Saturday, September 12, 2009

माया ब्रह्म ते कैसे ?

माया ब्रह्म
श्रोते पुसती ऐसेमाया ब्रह्म ते कैसेश्रोत्यां वक्तयां मिसेनिरूपण ऐका। । - - । ।
श्रोत्यांनी माया आणि ब्रह्म कसे असते ते सांगा म्हटल्यावर समर्थ माया आणि ब्रह्मातला फरक सांगतात :
ब्रह्म निर्गुण निराकार आणि माया सगुण साकार
ब्रह्म निरोपाधी केवळ -उपाधी नसलेले आणि माया उपाधिरूपी
ब्रह्म दिसेना आणि माया दिसे
ब्रह्म भासेना आणि माया भासे
ब्रह्म नासेना कल्पांतकाळी आणि माया नासे
ब्रह्म रचेना अणि माया रचे
ब्रह्म खचेना आणि माया खचे
ब्रह्म रूचेना अज्ञानासी आणि माया रुचे
ब्रह्म उपजेना आणि माया उपजे
ब्रह्म मरेना आणि माया मरे
ब्रह्म धरेना धारणेसी आणि माया धरे
ब्रह्म फुटेना आणि माया फूटे
ब्रह्म तुटेना आणि माया तुटे
ब्रह्म विटेना -अविनाशी असल्याने आणि माया विटे -विनाशी असल्याने
ब्रह्म निर्विकारी आणि माया विकारी -बदल घडणारी
ब्रह्म काहीच करी आणि माया सर्व करी
ब्रह्म ते अरूप आणि माया नाना रूपे धरी
ब्रह्म ते शाश्वत ते एक -ते कायम टिकणारे आणि माया पंचभूतिक अनेक -दृश्य विश्व हा मायेचाच पसारा
ब्रह्म थोर आणि माया लहान
ब्रह्म सार आणि माया असार
ब्रह्म आकाशा ऐसे निवळ -निरभ्र ,स्वच्छ आणि माया वसुंधरा डहूळ -पृथ्वी सारखी मलिन आणि गढूळ
ब्रह्म सूक्ष्म केवळ आणि माया स्थूल रूपी
ब्रह्म ते अप्रत्यक्ष असे आणि माया प्रत्यक्ष दिसते
ब्रह्म ते समचि असे -सर्वत्र सारखे आणि माया ते विषम रूपी -अधिक उणी म्हणजे कोठे कमी कोठे जास्त
ब्रह्म अलक्ष -म्हणजे ध्यानाचा विषय नाही आणि माया लक्ष-ध्यानाचा विषय होतो
ब्रह्म असाक्ष -तर्काच्या पलिकडे आणि माया साक्ष- मायेचा तर्क करता येतो
ब्रह्म अखंड घनदाट आणि माया पंचभूतिक पोचट
ब्रह्म निरंतर निघोट -कायमचे ,पूर्णरूप आणि माया ते जुनी ,जर्जरी -जुनी कुजकी नाशवंत
ब्रह्मासी नाही करणे हेत -ब्रह्म कर्मरहित आणि हेतूरहित आणि मायेसी आहे -माया कर्ममय हेतूयुक्त
ब्रह्म घडेना आणि माया घडे
ब्रह्म पडेना आणि माया पडे
ब्रह्म असतचि असे आणि माया निरसिताची निरसे
ब्रह्मांस कल्पांत नसे आणि मायेला कल्पांत आहे
ब्रह्म कोमल आणि माया कठिण
ब्रह्म विशाळ आणि माया अल्प
ब्रह्म असे सर्वकाल आणि माया नासे
वस्तू नव्हे बोलिजे ऐसी -वस्तू म्हणजे ब्रह्म त्याचे वर्णन करता येत नाही आणि माया जैसी बोलिजे तैसी
काळ पावेना वस्तूसी -मृत्यु ब्रह्माचा नाश करत नाही आणि मायेसी झडपी-दृश्यातील सर्व वस्तूंचा नाश काळ करतो
ब्रह्म अभंगजैसे तैसेआणि माया भंगे
विश्वात जेव्हडे सचेतन अचेतन दिसते बदलत जाऊन नाश पावते ती माया .परब्रह्म चाराचराला ,सबंध विश्वाला व्यापून आहे .दृश्य विश्वाच्या पलिकडे ,परमात्मा असतो .तो निराळेपणाने राहतो .आकाशाचे प्रतिबिंब जसे पाण्यात पडले तरी आकाश पाण्यापासून अलिप्त असते तसा परमात्मा सर्वत्र व्यापलेला असून अलिप्त असतो .



No comments: