Friday, March 19, 2010

मूळमाया

मूळमायेला कसे जाणावे ?
आकाश असता निश्चळमध्ये वायो जाला चंचळतैसी जाणावी केवळमूळमाया। । - -२७ । ।
आकाश निश्चल आहे .त्यात चंचळ वायू उत्पन्न झाला ,हालणारा वायू उत्पन्न झाला तरी आकाश हालता जसेच्या तसे राहते .त्याप्रमाणे निराकार ,निश्चळ परब्रह्मात मूळमाया उत्पन्न झाली .वायू उत्पन्न झाल्यामुळे ज्याप्रमाणे आकाशाला तडा जात नाही त्याप्रमाणे मूळमाया उत्पन्न झाली तरी परब्रह्माच्या निर्गुणपणात आजिबात भंग होत नाही .समर्थ म्हणतात :
वायू नव्हता पुरातनतैसी मूळमाया जाणसाच म्हणता पुन्हा लींहोतसे । । - -३० । ।
वायो रूपे कैसा आहेतैसी मूळमाया पाहेभासे परी ते लाहेरूप तयेचे । । - -३१ । ।
वायो सत्य म्हणो जातापरी तो ये दाखवितातयाकडे पाहों जाताधुळीच दिसे । । - -३२ । ।
तैसी मूळमाया भासेभासे परी ते दिसेपुढे विस्तारली असेमाया अविद्या । । - -३३ । ।
ज्याप्रमाणे आकाशा एवढा वायू पुरातन नाही त्याप्रमाणे परब्रह्माप्रमाणे मूळमाया सनातन नाही .वायू जसा आकाशात लीन होतो त्याप्रमाणे मूळमाया परब्रह्मात लीन होते .म्हणून उत्पन्न होणारी लीन होणारी मूळमाया खरी नाही .वायू वाहू लागला की त्याचे अस्तित्व जाणवते पण त्याला रूप नाही त्याप्रमाणे मूळमाया कतृत्वाने आहे असे कळते पण दाखवता येत नाही .समर्थ सांगतात :
जैसे वायोचेनि योगेदृश्य उडे गगन मार्गेमूळमायेच्या संयोगेतैसे जग । । - -३४ । ।
गगनी आभाळ नाथिलेअकस्मात् उदभवलेमायेचेनि गुने जालेतैसे जग । । - -३५ । ।
ज्याप्रमाणे वायूच्या वाहण्याने दृश्य वस्तू उडतात ,त्याप्रमाणे मूळमायेच्या योगाने निर्गुण परब्रह्मात दृश्य विश्व दिसते .अदृश्य ,निराकार ,निर्गुण परब्रह्मात उत्पन्न झालेली मूळमाया त्याच सदवस्तूला दृश्य साकार सगुण स्थूल पदार्थाच्या रूपाने दाखवते .स्वच्छ आकाशात ज्याप्रमाणे एकाएकी ढग येतात त्याप्रमाणे परब्रह्मात मूळमायेमुळे दृश्य जग भासते .आकाशात ढग आल्यावर आकाशाची निश्चळता भंगली असे वाटते पण त्याची निश्चळता अभंग असते ,तशी मूळमाया प्रगट झाल्यावर निर्गुण परब्रह्म सगुण साकार झाल्यासारखे वाटते पण तो भास
असतो .ब्रह्माच्या ठिकाणी अहं अशी जी स्फूर्ती होते ती माया !ज्याप्रमाणे माणसाची नजर चंचल झाली तर आकाशातील ढगात सैन्यही दिसते पण ते आकाशातील आभाळ आहे हे कळल्यावर सगळेच खोटे असे
कळते ,त्याप्रमाणे मायेचा खेळ मिथ्या असतो .
तत्वे मुळीच आहेतीवोंकार वायोची गतीतेथीचा अर्थ जाणतीक्ष ज्ञानी । । - -५५ । ।
अहं ही मूळ स्फूर्ती हे वायूरूप असते .तोच ओंकार असतो .त्यात पंचमहाभूते बीजरूपाने असतात .
मूळमायेचे चळणतोचि वायोचे क्षसूक्ष्म तत्वे तेचि जाणजडत्वा पावली । । - -५६ । ।
निश्चल ब्रह्मातील हालचाल म्हणजे मूळमाया !ते चळण शक्तीरूप आहे .शक्ती हे वायोचे क्ष आहे .या वायूच्या शक्तीमुळे सूक्ष्म तत्वे स्थूलरूप घेतात .

1 comment:

Anonymous said...

Suvarnaji...Namaste.
Marathimadhe itka sundar blog aani vishay anyatra nasel. Phar chan.
Avadle.
SHARAD.