर्थ सद् शिष्याचे लक्षण सांगत आहेत ,
मुख्य सद् शिष्याचे लक्षणसद्गुरुवचनी विश्वास पूर्णअनन्य भावे शरणया नाव सद् शिष्य । । - -१९ । ।
सद्गुरु वचनावर पूर्ण विश्वास , सद्गुरुला अनन्य भावे शरण जाणे ही सद् शिष्याची लक्षणे आहेत .कल्याण स्वामी सारखे शिष्य सद्गुरुंच्या केवळ 'कल्याणा छाटी उडाली 'या शब्दाखातर उंच कड्यावरून छाटी पकडण्यासाठी उडी घेतो तेव्हा तो जीवाचा विचार करत नाही ,सद्गुरूंनी सांगितले ते करायचे एव्हडेच त्याला माहीत !
सद् शिष्य कसा असावा ?
शिष्य निर्मल अंत :करणाचा ,आचारशील-आचाराने शुद्ध ,शुद्ध चारित्र्याचा ,विरक्त-हवे नको पण संपलेला , अनुतापी-झालेल्या चुकांबद्दल पश्चाताप वाटून त्या चुका पुन्हा करणारा ,निष्ठावंत-सद्गुरु वचनावर पूर्ण विश्वास ठेवणारा ,सुचिश्मंत -ज्याची मती म्हणजे बुध्दी अतिशय शुद्ध आहे असा ,नेमस्त -नित्य नेम पाळणारा,साक्षपी -प्रयत्न करणारा ,परम दक्ष-अतिशय सावध ,अलक्षी लक्षी -अतींद्रिय वस्तूवर लक्ष केंद्रित करण्याचे मनोबल असणारा ,परोपकारी-दुस-याला मदत करणारा ,निर्मत्सरी-कोणाचाही मत्सर ,द्वेष करणारा ,अर्थांतरी प्रवेशकर्ता -ग्रंथाचा अभ्यास करताना शब्दार्थाच्या अंरंगात शिरणारा ,नीतिवंत -चांगल्या वाईटाचा विचार करणारा ,युक्तिमंत -हिकमती ,बुध्दीमंत -बुध्दीमान् ,सद्विद्येचा -उत्तम लक्षणांचा ,निर्लोभी ,निराभिमानी ,अनासक्त अशा गुणानी युक्त असावा .
सद् शिष्य कसा नसावा ?
अविवेकी नसावा ,गर्भश्रीमंत नसावा ,अविश्वासी नसावा .कारण -
अविश्वासे कास सोडिलीऐसी बहुतेक भवी बुडालीनाना जळचरे तोडिलीमध्येच सुख दु:खे । । - -३७ । ।
या कारणे दृढ़ विश्वासतोचि जाणावा सद् शिष्यमोक्षाधिकारी विशेषआग्रगण्यु। । - -३८ । ।

No comments: