मागा श्रोती पुसिले होते । दृश्य मिथ्या तरी का दिसते । याचे उत्तर बोलिजेल ते । सावध ऐका। ।
६ -८ -१ । ।
दृश्य मिथ्या असून का दिसते ?या प्रश्नाचे उत्तर देताना समर्थ म्हणतात :की संताचा अनुभव खरा मानावा .संत इंद्रियांना जे दिसते ते खरे मानत नाहीत .जड,मूढ़ ,अज्ञानी जीव त्याला खरे मानतात .केवळ इन्द्रियांना दिसते ते खरे नाही हे पटविण्यासाठी समर्थ अनेक दृष्टांत देतात .
मृगे देखिले मृगजळ । तेथे धावते बरळ। जळ नव्हे मिथ्या सकळ। त्या पशूस कोणे म्हणावे । ।
६ -८ -५ । ।
रात्रौ स्वप्न देखिले । बहूत द्रव्य सांपडले । बहुत जनास वेव्हारिले । ते खरे कैसेनि मानावे । । ६ -८ -६ । । हरिण मृगजळ पाहते व पाणी आहे या समजुतीने तेथे धावते .तेथे पाणी नाही ,पाण्याचा भास् आहे हे त्याला कळत
नाही .रात्री माणसाला स्वप्न पडले .त्या स्वप्नात पुष्कळ द्रव्य सांपडले ,स्वप्नात त्याने पुष्कळ लोकांशी व्यवहार केला हे खरे प्रत्यक्ष कसे मानता येते ?मंदिराच्या दरवाज्यावर अनेक गोपुरे ,मजले असतात ,त्यावर सुंदर पुतळ्या कोरलेल्या असतात .त्यांच्या शरीरातील वाकडेपणा,नजतेताला तिरपेपणा मन मोहून टाकते.पण त्या कशाच्या आहेत याचा विचार केला तर चुना ,वाळू ताग हे पदार्थ आढळतात.
सृष्टी बहुरंगी असत्य । बहुरूपाचे हे कृत्य । तुज वाटे दृश्य सत्य । परी हे जाण अविद्या । । ६ -८ -१२ । ।
ज्या प्रमाणे एकच बहुरूपी अनेक सोंगे घेतो ,त्याने घेतलेली सोंगे मिथ्या असतात ,त्याप्रमाणे अनंत नामरूपांनी नटलेली सृष्टी मिथ्या आहे ,मुळचे एकच परमार्थ स्वरुप तेव्हडे खरे असते .दृश्य खरे असते तो अविद्येचा परिणाम असतो .आपल्या इंद्रियांनी जे दिसते ते कसे फसवे असते त्याचीही उदाहरणे समर्थ देतात .
वरी पाहता पालथे आकाश । उदकी पाहता उताणे आकाश । मध्ये चांदिण्या हि प्रकाश । परी ते अवघे मिथ्या । ।६ -८ -१४ । ।
जितके बुडबुडे उठती । तितुक्यांमध्ये रूपे दिसती । क्षणांमध्ये फूटोन जाती । रूपे मिथ्या । ।
६ -८- १७ । ।
वर पाहिले तर आकाश पालथे दिसते ,तेच आकाश पाण्यात उताणे दिसते ,या दोन्हीत चांदण्या चमकतात .पण हे सगळे मिथ्या असते .पाण्यावर पुष्कळ बुडबुडे दिसतात ,प्रत्येक बुडबुड्यात प्रतिबिंब दिसतात .बुडबुडे लगेच फुटतात .ती रूपही फुटतात .म्हणजे ती रूपे मिथ्या असतात .नदीतीराहून होडी ओझे घेऊन निघाली तर तिचे प्रतिबिंब पालथे दिसते .एखादे शस्त्र वेगाने हालवले तर दोन शस्त्रे दिसतात .दोरा ताणून वाजवला तर दोनपणे दिसतो .आरसे महालात सभा भरविली तर आरशात अनेक सभा दिसतात .असे अनेक प्रकार खरे नसून ख-या सारखे दिसतात .असे अनेक प्रकार खरे नसून ख-या सारखे वाटतात .या सर्वांचे कारण आहे माया ! माया अविद्येचे रूप घेऊन जीवाला भ्रमात पाडते .जादूगार जादूचे खेळ करतो .त्याने निर्माण केलेल्या वस्तू ख -या वाटतात ,खेळ संपल्यावर त्या वस्तू खोटया होत्या हे कळते .
साच म्हणावी तरी हे नासे । मिथ्या म्हणावी तरी हे दिसे । दोन्ही पदार्थी अविश्वासे । सांगता मन ।
६ -८ -३५ । ।
माया खरी मानावी तर ती प्रत्यक्ष नाश पावते .माया खोटी म्हणावी तर ती प्रत्यक्ष दिसते .म्हणून माया खरी आहे व माया खोटी आहे या दोंहीवर मन विश्वास ठेवत नाही .माणसाच्या मनात होणारी विचारांची गुंतागुंत होण्याचे कारण आहे अविद्या .अविद्येतूनच मी देह आहे ही देह्बुध्दी जन्म पावते .देहबुध्दीनेच दृश्य खरे वाटते .समर्थ म्हणतात :
दृष्यभास अविद्यात्मक । तुझाही देहो तदात्मक । म्हणोनी हां अविवेक । तेथे संचारला । । ६ -८ -३८ । ।
दृश्याचा पसारा अविद्येने भरलेला आहे .आपला देह अविद्येत जन्म पावतो त्यामुळे मिथ्या असलेले दृश्य सत्य आहे असा अविवेक आपल्या अंतर्यामी संचारतो .पाहणारा द्रष्टा अविद्यामय असतो ,अविद्येने निर्माण केलेले ,दृष्याला धारण करणारा सूक्ष्म देह अविद्यामय असतो .पाहिलेले दृश्यही अविद्यामय ! म्हणून अविद्यामय देह मीच आहे या भावनेने दृश्य पसारा बघितला की तो खरा वाटतो .
Wednesday, September 23, 2009
Thursday, September 17, 2009
सगुण भजन का करावे ?

ज्ञाने दृश्य मिथ्या जाले। तरी का भजन पाहिजे केले । तेणे काय प्राप्त जाले । मज निरोपावे।। ६ -७ -१। ।
ज्ञानाहूनि श्रेष्ठ असेना । तरी का पाहिजे उपासना । उपासनेने जना । काय प्राप्त । । ६ -७ -२ । ।
मुख्य सार निर्गुण । तिथे दिसेना सगुण । भजन केलियाचा गुण। मज निरोपावा । । ६ -७ -३ । ।
जे समस्त नाशिवंत । त्यासि भजावे किंनिमित्त । सत्य सांडूनि असत्य । कोणे भजावा । । ६ -७ -४ । ।
निर्गुणाने मोक्ष होतो । प्रत्यक्ष प्रत्यया येतो । सगुण काय देऊ पहातो । सांगा स्वामी । । ६ -७-६ । ।
शिष्य समर्थांना विचारतात की ज्ञानाने दृश्य खोटे आहे असे कळले तर मग भजन का करायचे ?ज्ञानाहून श्रेष्ठ काही नाही तर मग उपासना का करायची ?सगुणाची उपासना केल्याने काय मिळते?
सगुण नासिवंत ऐसे सांगता। पुन्हा भजन करावे म्हणता। तरी कशासाठी आता। भजन करू ।। ६ -७ -७ । ।
या सर्व प्रश्नांची उत्तरे स्वामी द्यायला सुरुवात करतात :
गुरुचे वचन पाळणे। हेची परमार्थाचे मुख्य लक्षण। । गुरुचे वचन पाळून त्यावर पूर्ण विश्वास ठेवणे हेच परमार्थाचे मुख्य लक्षण आहे .गुरुने सांगितले की सगुण भजन करावे व मग ते मानावे .श्रोता पुन्हा आक्षेप घेतो :
काय मानिला उपकार । कोण जाला साक्षात्कार। किंवा प्रारब्धाचे अक्षर । पुसिले देवे । । ६ -७ -१२ । ।
होणार हे तों पालटेना। भजने काय करावे जना। हे तों पाहतां अनुमाना । कांहीच न ये । । ६ -७ -१३ । ।
स्वामींची आज्ञा प्रमाण । कोण करील अप्रमाण। परंतु याचा काय गुण। मज निरोपावा । । ६ -७ -१४। ।या सर्व प्रश्नांची उत्तरे स्वामी द्यायला सुरुवात करतात :गुरुचे वचन प्रतिपाळणे। हे परमार्थाचे मुख्य लक्षण आहे .गुरुने सांगितले की सगुण भजन करावे की करावे .श्रोता पुन्हा आक्षेप घेतो -

होणार ते पालटेना। भजने काय करावे जना। हे तो पाहता अनुमाना । काहींच न ये । । ६ -७ -१३ । ।
स्वामींची आज्ञा प्रमाण । कोण करील अप्रमाण। परंतु याचा काय गुण। मज निरोपावा । । ६ -७ -१४ । ।
समर्थ म्हणतात :आत्मज्ञान झाल्यावर कर्म नाश पावते .निर्गुण आत्मस्वरुप खरे असा प्रत्यय येतो ,परंतु ज्ञानी पुरुषाला सुध्दा देहाचे नित्यकर्म ,प्राथमिक गरजा ,दैनंदिन लोकव्यवहार चुकत नाहीत .म्हणजे ज्ञानी पुरूष अज्ञानी पुरुषासारख्या देहाच्या हालचाली करतो .ज्ञानी व अज्ञानी मध्ये देहाच्या बाह्य स्वरूपात फरक नसतो ,पण
अंतर्यामी असतो .ज्ञानी सगुणाला भजतो पण त्याच्या भजनात भ्रम नसतो .तर अज्ञानी सगुणाला भजतो तो भ्रमाने व भितीने ! प्रपंचातील अडचणी सोडविण्यासाठी अज्ञानी ,सकाम भजन करतो .
समर्थ म्हणतात :तुला जेवायला ,पाणी प्यायला ,मलमूत्राचा त्याग करावा लागतो ,तुझ्याशी संबंधित सर्वांच बर चालाव अस तुला वाटत ,मग सगुणाच भजन का सोडायचे ?तुला आत्मज्ञान झाले ,सगळे दृश्य मिथ्या आहे हे विवेकाने कळले तरी देह असे पर्यंत देह सांभाळावाच लागतो .दृश्याचा संपूर्ण त्याग करता येत नाही ,मग भजनाने काय केले ?
हरिहर ब्रह्मादिक । हे जयाचे आज्ञाधारक । तू येक मानवी रंक । भजेसिना तरी काय झाले । ।
६ -७ -२० । ।
ब्रह्मा ,विष्णू आणि महेश हे देवही ईश्वराच्या आज्ञा पाळतात ,मग तुझ्या सारख्या क :पदार्थ असलेल्या मानवाला भजन पूजन केल्याने काय होणार आहे ?
आमच्या कुळाचे रघुनाथ हे दैवत आहे .त्याच्या कृपेने माझा परमार्थ चालतो .देवांना ही सोडविणा-या श्री रामाचा मी सेवक आहे .त्या सेवेनेच मला हे ज्ञान प्राप्त झाले आहे .जो माणूस आत्मस्वरूपाचे अनुसंधान ठेवत नाही व ठेवत नाही असे ही म्हणत नाही त्याला देहाभिमान असतोच .त्यामुळे त्याला आत्मज्ञान ही मिळत नाही व सगुण भक्ती ही तो करत नाही .समर्थ म्हणतात :
रघुनाथ भजने ज्ञान झाले । रघुनाथ भजने महत्त्व वाढिले। म्हणोनिया तुंवा केले । पाहिजे आधी । ।
६ -७ -३१ । । रघुनाथ भजनानेच मला आत्मज्ञान प्राप्त झाले ,माझे महत्त्व वाढले ,हां माझा अनुभव आहे .म्हणून तू सगुणाची उपासना कर .
रघुनाथ स्मरोनि कार्य करावे । ते तत्काळचि सिध्दी पावे । कर्ता राम हे असावे । अभ्यांतरी। ।
६ -७ -३३ । ।
कर्ता राम म्हणे मी नव्हे आपण । ऐसे सगुण निवेदन । निर्गुणी ते अनन्य । निर्गुणचि होईजे । ।
६ -७ -३४ । ।
मी कर्ता ऐसे म्हणसी। तेणे तू कष्टी होसी । राम कर्ता म्हणता पावसी । यश कीर्ती प्रताप । ।
६ -७ -३६ । ।
म्हणून भगवंताची उपासना करावी .जो भगवंताची उपासना करतो त्याला पुष्कळ लोक मान देतात .अवाढव्य विश्वात भगवंताची प्रचंड शक्ती काम करते .,त्या शक्तीच्या कृपेने आपण जगतो ,कर्म करतो ,भोग भोगतो ,हे ध्यानात ठेवून जगणे हे उपासनेचे वर्म आहे .

Monday, September 14, 2009
सृष्टी सत्य की मिथ्या
आता सृष्टी दिसत असे । ते सत्य की मिथ्या । ।
सृष्टी जी अता दिसते ती सत्य आहे की मिथ्या आहे असा प्रश्न शिष्य विचारतात :
सृष्टी पूर्वी ब्रह्म असे । तेथे सृष्टी मुळीच नसे । आता सृष्टी दिसत असे । ते सत्य की मिथ्या । । ६ -६ -१ । ।
तुम्ही सर्वज्ञ गोसावी । माझी आशंका फेडावी । ऐसा श्रोता विनवी । वक्तयासी । । ६ - ६ -२ । ।
ही शंका निरसन करण्यासाठी समर्थांनी दोन वचने सांगितली :जीवभूत : सनातन : व यद् दृष्टं तन् नष्टं
जीवभूत: सनातन : असे गीतेचे वचन आहे .याचा अर्थ या संसारात माझाच [परमात्म स्वरूपाचा ]सनातन अंश जीव झाला आहे या वचनाने जगाला खरेपणा येतो .
यद् दृष्टं तद नष्टं : जे दिसते ते नासते या वचनाने जग खोटे ठरते .
सत्य म्हणो तरी नासे । मिथ्या म्हणो तरी दिसे । आता जैसे आहे तैसे । बोलिजेल । । ६ -६ -६ । ।
जग सत्य म्हणावे तर त्याचा नाश होतो .मिथ्या म्हणावे तर ते दिसते .मग जग खरोखरीचे कसे आहे ?
श्रोता म्हणतो -जीवभूत : सनातन : असे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण बोलले आहेत .मग जगाला मिथ्या ठरवून भगवंतांना अज्ञानी ठरवायचे का ?तेव्हा समर्थ म्हणतात :अश्वथ :सर्व वृक्षाणां ।
माझी विभूती पिंपळ। म्हणौनि बोलिला गोपाळ । वृक्ष तोडिता तात्काळ । तुटत असे । । ६ -६ -१९ । । सर्व वृक्षां मध्ये पिंपळ मीच आहे .सर्व वृक्षां मध्ये माझी विभूती पिंपळ आहे असे श्रीकृष्ण म्हणतात ,पण पिंपळ तोडला तर तुटतो .परन्तु ब्रह्माचे वर्णन करताना -
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि । नैनं दहति पावक:। न चैनं क्लेदयन्त्याणे न शेषयति मारूत :। याला शस्त्रे तोडू शकत नाहीत ,अग्नी जाळू शकत नाही ,पाणी भिजवू शकत नाही ,वायु वाळवू शकत नाही असे वर्णन केले जाते .पण पिंपळ शस्त्राने तुटतो ,अग्नीने जळतो ,पाण्यात कालवला जातो मग श्रीकृष्णांच्या दोन्ही वाक्यांची एक वाक्यता कशी करायची हे स्पष्ट करण्यासाठी आणखीन एक उदाहरण देतात .
इंद्रियाणां मनश्चास्मि -माणसाचे मन ते मीच आहे असे श्रीकृष्ण म्हणतात . माणसाचे मन ते मीच आहे असे असताना मन का आवरावे असा प्रश्न शिष्यांना पडतो .समर्थ म्हणतात :
ऐसे श्रीकृष्ण का बोलिला । साधन मार्ग दाखविला । खड़े मांडून सिकविला । वोनामा जेवी । । ६ -६ -२४ । । आई ज्याप्रमाणे लहान मुलांना खड़े मांडून अक्षर ओळख करून देते त्याप्रमाणे दृश्य जगात रमणा-या अज्ञानाला जगातल्या वस्तू घेऊन परमात्म चिंतन कसे करावे ते दाखवतात .सृष्टी सत्य की मिथ्या हे दाखविण्यासाठी समर्थ कल्पना स्पष्ट करतात :
येके कल्पनेच्या पोटी । होती जाती अनंत सृष्टी । तया सृष्टीची गोष्टी । साच केवी । । ६ -६ -३१ । । मूळ शुध्द ब्रह्म स्वरूपात मी एक आहे ,तो अनेक व्हावा अशी कल्पना आली ,तिच्या पोटी अनंत विश्वे येतात आणि जातात .पण कल्पनेचा पाया असलेल्या विश्वांना खरेपणा असत नाही .
धातु पाषाण मृत्तिका । चित्रलेख काष्ठ देखा । तेथे देव कैंचा मूर्खा । भ्रांती पडिली । । ६ -६ -४४ । ।
धातू ,दगड ,माती, चित्रे ,लाकूड यात देव वाटणे हां केवळ भ्रम आहे .हा भ्रम मायेने निर्माण केलेला आहे .हे दृश्य विश्व कोटीगुणाने खोते आहे .साधू संत ,महानुभाव ,या सर्वांचा अनुभव असाच आहे की खरा देव पंचमहाभूतांच्या पलिकडे आहे आणि दृश्य सृष्टी मिथ्या आहे .
साधू संत महानुभाव । त्यांचा ऐसाची अनुभव । पंचभूतातीत देव । सृष्टी मिथ्या । । ६ -६ -४७ । ।

Subscribe to:
Posts (Atom)