अर्चन भक्ती
पाचवी भक्ती ते आर्चन । आर्चन म्हणिजे देवतार्चन । शास्त्रोक्त पूजाविधान । केले पाहिजे । । ४ -५ -२ । ।
आपल्या उपास्यदेवतेची पूजा करणे याला अर्चन म्हणतात .ज्याच्यावर आपले प्रेम असते त्याचा आपण सत्कार करतो ,पूजा करतो हेच अर्चन भक्ती चे मूळ आहे .जे जे काही उत्तम ,सुंदर ,पवित्र आहे ते ते भगवंताला अर्पण करणे हे अर्चन भक्तीचे प्रधान लक्षण आहे .
अर्चनाचे दोन प्रकार असतात .१ स्थूल २ सूक्ष्म
स्थूल अर्चनात उपास्य देवता निश्चित केली जाते .सद्गुरू सुध्दा उपास्यदेवता होऊ शकते .देवतेची मूर्ती किंवा तसबीर असावी. तिला रोज स्नान घालावे ,उत्तम वस्त्र ,चंदन ,सुगंधी द्रव्ये ,फुले वहावी ,तिला सुग्रास नैवेद्य दाखवून आरती करावी मनापासून साष्टांग नमस्कार करून प्रेमदृष्टीने तिच्याकडे पहावे .
सूक्ष्म अर्चनात समर्थ मानसपूजा करायला सांगतात .यात आपली उपास्यदेवता किंवा सद्गुरू आपल्या ह्रुदयात आहे अशी कल्पना करावी. ती मूर्ती सजीव कल्पून स्थूल मूर्तीला किंवा तसबिरीला जे जे उपचार करतो ते ते करावे. पूजा आटोपली की देवतेला ह्रुदयात विश्रांती द्यावी .अशा रितीने भगवंताला रोज रंगवण्याचा अभ्यास केला की मन सूक्ष्म होते .मन अमूर्तात रंगू लगते ।
देव ,ब्राह्मण ,अग्नि ,साधू ,संत ,अतिथि यति,संन्यासी ,आत्मज्ञानी ,महात्मा ,गाय ,देवांच्या मूर्ती या सगळ्याची पुजा करावी .पूजा षोडोषपचार करावी .
समर्थ पुढे म्हणतात ,
याहिवेगळे कुलधर्म । सोडू नये अनुक्रम । उत्तम अथवा मध्यम । करीत जावे । ४ -५ - १५ । ।
याशिवाय गणपती ,देवीचे नवरात्र ,बोडण,यासारखे कुलधर्म आचरीत जावे असे समर्थ सांगतात ।
अर्चन भक्तीचा समारोप करताना समर्थ म्हणतात ,
काया वाचा आणि मने । चित्ते ,वित्ते ,जीवे प्राणे। सद्भावे भगवंत आर्चने। या नाव अर्चन भक्ती । ।
व्यवहारात सत्य ,न्याय ,सद्धर्म .अहिंसा ,प्रेम अपरिग्रहः [संग्रह न करणे] या सद्गुणांचे उपयोजन करणे ही च खरी देवपूजा

1 comment:
नमस्कार.
फारच उत्तम कार्य करीत आहात आपण ! समर्थांना बदनाम करायला, आणि त्यांच्या चारित्र्यावर चिखलफेक करायला काही समाजकंटक तुटून पडले असतांना आपण करीत असलेले हे कार्य फारच मोलाचे आहे. (कृपया आपला ईमेल पत्ता मला सांगितल्यास आपणांला काही मुद्दे सांगण्याची इच्छा आहे. ते इथे पोस्ट करु शकत नाही.) मराठी देवनागरीत टंकण करायला बाराहा ७.० हे एक छान सॉफ्टवेयर आहे. दुव्यावरुन (link) ते उतरवून घेता येईल. शिवाय भारत सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या ildc.gov.in या संकेतस्थळावरही अनेक उपयोगी सॉफ्टवेयरे मोफत उपलब्ध आहेत. आपल्या महाजालाची गती (internet connectivity speed) पुरेशी नसल्यास संकेतस्थळावर नोंदणी करावी. शासनातर्फे आपल्याला सर्व सॉफ्टवेयर असलेली सीडी मोफत पाठवली जाईल. (पोस्टाचाही खर्च सरकार करते ! मी स्वतः अनुभव घेतलेला आहे.) लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण एक मत सांगतो, पहा पटतंय का. मला वैय्यक्तिकरीत्या असं वाटतं, की “मराठी” ब्लॉग वर टायटलबारवरील नावापासून ते स्वतःच्या परिचयापर्यंत सर्वच शक्यतोवर मराठीत (देवनागरी लिपीत) असावे. आपण इतकी मेहनत घेतच आहात, त्यामुळे आपल्याला हे काही अगदीच अशक्य नाही. असे केल्यामुळे आपला इतका सुंदर ब्लॉग “सर्वांगसुंदर” होईल असे आपल्याला वाटत नाही काय ? शेवटी “प्रयत्नें वाळूचे कण रगडिता. . .”
ईमेल पत्ता : ameya.1989@gmail.com
ब्लॉग : http://ameya1989.blogspot.com
Post a Comment