Friday, February 6, 2009

पादसेवन भक्ती

पादसेवन भक्ती
पादसेवन तेचि जाणावे काया वाचा मनोभावे सद्गुरूचे पाय सेवावे सद्गतिकारणे --
पादसेवन कायेने करायचे म्हणजे शरीराने सद्गुरूची सेवा करायची ,वाचेने सद्गुरूने दिलेला मंत्र जपायचा ,मनाने सद्गुरूने केलेल्या उपदेशाचे चिंतन करायचे ,तो उपदेश आचरणात आणायचा .सद्गुरुची सेवा म्हणजे त्याने दाखवलेल्या मार्गाने जावून आपले जीवन भगवद कृपेला पात्र करणे.कारण सद्गुरूच परमात्म वस्तू दाखवतो आत्मसाक्षात्कार करून देतो .आत्मज्ञान अतिशय गुह्य आहे ,गुप्त आहे ,ते इंद्रियांना समजत नाही .त्यासाठी गुरूंना शरण जावून सात गोष्टी करायला समर्थ सांगतात ,
संगत्याग आणि निवेदन विदेहस्थिती अलिप्तपण सहजस्थिती उन्मनी विज्ञान हे सप्तही एकरूप।।--
संगत्याग म्हणजे देह्बुध्दीला बाजूला सारणे,मी देह आहे ,मी सर्व करतो ,ही भावना संपवणे,देह प्रपंच, मुले पत्नी धन ,हे सगळ माझ आहे ही भावना मनातून संपवून टाकायची .मीपणाचा त्याग करायचा .
निवेदन माणूस अंहकार रूपी मन ,बुध्दी ,इंद्रिय यांचे गाठोडे आहे .तो मी भगवंताच्या चरणी नाहीसा करणे म्हणजे निवेदन .भगवंताची इच्छा तीच माझी इच्छा असे समजणे,मी भगवन्तापेक्षा वेगळा आहे असे समजणे म्हणजे निवेदन
विदेहस्थिती वि म्हणजे अभाव ,मी देह आहे या अवस्थेचा अभाव म्हणजे विदेहस्थिती .देहात राहून देह नसल्या सारखी वृत्ती ठेवणे ,पुष्कळ कर्म करून काहीच केल्यासारखी अवस्था सांभाणे म्हणजे विदेहस्थिती .अशा अवस्थेत मी देह नाही ,ब्रह्म स्वरुप आहे असा प्रत्यक्ष अनुभव असतो .ब्रह्म स्वरुप झाल्याने तो पूर्ण संदेह रहित असतो .त्याला ना साधनाचे भान असते ना देहाचे .
अलिप्तपण विवेके अंतरी सुटलावैराग्ये प्रपंच तुटलाअंतर बाह्य मोकळा झालानि :संग योगी । ।१२ - -१२।। विवेकाने तो सुटला असतो म्हणजे त्याला त्याचे खरे स्वरुप कळालेले असते ,मी कोण हे समजलेले असते,
त्यामुळे तो देहबुध्दीने लिप्त नसतो .बोले तैसा चाले असे त्याचे वागणे असते.
सहजस्थिती ऐक्यरूपे अभिन्नसहजस्थिती । । आपण आणि आत्मा अभिन्न आहोत या अनुभवाने सहजस्थिती प्राप्त होते .या अवस्थेत देहाचे सर्व व्यवहार होतात पण स्वरूपाशी झालेले ऐक्य तसेच्या तसेच रहाते.सदा सर्व काळ ब्रह्म भावात असणे म्हणजे सहजस्थिती .
उन्मनी मी पण नाहीसे होते ,आत्मानात्म विवेकाने परब्रह्माशी असलेल वेगळेपण नाहीसे होते .वृती विरहित अवस्था येऊन उन्मनी अवस्था येते .
विज्ञान जेथे अज्ञान सरेज्ञान तेही नुरेविज्ञान वृत्ति मुरेपरब्रह्मी । । - -५१ । ।
वस्तूचे यथार्थ स्वरुप कळणे म्हणजे अज्ञान .वस्तूचे यथार्थ स्वरुप कळणे म्हणजे ज्ञान .ज्ञान रूपी जाणीव सुध्दा मागे राहते त्यावेळेस स्वरुप साक्षात्कार होतो .मी आत्माच आहे असा अनुभव येतो त्याला विज्ञान म्हणतात .
देव ब्राह्मण ब्रह्मज्ञानी संत ,सात्विक सज्जन या सेवेला योग्य आहेत
पादसेवन चौथी भक्तीपावन करीतसे त्रिजगती
जयेकरिता सायोज्य मुक्तीसाधाकास होये। । - -२५ । ।

No comments: