Thursday, February 19, 2009

वंदन भक्ती

वंदन भक्ती
वंदन म्हणजे नमस्कार करणे,लीन होणे ,शरण जाणे ! देहाचा अभिमान जावा म्हणून वंदन भक्ती !वंदन भक्तीत नम्रता
येते .आपल्या भोवती वावरणा-या सर्व जीवांमध्ये ,अंतर्यामी वास करणारा भगवंत पाहता येतो .नमस्कार करताना हे वंदन त्याच्या बाह्यांगाला नसून अंतरंगातील अनंताला आहे .हे भान जेव्हा येते तेव्हा वंदन भक्ती साधते .तेव्हा देहाभिमान गलित होतो .
वंदन कोणाला करावे ?
सहावी भक्ती ते वंदनकरावे देवासी नमनसंत साधू आणि सज्जननमस्कारीत जावे । । - - । ।
सूर्यासि करावे नमस्कारदेवासि करावे नमस्कारसद्गुरुसि करावे नमस्कारसाष्टांगभावे । । - - । ।
साष्टांग नमस्कारास अधिकारूनाना प्रतिमा देवगुरुअन्यत्र नमनाचा विचारूअधिकारे करावा । । - - । ।
भक्त ज्ञानी वीतरागीमहानुभाव तापसी योगीसत्पात्रे देखोनी वेगीनमस्कार घालावे । । - - । ।
नमस्काराने काय लाभ होतो ?
नमस्कारे लीनता घडेनमस्कारे विकल्प मोडेनमस्कारे सख्य घडेनाना सत्पात्रासी । । - - १४ । ।
नमस्कारे दोष जातीनमस्कारे अन्याय क्ष्मतीनमस्कारे मोडली जडतीसमाधाने। । - -१५ । ।
नमस्कारे कृपा उचंबळेनमस्कारे प्रसन्नता प्रबळेनमस्कारे गुरुदेव वोळेसाधकांवरी। । - -१६ । ।
निशेष करिता नमस्कारनासती दोषांचे गिरिवरआणि मुख्य परमेश्वरकृपा करी । । - -१८ । ।
नमस्कारे पतित पावननमस्कारे संतासी शरणनमस्कारे जन्ममरणदूरी दुरावे । । - -१९ । ।
नमस्कार मोठे साधन का ?
नमस्कारास वेचावे लगेनमस्कारास कष्टावे लगेनमस्कारास काहीच लगेउपकर्ण सामुग्री।।--२२
नमस्कारा ऐसे नाही सोपेनमस्कार करावा अनन्य रूपेनाना साधनी आक्षेपेकासया सिणावे। । -- २३ । ।
साधक भावे नमस्कार घालीत्याची चिंता साधूस लागलीसुगम पंथे नेउन घालीजेथील तेथे । । - -२४
साधूला साधकाने नमस्कार करताना साधकाच्या डोळ्यातील भाव स्पष्ट दिसतो .साधक पूर्ण भावाने सद्गुरूंना शरण जातो तेव्हा त्याच्यावर सद्गुरूंना कृपा करावीच लागते
समर्थ अभंगात म्हणतात :
प्रेमाचिया सान्निधानेदेव आले साभिमानेआता आनंद आनंददेव भक्ता नाही भेद
मुख्य पूजा परंपराकेला दासासि अधिकारादास पाऊल वंदितोपदासन्निध रहातो । ।

No comments: