Sunday, February 22, 2009

सख्यभक्ती

सख्य भक्ती
प्रा.के .वि .बेलसरे म्हणतात ,'भगवंताची अनुरक्ती +देह्सुखाची विरक्ती +प्राणिमात्रांबद्दल करुणावृत्ती =सख्यभक्ती
भक्ताच्या प्रेमाने पवित्र झालेला आपलेपणा भगवंताचा मंगलमय मित्रपणा यांचा मधुर संगम सख्यभक्तीत दिसतो. यात भगवंताची इच्छा तोच धर्म मानला जातो .तेच शास्त्र ,तेच कर्तव्य तोच व्यवहार होतो .भगवंताच्या अखंड सानिध्यात राहणारा भक्त सखा सर्व जीवांचा मित्र होतो .लोभ ,मोह ,योग ,त्याग ,संग्रह ,सुख ,दुःख : हे काहीच त्याच्या त्या अवस्थेत तो अनुभवत नाही जगाचे मंगल करीत तो जीवन जगतो .
समर्थ सख्य भक्तीची व्याख्या करतात :
देवासी परम सख्य करावेप्रेम प्रीतीने बांधावेआठवे भक्तीचे जाणावेलक्षण ऐसे । । - - । ।
देवाशी सख्य केव्हा घडते ?
देवास जयाची अत्यंत प्रीतिआपण वर्तावे येणे रितीयेणे करिता भगवंतीसख्य घडावे नेमस्त । ।
भगवंताला जे आवडते ते आपण करावे ,त्याप्रमाणे आपण वागावे ,म्हणजे भगवंताशी सख्य घडते
भगवंताला काय आवडते ?
भक्ती भाव भजननिरूपण आणि कथाकीर्तनप्रेमळ भक्तांचे गायनआवडे देवा - - । ।
भगवंताला भक्ती आवडते .भक्ती म्हणजे काय ते आपण आधी पाहिले आहे .परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल नि:शंक असणे हा भाव ! ईश्वर आहे ही जाणीव ठेवून ,ही भावना जागृत ठेवून वागणे हा भावार्थ ! भाव असला की ईश्वराच्या अस्तित्वाची खूण पटलेली असते .भावार्थ असला की आचार विचार उच्चार यात ईश्वराच्या अस्तित्वाचे प्रतिबिंब दिसते
जैसा भाव जयापासीतैसा भाव तयासीजाणे भाव अंतरसाक्षीप्राणीमात्रांचा। । ज्याप्रमाणे भाव महत्वाचा आहे त्याप्रमाणे देवाच्या सख्यत्वासाठी काहीही करायची तयारी हवी.
देवाच्या सख्यत्वासाठीपडाव्या जिवलगांच्या तुटीसर्व अर्पावे सेवटीप्राण तोही वेचावा । । - - । ।
आपुले अवघेचि जावेपरी देवासि सख्य रहावेऐसी प्रीति जीवेभावेभगवंती लागावी । । - - । ।
देव म्हणिजे आपुला प्राणप्राणासि करावे निर्वाणपरम प्रीतिचे लक्षणते हे ऐसे असे । । - -१० । ।
जेव्हा भक्त भगवंताशी अनन्य होतो ,त्याच्या बद्दल भक्तांच्या मनात प्रेम दाटून येते ,देवाशी सख्य जोडले तर देवाला भक्ताची काळजी वाटते .लाक्षागृहातून पांवांना भगवंतानी सुरक्षित बाहेर काढले
त्यासाठी काय करावे ते समर्थ सांगतात :
सखा मानावा भगवंतमाता पिता गणगोतविद्या लक्ष्मी धन वित्तसकळ परमात्मा । । - -१८ । ।
सख्यत्व होते तेव्हा काय होते ?
देव भक्तांचा कैवारीदेव पतितांसी तारीदेव होय साहाकारीअनाथांचा । । - -२६। ।
देव कृपेचा सागरुदेव करूणेचा जळधरूदेवासि भक्तांचा विसरूपडणार नाही । । - -२८ । ।
म्हणोनि सख्य देवासि करावेहितगुज तयासि सांगावेआठवे भक्तीचे जाणावेलक्षण ऐसे । । - -३१ । ।
सख्य भक्ती झाली की भगवंतालाच भक्ताशिवाय करमत नाही .कबीर म्हणतो :
मनवा तो मरही गयोदुर्बल भयो शरीरपीछे फिरत प्रभूरामकहत कबीर कबीर

No comments: