Thursday, February 5, 2009

नाम स्मरण भक्ती

नाम स्मरण भक्ती
नाम म्हणजे खूण,संकेत ! राम म्हणजे आत्मशक्ती,चेतना ! तिचा बोध ज्यामुळे होतो त्याची खूण म्हणजे
रामनाम !
प्रा.के .वि .बेलसरे म्हणतात ,'नाम म्हणजे दृष्याला द्रुश्यपणे धारण करणारी परमात्मशक्ती! म्हणून नाम हे मूर्त
अमूर्त ह्यांना जोडणारी साखळी आहे .नामस्मरण म्हणजे आपण ज्याचे नाम घेतो तोच खरा आहे त्याच्या सत्तेने
सगळे घडते आहे ही जाणीव जागी राहणे' समर्थ म्हणतात -
स्मरण देवाचे करावे अखंड नाम जपत जावे नामस्मरणे पावावे समाधान । । - -
गोंदवलेकर महाराज म्हणतात ,'नाम कुठवर घ्यावे ?अक्षश: जीव जाईपर्यंत ,मी पणाने मरेपर्यंत नाम घेत
सुटावे .शेवटी मी जातो नाम शिल्लक राहते
नाम का घ्यायचे ?
नाम घ्यायचे दोन कारणांसाठी : .प्रपंचाचे स्वरुप कळण्यासाठी .भगवंताच्या प्राप्तीसाठी.प्रपंचाची आसक्ती कमी
करण्यासाठी .नाम घेण्याने भगवंताच्या इच्छेने घडायाचे ते घडते असे मानणे सोपे जाते .त्यासाठी
चालता बोलता धंदा करिताखाता जेविता सुखी होतानाना उपभोग भोगितानाम विसरो नये। । - - । ।
संपत्ति अथवा विपत्तिजैसी पडेल काळगतीनामस्मरणाची स्थितीसोडूचि नये । । - - । ।
नामस्मरण केव्हा करावे ?
नित्य नेम प्रात:काळीमाध्यान्ह काळी सायंकाळीनामस्मरण सर्वकाळकरीत जावे । । - - । ।
सुखात ,दु:खात ,चिंतेत असताना ,आनंदात असताना ,संकटात ,चांगल्या परिस्थितीत ,वैभवात,कुस्थितित सदा सर्वदा नाम घ्यावे .कोणत्याही स्थितीत नाम सोडू नये .नामाने संकटे दूर जातात ,याचा अर्थ संकटे येतात पण ती
सहन करण्याची शक्ती येते
नाम कोणी घ्यावे ?
चहू वर्णा नामाधिकारनामी नाही लहानथोरजड़ मूढ़ पैलपारपावती नामे । । - -२४ । ।
नाम कोणीही घ्यावे ,कोणत्याही जातीचा ,धर्माचा असला तरी त्याला नामाचा अधिकार आहे .नामाने जड़ ,मूर्ख
असला तरी तो शहाणा होतो .पैलपार होतो .म्हणून समर्थ म्हणतात ,
म्हणौन नाम अखंड स्मरावेरूप मनी आठवावेतीसरी भक्ती स्वभावेनिरोपिली । । - -२५ । ।
जप माळेत १०८ मणी का असतात ?
२४ तासात २१६०० श्वास होतात .दिवसा १०८०० रात्री १०८०० .नैसर्गिक रित्या आपल्या श्वासाबरोबर सोहं चा जप
चालू असतो .नैसर्गिक जपाच्या एक शतांश जरी जप साधला तर धन्य समजावे १०८०० /१०० =१०८ या हिशोबाने
१०८ मण्याची जपमाळ तैयार केली जाते
समर्थ नामस्मरणावर लिहिलेल्या अभंगात म्हणतात ,
रात्रंदिवस मन राघवी असावेचिंतन नसावे कांचनाचे
कांचनाचे ध्यान परस्त्री चिंतनजन्मासी कारण ही ची दोन्ही
दोन्ही नको धरू नको निंदा करूतेणे हा संसारू तरसील
तरसील भवसागरी बुडतासत्य या अनंताची नामे
नामरूपातीत जाणावा अनंतदास म्हणे संत संग धरा । ।

No comments: