Monday, September 14, 2009

सृष्टी सत्य की मिथ्या

आता सृष्टी दिसत असे ते सत्य की मिथ्या
सृष्टी जी अता दिसते ती सत्य आहे की मिथ्या आहे असा प्रश्न शिष्य विचारतात :
सृष्टी पूर्वी ब्रह्म असे तेथे सृष्टी मुळीच नसे आता सृष्टी दिसत असे ते सत्य की मिथ्या - -
तुम्ही सर्वज्ञ गोसावी माझी आशंका फेडावी ऐसा श्रोता विनवी वक्तयासी - -
ही शंका निरसन करण्यासाठी समर्थांनी दोन वचने सांगितली :जीवभूत : सनातन : यद् दृष्टं तन् नष्टं
जीवभूत: सनातन : असे गीतेचे वचन आहे .याचा अर्थ या संसारात माझाच [परमात्म स्वरूपाचा ]सनातन अंश जीव झाला आहे या वचनाने जगाला खरेपणा येतो .
यद् दृष्टं तद नष्टं : जे दिसते ते नासते या वचनाने जग खोटे ठरते .
सत्य म्हणो तरी नासे मिथ्या म्हणो तरी दिसे आता जैसे आहे तैसे बोलिजेल - -
जग सत्य म्हणावे तर त्याचा नाश होतो .मिथ्या म्हणावे तर ते दिसते .मग जग खरोखरीचे कसे आहे ?
श्रोता म्हणतो -जीवभूत : सनातन : असे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण बोलले आहेत .मग जगाला मिथ्या ठरवून भगवंतांना अज्ञानी ठरवायचे का ?तेव्हा समर्थ म्हणतात :अश्वथ :सर्व वृक्षाणां
माझी विभूती पिंपळ म्हणौनि बोलिला गोपाळ वृक्ष तोडिता तात्काळ तुटत असे - -१९ सर्व वृक्षां मध्ये पिंपळ मीच आहे .सर्व वृक्षां मध्ये माझी विभूती पिंपळ आहे असे श्रीकृष्ण म्हणतात ,पण पिंपळ तोडला तर तुटतो .परन्तु ब्रह्माचे वर्णन करताना -
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावक: चैनं क्लेदयन्त्याणे शेषयति मारूत : याला शस्त्रे तोडू शकत नाहीत ,अग्नी जाळू शकत नाही ,पाणी भिजवू शकत नाही ,वायु वाळवू शकत नाही असे वर्णन केले जाते .पण पिंपळ शस्त्राने तुटतो ,अग्नीने जळतो ,पाण्यात कालवला जातो मग श्रीकृष्णांच्या दोन्ही वाक्यांची एक वाक्यता कशी करायची हे स्पष्ट करण्यासाठी आणखीन एक उदाहरण देतात .
इंद्रियाणां मनश्चास्मि -माणसाचे मन ते मीच आहे असे श्रीकृष्ण म्हणतात . माणसाचे मन ते मीच आहे असे असताना मन का आवरावे असा प्रश्न शिष्यांना पडतो .समर्थ म्हणतात :
ऐसे श्रीकृष्ण का बोलिला साधन मार्ग दाखविला खड़े मांडून सिकविला वोनामा जेवी - -२४ आई ज्याप्रमाणे लहान मुलांना खड़े मांडून अक्षर ओळख करून देते त्याप्रमाणे दृश्य जगात रमणा-या अज्ञानाला जगातल्या वस्तू घेऊन परमात्म चिंतन कसे करावे ते दाखवतात .सृष्टी सत्य की मिथ्या हे दाखविण्यासाठी समर्थ कल्पना स्पष्ट करतात :
येके कल्पनेच्या पोटीहोती जाती अनंत सृष्टीतया सृष्टीची गोष्टीसाच केवी । । - -३१ । । मूळ शुध्द ब्रह्म स्वरूपात मी एक आहे ,तो अनेक व्हावा अशी कल्पना आली ,तिच्या पोटी अनंत विश्वे येतात आणि जातात .पण कल्पनेचा पाया असलेल्या विश्वांना खरेपणा असत नाही .
धातु पाषाण मृत्तिकाचित्रलेख काष्ठ देखातेथे देव कैंचा मूर्खाभ्रांती पडिली । । - -४४ । ।
धातू ,दगड ,माती, चित्रे ,लाकूड यात देव वाटणे हां केवळ भ्रम आहे .हा भ्रम मायेने निर्माण केलेला आहे .हे दृश्य विश्व कोटीगुणाने खोते आहे .साधू संत ,महानुभाव ,या सर्वांचा अनुभव असाच आहे की खरा देव पंचमहाभूतांच्या पलिकडे आहे आणि दृश्य सृष्टी मिथ्या आहे .
साधू संत महानुभावत्यांचा ऐसाची अनुभवपंचभूतातीत देवसृष्टी मिथ्या । । - -४७ । ।


No comments: