ब्रह्मानुभव कसा घेता येतो ?
माया विवेके मावळे । सारासार विचार कळे । परब्रह्म तेही निवळे । अंतर्यामी । । १ -९ -१४ । ।
ब्रह्म भासले उदंड । ब्रह्मी बुडाले ब्रह्मांड । पंचभूतांचे थोतांड । तुच्छ्य वाटे । । १ -९ -१५ । ।
प्रपंच वाटे लटिका । माया वाटे लापणिका । शुध्द आत्मा विवेका । अंतरी जाणा। । १ -९ -१६ । ।
परमार्थाचे महात्म वर्णन करताना समर्थ सांगतात की परमार्था मुळे सायोज्य मुक्ती मिळते आणि ब्रह्मानुभव
येतो .आत्मानात्म विवेकाने माया नाहीशी होते .सार काय असार काय ते कळते.ह्रुदयात ब्रह्मस्वरूप स्वच्छपणे अनुभवास येते .अनंतपणे ब्रह्म जिकडे तिकडे अनंतपणे अनुभवास येते .प्रपंच खोटा वाटतो .मायेचा पसारा कल्पनामय वाटतो .विवेकाने शुध्द आत्म्स्वरूपाचे दर्शन होते .आत बाहेर ब्रह्मदर्शनाची अवस्था स्थिर होते .मग सर्व संशय नाहिसे होतात .हे दृश्य विश्व जून ,फाटके,जर्जर -भोके पडलेले ,कुहिट -कुजट वाटू लागते .
दशक ६ समास २ मध्ये समर्थ म्हणतात :
प्रगट ते जाणावे असार । आणि गुप्त ते जाणावे सार । गुरुमुखे हा विचार । उमजो लागे । । ६ -२ -२१ । ।
जे उमजेना ते उमजावे । जे दिसेना ते पहावे । जे कळेना ते कळावे। विवेकबळे। । ६ -२ -२२ । ।
गुप्त तेचि प्रगटावे। असाध्य ते साधावे । कानडेचि अभ्यासावे । सावकास। । ६ -२ -२३ । ।
जे इंद्रियांना दिसणारे व उघड असते ते असार ,मिथ्या असते . जे गुप्त ,सूक्ष्म असते ते सार असते .गुरुकडून ऐकलेल्या उपदेशाने हे विवेचन कळू लागते .साधना करून सूक्ष्म ब्रह्म पाहण्याचे व अनुभवण्याचे सामर्थ्य अंगी
येते .त्यासाठी देहाचे नाही तर मनाचे कष्ट घ्यावे लागतात .अध्यात्मश्रवण हा त्यासाठी हमखास उपाय आहे .
दशक ६ समास ३ मध्ये समर्थ विवेकाने देहाकडे पहायला सांगतात .
तत्वे तत्व मेळविले। त्यासी देह हे नाम ठेविले । ते जाणते पुरुषे शोधिले । तत्वे तत्व । । ६ -३ -२० । ।
तत्वझाडा निशेष होतां । तेथे निमाली देहअहंता । निर्गुण ब्रह्मी ऐक्यता । विवेके झाली । । ६ -३ -२१ । ।
चार देह ,चार अवस्था ,चार अभिमान ,चार स्थाने ,चार भोग ,चार शक्ती अशी ३२ तत्वे ,स्थूल देहाची २५ ,सूक्ष्म देहाची २५ तत्वे अशी एकूण ८२ तत्वे मिळून देह बनतो .या ८२ तत्वांचा निरास केला म्हणजे प्रत्येक तत्व म्हणजे मी नाही असे दाखवल की 'देह म्हणजे मी नाही ' असा प्रत्यक्ष अनुभव येतो .आपला आपण शोध घेतला की आपण भ्रमात्मक आहोत किंवा मिथ्या आहोत हे कळते .शेवटी शुध्द व खरे निर्गुण ब्रह्म तेव्हडे उरते .ही तत्वे विरली की मी -तू पणाचा भ्रम्ही विरतो .तेव्हा जो शुध्द मी उरतो तेच निर्गुण आत्मस्वरूप !
ब्रह्मी शब्दी ऐसे तैसे । बोलिजे त्याहून अनारिसे । परी ते श्रवण अभ्यासे । पाविजे ब्रह्म । । ७ -२ -७ । ।
ब्रह्माचे वर्णन ब्रह्म असे आहे , तसे आहे असे कितीही वर्णन केले तरी ते त्या वर्णनाहून निराळे असते .श्रवण करून साधानाभ्यास करणे हा एकच उपाय ब्रह्मदर्शन करून देतो आणि त्यासाठी
सद्गुरुकृपा तेचि किली । जेणे बुध्दी प्रकाशली । द्वैतकपाटे उघडली । येकासरी। । ७ -२ -१५ । ।
सद्गुरु कृपा हीच किल्ली आहे ज्यामुळे बुध्दीत आत्मज्ञानाचा प्रकाश पडतो .सद्गुरुकृपेने देह्बुध्दी जाऊन आत्मबुध्दी प्रगट होते .आत्मबुध्दीत सुखाला कमतरता नसते .तेथे मनाचा शिरकाव होत नाही .पण मानावाचून साधना चालू रहाते.मनाचा लय होतो .मनाचे संकल्प विकल्प मावळतात.इच्छा ,आकांक्षा नाहिशा होतात .मी साधना करतो हा अहंभावही नाहीसा होतो .
ते पराहूनि पर । मनबुध्दी अगोचर । संग सोडिता सत्वर । पाविजेते । । ७ -२ -१८ । ।
माणसाने देहाचा संबंध सोडला तर ब्रह्म ताबडतोब प्राप्त होते .देहाचा संग सोडायचा म्हणजे मी पणाचा त्याग करायचा .मी पण म्हणजे जीव पण .मी जीव आहे ,अज्ञानी आहे देहापुरता मर्यादित आहे असे समजणे म्हणजे देह्बुध्दी .देहाबुध्दीला बाजूला सारणे म्हणजे संग सोडणे.संग सोडला म्हणजे ब्रह्म स्वरूपाशी ऐक्य घडून
येते .स्वस्वरूपाशी अनन्य होणे.ते कसे व्हायचे ते समर्थ द.९ स .२ मध्ये सांगतात :
करावे तत्व विवरण । शोधावे ब्रह्म निर्गुण । पाहावे आपणासी आपण । म्हणजे कळे। । ९ -२ -३३ । ।
या दृश्य विश्वातील तत्व विवरण केले ,निर्गुण ब्रह्माचा शोध घेतला ,आपण कोण हे नीट पाहिले की स्वरुप कसे आहे ते कळू लागते .मग स्वस्वरूपाविषयी बोलणे थांबवून त्याचे अखंड मनन चिंतन करत राहून त्यामध्ये लीन होता येते .त्यासाठी समर्थ वृती विशाल करायला सांगतात .वृती जेव्हडी विशाल करू तेव्हडी मती विशाल होते ,तेव्हडे ज्ञान व अनुभव विशाल होतात .विश्व दिसायला शिल्लक उरत नाही. साधक अखंड व निरंतर चिंतनाने अंतरात्म्याशी अनन्य होतो ,त्याचा मी पणा नाहीसा होतो व आत्मस्वरूपाचा साक्षात अनुभव येतो .

No comments:
Post a Comment